Jaibhim Brigade

Jaibhim Brigade

Share

तुम्ही संविधान पेरले का? पेरले तर ते उगवले का ? उगवले तर ते जगवले का? जगवले तर त्याला फळे आले का?

06/06/2023

उत्सव सार्वभौमत्वाचा...
राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमानाची धगधगती ज्वाला उरी बाळगुन लोककल्याणकारी राज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या तमाम जनतेचा स्वप्नपुर्तीदिन:
#शिवराज्याभिषेक 🚩


६ जून | शिवराज्याभिषेक सोहळा २०२३
!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!

Adv. Pratik Kardak | Rushab Jadhav | Adv Ajinkya Gite | Balasaheb Kardak | Adv Sudip Vijay Nikam

14/05/2023

'ठेच कान्हूला लागली, यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले, कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग, कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया'
- मंगेश पाडगावकर
मातृदिनाच्या शुभेच्छा!

जयभीम ब्रिगेड
Adv. Pratik Kardak , Pratik Kardak , Rushab Jadhav , Adv Sudip Vijay Nikam , Adv Ajinkya Gite , Balasaheb Kardak

Photos from Jaibhim Brigade's post 10/05/2023

*सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे जय भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना थेट राजगृहावर येण्याचे निमंत्रण*
आज 10 मे 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व *रिपब्लिकन सेनेचे सरसैनाने मा. आनंदराज आंबेडकर साहेब* यांनी *जय भीम ब्रिगेड चे कार्याध्यक्ष ऍड. प्रतीक बाळासाहेब कर्डक* यांच्या " भीमगड ", पंचवटी, नाशिक निवासस्थानी भेट दिली.
आनंदराज आंबेडकर साहेबांनी जय भीम ब्रिगेडला पाठिंबा जाहीर केला आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. जय भीम ब्रिगेड च्या मागे आंबेडकर परिवार व रिपब्लिकन सेना ताकदीने नेहमीच उभी राहील अशी ग्वाही दिली. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा वारसा खऱ्या अर्थाने शिक्षित तरुण पुढे घेऊन जाऊ शकतो, जय भीम ब्रिगेड हे कार्य चिकाटीने करत राहील असा विश्वास व्यक्त केला व जय भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना थेट राजगृहावरती येण्याची निमंत्रण दिले.
सदर प्रसंगी समाज कल्याणचे भगवान वीर साहेब, चंद्रकांत गायकवाड सर, रवींद्र देवराम वाघ, राजू दाहीजे, योगेश आढाव, मोहन तांबे, विशाल तांबे, अजय निकम, जिजा दवंडे, सुनील आढाव, संपत जाधव, बबनराव जगताप, जगदीश पवार,अनिल गायकवाड, मुकेश झणके, निशा झणके, जावेद पठाण, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, जय भीम ब्रिगेड व रिपब्लिकन सेनेचे सैनिक व नाशिक शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

15/04/2023

"कायदे,अधिनियम आणि योजना ह्या कागदावर जन्माला येतात आणि कागदावर्च मृत्यु पवतात"
सर्वसामान्य जनते साठी असलेल्या योजना ह्या त्यांच्या परेंत पोहचवणयाचे व संविधान आणि त्यातील विशेष कायदयांची माहिती तळा गळातील लोकान परेंत पोहचवणयाचि मोहीम हातात घेऊन Jaibhim Brigade चे कार्याध्यक्ष Adv. Pratik Kardak यांची सर्व सहकार्यन सोबत कामास सुरुवात.

#जयभीम Adv Sudip Vijay Nikam Adv Ajinkya Gite Rushab Jadhav Balasaheb Kardak

13/04/2023

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची
तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Adv. Pratik Kardak Adv Ajinkya Gite Rushab Jadhav Adv Sudip Vijay Nikam Balasaheb Kardak

13/04/2023

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Adv. Pratik Kardak Adv Ajinkya Gite Rushab Jadhav Adv Sudip Vijay Nikam

Photos from Jaibhim Brigade's post 11/04/2023

संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करा
ऍड. प्रतीक कर्डक: जयभीम ब्रिगेडच्या संविधान राबवा अभियानाचा प्रारंभ

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल करून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, संविधानाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही येथील दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील मोठा वर्ग मूलभूत अधिकारापासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार, प्रशासनाने व्यापक प्रयत्न करावेत. यासाठी जयभीम ब्रिगेड, समाज आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करेल. असे प्रतिपादन ऍड. प्रतिक बाळासाहेब कर्डक यांनी केले. जयभीम ब्रिगेड संघटनेची स्थापना आणि संविधान राबवा अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब कर्डक, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ऍड. कर्डक म्हणाले की, देशात हरघर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. परंतु देशातील करोडो कुटूंबांकडे तिरंगा फडकवण्यासाठी हक्काचे घरच नाही ही शोकांतिका आहे. हीच परिस्थिती आरोग्यची आहे. गोर गरिबांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शिक्षणाचा अधिकारच हिरावाला जात आहे. तर अन्न सुरक्षा कायदा कागदावरच आहे. शिवाय रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आज समाजासमोर उभे आहेत. या प्रश्नांना घेऊन येत्या काळात संविधानिक मार्गाने लढा उभारणार असल्याचे ऍड कर्डक म्हणाले. यासाठी आंदोलन, मोर्चे, निवेदने या सर्व मार्गांचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना त्यांचे अधिकार माहिती करून देण्यासाठी कायदेविषयक शिबिरे, विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चंदनशिरवाळ यांनी आदिवासी समाजाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कॉप्टन कुणाल गायकवाड, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, संगीत विचारे, लक्ष्मीबाई कोंबडे, संदीप धात्रक आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मोहन तांबे, गोविंद कुटे, संजय जाधव, प्रकाश जाधव, राजू धायजे, रविंद्र वाघ, सुदीप निकम, मोहन तांबे संजय जाधव, विशाल तांबे, सागर, शाम गोंड, अशोक शिंदे, धरम शिंदे, संतोष शिंदे, यांच्यासह सामाजिक, राजकीय तसेच शिक्षण आदी क्षेत्रातील विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.

Photos from Jaibhim Brigade's post 11/04/2023

'"जयभीम आणि नीळा झेंडा हे कुठल्या एक जातीचे प्रतिक नाही, ते प्रतिक आहे अन्यायाविरुद्ध रक्त विहरीत क्रांति घडवून आणण्याचे, ज्यांना हे समजले त्यांची प्रगती झाली, ज्यांनी याचा अनर्थ केला ते देशोधड़ीला लागले".

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल करून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, संविधानाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही येथील दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील मोठा वर्ग मूलभूत अधिकारापासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवुन देण्या साथी महात्मा फुले जयंती निमित्ताने जयभीम ब्रिगेड ची स्थापना करण्यात आली.
Adv. Pratik Kardak Rushab Jadhav Balasaheb Kardak Adv Ajinkya Gite Adv Sudip Vijay Nikam

10/04/2023

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांनी जयभीम ब्रिगेड ला दिल्या शुभेच्छा !
#जयभीम #जयभीम_ब्रिगेड

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Nashik
422003