वंचित बहुजन आघाडी नाशिक

वंचित बहुजन आघाडी नाशिक

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वंचित बहुजन आघाडी नाशिक, Political organisation, Nashik.

26/02/2026

महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद

शिक्षण विरोधी भाजप सरकार मराठी शाळा बंद करून खासगी शाळांना चालना देण्याचा मनुवादी अजेंडा

#मराठी_शाळा

26/02/2026

अमेरिका ने भारत से होने वाले सोलर आयात पर 125% से अधिक टैरिफ लगा दिया है।

विश्वगुरु चुप क्यों है? क्या एपस्टीन फाइल की वजह से ब्लैकमेल हुए ‘मुजरा मोदी’ इस पर कुछ बोलेंगे?

भाजपा जवाब दो!

08/01/2026

📍जाहीर सभा - सोलापूर

ज्या पद्धतीने महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार यांनी मनुवादी व्यवस्था उध्वस्त केली आणि लोकशाही आणि मानवतावादी व्यवस्था आणली तिला टिकवण्याचे काम प्रत्येक फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी केले पाहिजे.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

ंधी_वंचितला

03/01/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाविरोधात आज मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा

मुंबई : ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेल्या कथित अपमानाच्या निषेधार्थ आज, शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत एक भव्य व ऐतिहासिक ‘महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.

या मोर्चामुळे राज्यभरात तीव्र राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या असून, आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.

हा विराट महामोर्चा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात येणार असून, यामध्ये लाखो कार्यकर्ते आणि अनुयायी भारतीय बौद्ध महासभा मोर्च्यात सहभागी होणार सहभागी होणार आहेत.


CSMT समोर शक्तिप्रदर्शन

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), फोर्ट परिसरात आज दुपारी १:३० वाजता या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.

नेमके प्रकरण काय?

ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. या घटनेने आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आणि प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठीच या महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

“हा मोर्चा केवळ निषेधासाठी नसून, अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली एक वज्रमुठ आहे,” असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपापल्या विहित गणवेशात (ड्रेस कोडमध्ये) मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार या महामोर्चाचे नियोजन करण्यात आले असून, अन्यायाविरुद्ध एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”

पोलीस बंदोबस्त, वाहतूक बदल

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा, नियंत्रण कक्ष आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. तसेच CSMT, फोर्ट आणि आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


















Photos from वंचित बहुजन आघाडी नाशिक's post 02/01/2026

बाबासाहेब आंबेडकर की तस्वीरें जलाना सीधे-सीधे राष्ट्र-विरोधी है।

ऐसा राष्ट्र-विरोधी व्यवहार सामाजिक, आर्थिक और राजनीतिक बदलाव के डर को दिखाता है, जहाँ उनकी पीढ़ियों से चली आ रही विशेषाधिकार वाली सामाजिक स्थिति अब सवालों से परे नहीं रही है। यह असहिष्णुता, भारत के संविधान द्वारा दिए गए समानता के वादे को न मानने की मानसिकता, दलितों के प्रति गहरी नफरत और दलित आत्मसम्मान की अभिव्यक्ति को अमानवीय बनाने का प्रमाण है।

यह मानना मुश्किल है कि यह भारत-विरोधी घटना भाजपा-शासित राज्य की मशीनरी के समर्थन के बिना हुई हो।

मैं फिर एक बार यह बहुत ही महत्वपूर्ण बात दोहरा देता हूँ - हमारा देश बाबासाहेब द्वारा दिए गए संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं।
हमारा देश फुले, शाहू और आंबेडकर की विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं।

CM Madhya Pradesh Madhya Pradesh Police राष्ट्र-विरोधी, समाज-विरोधी और देश को तोड़ने वालों पर सख़्त कार्रवाई आप कब करेंगे?

या फिर हम यह साफ़-साफ़ समझ लें कि उन्हें आपका पूरा सहयोग प्राप्त है और यह सब आपने मिलकर करवाया है?

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

02/01/2026

ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड

ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता शहरात दहशतीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक ७ (क) मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव खरात यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षांवर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खरात यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची वाहने रात्री उभी असताना काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहूनच विरोधकांनी घाबरून हे कृत्य केल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर संतोष खरात यांनी वर्तक नगर पोलीस ठाणे गाठले. आपल्या लोकशाही हक्काचा वापर करत असताना अशा प्रकारे नुकसान करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे.













01/01/2026

📍भीमा कोरेगाव

शौर्य दिन अभिवादन बाईक रॅली काढून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भीमसैनिकांसह शूरवीरांना मानवंदना दिली.

31/12/2025

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुक - 2026 वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार

वार्ड क्र. 193 भूषण चंद्रशेखर नागवेकर
वॉर्ड क्र. 194 शंकर (अशोक) व्यकटाद्री गुजेट्टी
वार्ड क्र. 195 ओंमकार मोहन पवार
वॉर्ड क्र. 196 ॲड. रचना अविनाश खुटे
वॉर्ड क्र. 197 अस्मिता शांताराम डोळस
वार्ड क्र. 199 नंदिनी गौतम जाधव

यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला

एक संधी मुंबईच्या विकासासाठी

ंधी_वंचितला

Photos from वंचित बहुजन आघाडी नाशिक's post 31/12/2025

वंचित बहुजन आघाडी राजुरा तालुका, जिल्हा चंद्रपूर पश्चिम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

नियुक्ती बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

31/12/2025

वंचित बहुजन आघाडी नागभीड तालुका कार्यकारिणी, चंद्रपूर पूर्व जिल्हा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

नियुक्ती बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

31/12/2025

वंचित-शोषितों के लिए लड़ने वाले

एकमात्र नेता
बालासाहब आंबेडकर💙💪✊

ंधी_वंचितला

31/12/2025

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुक - 2026

वंचित बहुजन आघाडीने 50% युवकांना उमेदवारी दिली आहे.

युवकांना राजकीय प्रतिनिधित्व देऊन विकासात्मक राजकारणासाठी, युवकांना संधी देणारा एकमेव पक्ष - वंचित बहुजन आघाडी

✅एक संधी - युवकांना
✅एक संधी - वंचित बहुजन आघाडीला

ंधी_वंचितला

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Nashik