27/01/2022
गारूड्याच्या ताब्यातून कोब्राची केली सुटका
गारूड्याच्या ताब्यातून सापाची सुटका || साप ताब्यात घेऊन गावकऱ्यांचेही केले मार्गदर्शन ||
सर्पमित्र विक्रम कडाळे हे देवळाली कँम्प येथील सर्पमित्र आहेत. ते देवळाली कँम्प व पंचकृषी येथे कार्यरत असतात.नाने...
16/07/2021
🐍𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗦𝗻𝗮𝗸𝗲 𝗗𝗮𝘆🐍
Every year, 16th of July is the day set aside for snakes.
World Snake Day is about raising awareness and celebrating these creatures and how they live.
Snakes are one of the oldest living creatures in nature. About 3,458 species of snakes live in the oceans, deserts and from the semi-frozen Tundra to the Amazon rainforest in Northern Canada. Snakes are descendants of dinosaurs, a type of predator that plays an important role in maintaining the balance of nature. Snakes usually eat small animals, including insects, small rodents and frogs, and their lower jaws can be separated from their upper jaws, so some large snakes can eat large deer, pigs, monkeys and even primates.
Like all other species, snakes are endangered for a variety of reasons, including deforestation, climate change, and snake habitat degradation. Fortunately, snakes are not widely hunted. But in some countries snakes are hunted for food. We cannot eliminate the natural threats, but we can reduce the threat to them because of us.
So let us understand the true meaning of World Snake Day and always keep in mind to protect them.
25/06/2020
#मराठी : वाळा
#शास्त्रीयनाव: Ramphotyphlops braminus
#इंग्रजी : Worm Snake
#हिंदी : अंधा साप
हा आशिया व आफ्रिकेत सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, पुर्णपणे बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो. ओल्या जमिनीतील अळ्या किडे हे याचे अन्न आहे.
वर्णन
वाळा साप लालसर तपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.
स्थानिक नावे
प्रजातीचे शास्त्रीय नाव हे ब्राह्मण या संस्कृत शब्दापासून घेण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं','कणा', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते.
गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.
#भौगोलिक_आढळ
वाळा आशिया आणि आफ्रिकेत सापडतो. भारतात सर्वत्र वाळ्याचा वावर आढळला आहे. या प्रजातीची कोणतीही उपप्रजाती आतापर्यंत आढळून आलेली नाही.
#वास्तव्य
वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.
#खाद्य
मुंग्या, माकुडा, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या
#प्रजनन.
वाळ्यांमध्ये अंड्यांद्वारे प्रजनन होते. सर्वसाधारणतः ३-७ तांदळाच्या आकाराची अंडी घातली जातात.
हा सुंदर आणि निरअपराध नाजूक जीव आपल्या अज्ञाना पायी मारला जातो. कृपया कुठल्याही सापाला मारू नका. सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचा जीव वाचवून निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान करा.
सापांच्या अधिक माहिती साठी आपण माझा youtube channel subscribe करू शकता.
https://www.youtube.com/user/vikramkadale
कृपया दिलेल्या youtube लिंकवर जाऊन माझ्या channel ला subscribe करा तसेच व्हीडीओ like आणि share करा. आणि बेल 🔔 icon press करायला विसरू नका.
24/06/2020
अफई (Echis carinatus)
इंग्लिश : Saw-scaled viper)
छोटा और विषैला साँप है जिसका सिर तिकोना और जिसकी सफेद रंग की भूरी पृष्ठभूमि पर एक तीर का निशान बना रहता है। शरीर धूसरपन लिए हुए भूरा और उसपर पीले चिह्नों की एक शृंखला होती है। उक्त शृंखला देह के ऊपर एक वक्र बनाती है। अफई की लंबाई ५५० मि.मि. तक पाई गई है। जंतु विज्ञान में इसका नाम एकिस कैरिनैटस है।
अफई
Echis carinatus
इस साँप का आहार छोटे मेढक, छिपकलियाँ, साँप, बिच्छु तथा अनेक प्रकार के कीट हैं। इन्हे अक्सर खुली चट्टानों पर भी देखा गया है। राजस्थान के रेगिस्तानों में रात के समय इन्हें चलते पाया गया है। महाराष्ट्र के रत्नगिरि जिले में ये साँप बहुत संख्या में पकड़े गए हैं। देखने में ये बहुत सुंदर होते हैं। इनका रंग बाहरी वातावरण के रंग जैसा होता है इसलिए इन्हें देखने से पहले ही, अधिकांश लोग इसके शिकार हो जाते हैं। मृत्यु कई दिन बाद होती है।
24/06/2020
#फुरसे
शास्त्रीय नाव : Echis, एकिस ;
इंग्रजी - saw-scaled viper,
Indian saw-scaled viper,
little Indian viper.
हिंदी - aphai (अफई)
इंग्लिश : Saw-scaled viper)
#वर्णन
फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूंवर एकेक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढर्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ती बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेली असतात. डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी (↑) स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.
डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा (कंगोरा) असतो. पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दाते असतात.
#आढळ
फुरसे भारतात जवळजवळ सगळीकडे आढळते. मैदानी प्रदेशात जरी तो बहुधा राहत असला, तरी १,८०० मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो. हा साप अनेकदा दगडांच्या खाली आढळतो. कडक उन्हाचा त्याला त्रास होत नसावा असे वाटते कारण तापलेली वाळू किंवा जमीन यावर तो पुष्कळदा दिसतो.
हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे.
महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे. २००९ साली इराक मध्ये त्तैग्रीस आणि युफ्रायटिस नद्यांच्या खोर्यांत दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरशांनी इराकी जनतेमध्ये दहशत पसरवली होती.
#स्वभाव
हे साप संधिप्रकाशात (पहाटे आणि संध्याकाळी) किंवा रात्री सक्रिय असतात. तरीही ते दिवसा सुद्धा सक्रिय असल्याचे काही अहवाल सांगतात. दिवसा ते प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात. वाळूमय वातावरणात ते स्वतःचे शरीर वाळूत पुरून फक्त तोंड उघडे ठेवू शकतात. ते साधारणपणे पावसानंतर किंवा दमट रात्री जास्त सक्रिय असतात.
फुरसे हा साप आक्रमक असतो. त्याला किंचित जरी डिवचले किंवा चिडविले, तर ते इंग्रजी आठच्या (8) आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. या स्थितीत वरचेवर जीभ बाहेर काढून तो झटकन डोके पुढे काढतो आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेतो. या सर्व क्रिया फक्त १/३ सेकंदात होतात. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही. त्याला थोडासा जरी धक्का लागला तरी तो चावतो.
#अन्न
हा साप बेडूक, सरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो.
प्रजनन
हा साप अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. उत्तर भारतातील सापांचे मिलन हिवाळ्यात होते व मादा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पिल्लांना जन्म देतात. मादा एका वेळी ३ ते १५ पिल्लांना जन्म देते. पिल्लांची लांबी ११५ ते १५२ मिमी असते.
#विष
या प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.
हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे चावलेल्या लोकांपैकी १०-२०% माणसे दगावतात. दंश झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू येतो किंवा रोगी २-२० दिवसदेखील जगतो. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बर्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत. याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.
सापांच्या अधिक माहिती साठी आपण माझा youtube channel subscribe करू शकता.
https://www.youtube.com/user/vikramkadale
कृपया दिलेल्या youtube लिंकवर जाऊन माझ्या channel ला subscribe करा तसेच व्हीडीओ like आणि share करा. आणि बेल 🔔 icon press करायला विसरू नका.
09/05/2020
सांप या सर्प, पृष्ठवंशी सरीसृप वर्ग का प्राणी है। यह जल तथा थल दोनों जगह पाया जाता है। इसका शरीर लम्बी रस्सी के समान होता है जो पूरा का पूरा स्केल्स से ढँका रहता है। साँप के पैर नहीं होते हैं। यह निचले भाग में उपस्थित घड़ारियों की सहायता से चलता फिरता है। इसकी आँखों में पलके नहीं होती, ये हमेशा खुली रहती हैं। साँप विषैले तथा विषहीन दोनों प्रकार के होते हैं। इसके ऊपरी और निचले जबड़े की हड्डियाँ इस प्रकार की सन्धि बनाती है जिसके कारण इसका मुँह बड़े आकार में खुलता है। इसके मुँह में विष की थैली होती है जिससे जुडे़ दाँत तेज़ तथा खोखले होते हैं अतः इसके काटते ही विष शरीर में प्रवेश कर जाता है। दुनिया में सांपों की कोई 2500-3000 प्रजातियाँ पाई जाती हैं। इसकी कुछ प्रजातियों का आकार 10 सेण्टीमीटर होता है जबकि अजगर नामक साँप 25 फिट तक लम्बा होता है। साँप मेढक, छिपकली, पक्षी, चूहे तथा दूसरे साँपों को खाता है। यह कभी-कभी बड़े जन्तुओं को भी निगल जाता है।
सरीसृप वर्ग के अन्य सभी सदस्यों की तरह ही सर्प शीतरक्त का प्राणी है अर्थात् यह अपने शरीर का तापमान स्वंय नियंत्रित नहीं कर सकता है। इसके शरीर का तापमान वातावरण के ताप के अनुसार घटता या बढ़ता रहता है। यह अपने शरीर के तापमान को बढ़ाने के लिए भोजन पर निर्भर नहीं है इसलिए अत्यन्त कम भोजन मिलने पर भी यह जीवीत रहता है। कुछ साँपों को महीनों बाद-बाद भोजन मिलता है तथा कुछ सर्प वर्ष में मात्र एक बार या दो बार ढेड़ सारा खाना खाकर जीवीत रहते हैं। खाते समय साँप भोजन को चबाकर नहीं खाता है बल्कि पूरा का पूरा निकल जाता है। अधिकांश सर्पों के जबड़े इनके सिर से भी बड़े शिकार को निगल सकने के लिए अनुकुलित होते हैं। अफ्रीका का अजगर तो छोटी गाय आदि को भी निगल जाता है। विश्व का सबसे छोटा साँप थ्रेड स्नेक होता है । जो कैरेबियन सागर के सेट लुसिया माटिनिक तथा वारवडोस आदि द्वीपों में पाया जाता है वह केवल 10-12 सेंटीमीटर लंबा होता है। विश्व का सबसे लंबा सांप रैटिकुलेटेड पेथोन (जालीदार अजगर ) है, जो प्राय: 10 मीटर से भी अधिक लंबा तथा 120 किलोग्राम वजन तक का पाया जाता है । यह दक्षिण -पूर्वी एशिया तथा फिलीपींस में मिलता है।
06/05/2020
Watch snake rescue videos and please subscribe my youtube channel for upcoming video.
Sarpmitra Vikram Kadale, Nashik.
सर्पमित्र विक्रम कडाळे, नाशिक. snake expert vikram kadale. facebook acc विक्रम कडाळे contact 8856080420