Sukhayu Hospital

Sukhayu Hospital

Share

Taking Care of Your Health... Naturally!

Photos from Sukhayu Hospital's post 27/05/2026

Your health deserves expert surgical care.

From advanced laparoscopic procedures to conventional open surgeries, our General Surgical Team is committed to safe, precise, and compassionate treatment.

✔ Hernia Surgery
✔ Appendix Surgery
✔ Gallbladder Surgery
✔ Piles • Fissure • Fistula Treatment
✔ Breast & Thyroid Procedures
✔ Emergency Surgical Care

Trusted care. Modern techniques. Better recovery.

📞 Appointment & Enquiry: 7420004242

17/05/2026
15/05/2026

"डॉक्टर, मला काही मोठा आजार नाही. फक्त पोट साफ होत नाही."
फक्त.
हा शब्द ऐकला की मला थांबावंसं वाटतं.
रमेश. ४२ वर्षांचा. IT कंपनीत Senior Manager. नाशिकमधून रोज दुसऱ्या गावी ये-जा. सकाळी ७ ची बस. रात्री ९ ला घर. मधे कुठेच वेळ नाही स्वतःसाठी तर अजिबातच नाही.
"किती दिवसांपासून आहे हे?"
"साधारण दोन वर्षं."
मी थांबलो.
दोन वर्षं.
"मग आधी का नाही आलात?"
"अहो डॉक्टर, Constipation म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? वाटलं होतं आपोआप जाईल."
मी त्याला विचारलं -
सकाळी उठल्यावर पहिलं काम काय? - चहा. मग लॅपटॉप उघडतो.
दिवसातून किती पाणी पितो? - दोन-तीन ग्लास असतील.
जेवण कधी होतं? - दुपारी दीड-दोन. कधी कधी तेही नाही.
झोप किती? - पाच-सहा तास. रात्री उशिरापर्यंत मेल्स असतात.
चालणं? व्यायाम? - वेळ नाही डॉक्टर, खरंच.
मी रिपोर्ट बघितले. Thyroid normal. Sugar normal.

पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की, शरीराची सगळ्यात basic गरज म्हणजे वेळ आणि पाणी दोन्ही नाकारलेलं होतं.
Constipation म्हणजे फक्त पोट साफ न होणं नाही.

ते एक संकेत आहे की शरीराची दिनचर्या पूर्णपणे विस्कटलेली आहे.
सतत पोट जड राहणं, डोकं जड वाटणं, चिडचिड होणं, भूक न लागणं हे सगळे Constipation चे भाऊबंद आहेत.

रमेशला मी काही औषधांसोबत तीन गोष्टी सांगितल्या.
* सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी - चहाआधी.
* जेवणात रोज एक वाटी डाळ, भाजी, कोंडायुक्त पोळी बाहेरचं बंद नाही पण कमी आणि घरचं आधी.
* रात्री जेवणानंतर दहा मिनिटे चालणं लिफ्ट नाही, जिना.
मुख्य म्हणजे शरीराला वेळ द्यायला सुरुवात कर.
तीन महिन्यांनंतर तो फोनवर बोलला.
"डॉक्टर, पोट आता रोज साफ होतं. आणि खरं सांगतो डोकंही हलकं वाटतंय आता."
शरीर बदलत नाही, सवयी बदलतात. शरीर फक्त follow करतं.
तुमच्या घरात असा कुणी आहे का जो "Constipation आहे, पण काही नाही" म्हणत वर्षे काढतोय?
त्याला सांगा हे सहन करायची गोष्ट नाही. बरं होण्याची गोष्ट आहे.
तुम्हाला Constipation बद्दल काही प्रश्न आहेत का? कमेंटमध्ये विचारा.

डॉ. सचिन जाधव
Sukhayu Healthcare | नाशिक
(ही माहिती वैद्यकीय जनजागृतीसाठी आहे. वैयक्तिक तक्रारींसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.)

13/05/2026

Real healings, Real reviews 🙏

07/05/2026

मुलगा शाळेतून घरी आला.
जेवण केलं नाही. खेळायला गेला नाही.
फक्त एका कोपऱ्यात शांत बसला.

तुम्ही विचारलं,
“काय झालं रे?”
तो म्हणाला, “काही नाही.”

पण खरं कारण वेगळंच होतं.

👉 शाळेत शी करायची होती. पण त्याने रोखून धरली.
कारण त्याला माहीत होतं — करताना खूप दुखतं.

ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही.

माझ्या OPD मध्ये येणाऱ्या ५ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये A**l Fissure चं प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढलंय.

आणि सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहीत आहे का?

मुलं सांगत नाहीत.
आणि पालकांना कळत नाही.

कारण हा विषय घरात उघडपणे बोलला जात नाही.
मुलाला लाज वाटते.
आईला काय विचारावं हे सुचत नाही.
आणि बाबा तर या विषयापासून चार हात दूरच राहतात.

मग काय होतं?

मूल शाळेत जाण्याआधी शी रोखतो.
शाळेतून घरी येईपर्यंत रोखतो.
दिवसभर रोखतो.

आणि हे रोखणंच फिशरला आणखी वाढवतं.

हे का होतंय आजकालच्या मुलांमध्ये?

• Junk food — chips, pizza, मैद्याचे पदार्थ, fiber शून्य आहार
• पाणी पिणं विसरणं, सतत मोबाईल आणि गेम्समध्ये अडकून असणे
• शाळेतल्या toilet ची भीती किंवा लाज
• मैदानी खेळ बंद, हालचाल नाही, पचन मंद

फिशर हा आजार नाही तर तो एक इशारा आहे.

मुलाचं शरीर सांगतंय,
“त्याची जगण्याची पद्धत चुकतेय.”

पण हे Google वर सर्च केलं तर काय मिळतं?

ऑपरेशनच्या भयंकर गोष्टी.
भीतीदायक फोटो.
आणि अजून गोंधळ.

म्हणूनच Sukhayu Healthcare च्या या पेजवर आपण ही भीती कमी करून याची नेमकी कारणे जाणून घेऊया.

✔️ ह्याचे उपचार
✔️ जीवनशैलीतील बदल
✔️ योग्य माहिती

तेही सोप्या भाषेत.
घाबरवून न टाकता.

तुमच्याही घरात शाळेत जाणारे मूल असेल तर Sukhayu Healthcare या पेजला आत्ता Follow करा.

आणि ही पोस्ट त्या पालकांना नक्की Share करा, ज्यांचं मूल ५ ते १५ या वयोगटात आहे.

❓तुमच्या मुलाने कधी शाळेत toilet वापरायला नकार दिला आहे का?
कमेंटमध्ये नक्की सांगा.

🩺 डॉ. सचिन जाधव
Sukhayu Healthcare | नाशिक

05/05/2026

भारतात तीनपैकी एका माणसाला आयुष्यात कधी ना कधी Anorectal आजार होतो.
Piles. Fissure. Fistula.
पण या आजारांवर बोलणाऱ्यांची संख्या जवळपास शून्य.
कारण लाज. संकोच. आणि "आपोआप बरं होईल" ही आशा.
हे चार आजार म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत-
🔸 Piles (मूळव्याध)
गुदद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या नसा सुजतात. रक्त पडतं, खाज येते, बसताना त्रास होतो. सुरुवातीला औषधांनी बरं होतं. उशीर केला तर शस्त्रक्रिया लागते.
🔸 Fissure (गुदभेद)
गुदद्वाराच्या त्वचेला भेग पडते. शी करताना असह्य वेदना. रक्त पडतं. मुलांमध्येही आढळतो. वेळेत उपचार केला तर पूर्णपणे बरा होतो.
🔸 Fistula (भगंदर)
गुदद्वाराजवळ एक आतली tunnel तयार होते. सतत पू येतो, दुखतं. हा आपोआप कधीच बरा होत नाही. शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे.
🔸 Pilonidal Sinus
नितंबांच्या मध्ये केसांमुळे एक cyst तयार होते. बसणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त आढळतो. वारंवार सूज येते, पू होतो. यालाही शस्त्रक्रिया लागते.
सगळ्यात मोठी चूक जी रुग्ण करतात
❌ महिनोन्महिने "बघू, होईल बरं" म्हणत थांबणं
❌ YouTube वर उपाय शोधणं
❌ केमिस्टकडून स्वतःच क्रीम आणणं
❌ "ऑपरेशन म्हणजे खूप मोठी गोष्ट" असं घाबरून राहणं

Sukhayu Healthcare मध्ये आम्ही काय करतो?
* Allopathy आणि Ayurveda दोन्ही दृष्टिकोनातून तपासणी
* शस्त्रक्रिया लागते का की औषधांनीच होईल याचं प्रामाणिक मार्गदर्शन
* Advanced Surgery कमी वेदना, लवकर बरं होणं,
* Post-surgery diet आणि lifestyle guidance

कारण आमचं ध्येय एकच -
रुग्णाने लवकरात लवकर, कमीत कमी त्रासात, पूर्णपणे बरं व्हावं.
हे वाचलंत तर स्वतःसाठी नाही, तर तुमच्या घरातल्या त्या माणसासाठी हे शेअर करा
जो रोज वेदना सहन करतो, पण बोलत नाही.
जो "नंतर बघू" म्हणत राहतो.
जो डॉक्टरकडे जायची लाज बाळगतो.
त्याला सांगा लाज सोडा, उपचार घ्या. हे बरं होतं.

या विषयावर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. उत्तर नक्की मिळेल.

डॉ. सचिन जाधव
Sukhayu Healthcare | नाशिक

(ही माहिती वैद्यकीय जनजागृतीसाठी आहे. वैयक्तिक तक्रारींसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.)

02/05/2026

Deeply honored to receive the “गौरव गाथा” Achievement Award by Sakal Newspaper, Nashik. I am sincerely grateful for the trust my patients place in me every day.🙏

It is this faith and connection that continues to inspire me to serve with greater care, responsibility, and dedication.

30/04/2026

Honored to receive the “गौरव गाथा” Achievement Award by Sakal Newspaper, Nashik 🌟Grateful for this recognition that reflects a journey of dedication, patient trust, and continuous learning in healthcare. At Sukhayu Hospital, our vision remains to deliver ethical, compassionate, and advanced care to every patient we serve. Heartfelt thanks to Sakal Newspaper, my mentors, team, and patients for their constant support 🙏

This recognition only strengthens my commitment to healthcare excellence

30/04/2026

HIGH BLOOD PRESSURE?
DON'T IGNORE THE WARNING SIGNS.
EARLY DETECTION CAN SAVE YOUR LIFE
High blood pressure often shows no symptoms but can lead to serious health
risks like heart disease and stroke. Regular check-ups help you stay safe and in control.
POSSIBLE WARNING SIGNS
* Frequent Headaches
* Dizziness or Fatigue
* Chest Discomfort
* Shortness of Breath
OUR CARE INCLUDES
* Blood Pressure Monitoring
* Lifestyle & Diet Guidance
* Medication Management
* Regular Health Checkups
Take Control of Your Health Today!
Consult our experts at Sukhayu Hospital



Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

http://www.sukhayurved.in/

Address


Patil Lane No 1, Opp KBH High School, Canada Corner
Nashik
422002