विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक

विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक

Share

विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्

Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 17/02/2026

🎥📚 विचारक्रांती वाचनालयात आज CCTV कॅमेऱ्यांची यशस्वी स्थापना !

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाचनालयातील शिस्त, पारदर्शकता व संरक्षण लक्षात घेऊन आज ३ CCTV कॅमेरे बसविण्यात आले.

आता अभ्यासासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अधिक सुरक्षित, संरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळणार आहे.

📖 ज्ञानाच्या मंदिरात सुरक्षिततेची नवी पायरी…
🚀 विचारक्रांतीचा प्रवास अधिक सक्षम!

27/01/2026

मित्रांनो, दिनांक ११ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या विचारक्रांती युवा वक्ता – २०२६ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील काही निवडक, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी शेअर करत आहोत.
स्पर्धेतील सर्व व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर अपलोड केले जात आहेत.
आपण सर्वांनी आवर्जून चॅनलला Subscribe करा आणि तरुण वक्त्यांना प्रोत्साहन द्या. 🙏

🔗 YouTube चॅनल लिंक:
https://youtube.com/channel/UCJsniK5Xhn-N9BksZGiDRQw?si=wdoldSzTUrEReB_E

विचारक्रांती युवा वक्ता – २०२६
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
🥉 तिसरे क्रमांक पारितोषिक – आर्या जाधव, विदर्भ (अकोला)
विषय:- लोकशाहीचे वस्त्रहरण: कोसळते स्तंभ-न्याय, माध्यम, जनता की लोकशाही

टीप – हा व्हिडिओ अधिक स्पष्ट आणि चांगल्या आवाजात ऐकण्यासाठी कृपया हेडसेट / 🎧 चा वापर करा.

#विचारक्रांतीयुवावक्ता
#राज्यस्तरीयवक्तृत्वस्पर्धा




#मराठीवक्तृत्व




Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 21/01/2026

वक्तृत्व, प्रतिभा आणि यशाचा संगम… आमची स्पर्धा आता वृत्तपत्रात ! गर्वाचा क्षण ❤️

#राज्यस्तरीयवक्तृत्व
#वक्तृत्वस्पर्धा
#मराठीप्रतिभा
#यशाचा_क्षण





Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 15/01/2026

🔥 शब्दांतून समाजप्रबोधन!
राज्यभरातून आलेल्या तरुण वक्त्यांनी विचारांची क्रांती घडवली.
विचारक्रांती युवा वक्ता २०२६ मधील प्रत्येक स्पर्धकाचा आवाज समाजासाठी प्रेरणादायी ठरला

📸 स्टेजवरील काही अविस्मरणीय क्षण…
जिथे शब्दांनी मन जिंकले आणि विचारांनी दिशा दिली.

#विचारक्रांतीयुवावक्ता2026
#राज्यस्तरीयवक्तृत्वस्पर्धा




#वक्तृत्व
#मराठीवक्तृत्व





15/01/2026

विचारक्रांती वाचनालय, जाखोरी आयोजित
जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
विद्यार्थिनीने सादर केलेले
🎶 “देखीं है सारी दुनिया… जपान से लेके रशिया” 🎶
या गाण्यावरचे सुंदर नृत्य प्रेक्षकांची मनं जिंकून गेले 💃✨
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद खूप प्रेरणादायी ठरला.

#विचारक्रांतीवाचनालय
#जाखोरी
#वार्षिकस्नेहसंमेलन





#देखींहैसारीदुनिया

14/01/2026

💃🌸 ग्रामीण संस्कृतीचा ठेका… भक्तीचा नाद… 🌸💃
विचारक्रांती वाचनालय आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे
“लगीन देवाचं माझ्या खंडेरायाच”
हे अप्रतिम सादरीकरण पाहायला विसरू नका! ❤️🙌

विचारक्रांती वाचनालय
वार्षिक स्नेहसंमेलन2026, वर्ष 5 वे

#विचारक्रांतीवाचनालय
#वार्षिकस्नेहसंमेलन
#जिल्हापरिषदशाळा
#विद्यार्थिनींचेसादरीकरण
#लगीनदेवाचंमाझ्याखंडेरायाच
#मराठीसंस्कृती
#लोककला
#भक्तीगीत
#ग्रामीणसंस्कृती
#महाराष्ट्राचीसंस्कृती




Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 11/01/2026

🏆✨ #विजेते | विचारक्रांती युवा वक्ता – २०२६ ✨🏆
🎤 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 🎤 वर्ष ९वे

छत्रपती संभाजी नगरची वेदिका शिऊरकर हिने विचारक्रांती युवा वक्ता – २०२६ हा मानाचा किताब पटकावला 🥇
तर सायखेडा (नाशिक) येथील मराठा प्रसारक महाविद्यालयाच्या संघाने 🏆 विचारक्रांती करंडक जिंकत सांघिक विजेतेपद मिळवले 👏

🌟 वैयक्तिक पारितोषिक विजेते 🌟
🥇 प्रथम क्रमांक – वेदिका शिऊरकर, छ. संभाजी नगर
🥈 द्वितीय क्रमांक – सिद्धी गवळी, पिंपळगाव बसवंत
🥉 तृतीय क्रमांक – आर्या जाधव, अकोला
🏅 चतुर्थ क्रमांक – नाविन्या मिंदे, त्र्यंबकेश्वर

🎖️ उत्तेजनार्थ बक्षिसे 🎖️
१) कावेरी कासार – शेवगे दारणा, नाशिक
२) समिक्षा जगताप – ठाणगाव, सिन्नर
३) योगेश वाघचौरे – तळेगाव, चांदवड
४) सानिया सैय्यद – सायखेडा, नाशिक
५) श्रद्धा अहिनवे – पुणे

🏆 विचारक्रांती करंडक (सांघिक पारितोषिक) 🏆
MVP कॉलेज, सायखेडा
१. अवंतिका डेर्ले
२.सानिया सैय्यद
३. प्रजल सोनवणे
४. सानिका इंधे

🎉 सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या शब्दांनी विचारांना दिशा दिली 💐✨


#राज्यस्तरीयवक्तृत्वस्पर्धा
#विजयाचा_उत्सव
#विचारांचीक्रांती

Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 10/01/2026

🎭✨ विचारांची रंगत… संस्कृतीची झलक! ✨🎭

विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय, जाखोरी यांच्या वतीने आज संध्याकाळी (शनिवार दिनांक १० जानेवारी रोजी) अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झालेला सांस्कृतिक कार्यक्रम 💃🕺🎶 नृत्य, 🎵 गीत, 🎤 सादरीकरण आणि कलाकारांच्या मनमोहक कलाविष्कारांनी संपूर्ण परिसर संस्कृती, आनंद आणि एकोप्याने भारावून गेला.

👧👦 युवक-युवती, ग्रामस्थ व रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम स्मरणीय ठरला ❤️

🙏 या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व कलाकारांचे, उपस्थितांचे व संयोजकांचे मनःपूर्वक आभार!
📸 कार्यक्रमातील काही सुंदर क्षण…
#विचारक्रांतीवाचनालय
#सांस्कृतिककार्यक्रम
#कला_संस्कृती
#जाखोरी

09/01/2026

स्टेज सज्ज… विचारांना आणि संस्कृतीला व्यासपीठ सज्ज!

📚 विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका, जाखोरी📍 ता. जि. नाशिक यांच्या वतीने आयोजित

🔥 दोन दिवस… दोन भव्य कार्यक्रम… एकच विचारांचा उत्सव!

🎭वार्षिक स्नेहसंमेलन
💃🕺 नृत्य • सांस्कृतिक सादरीकरण • कला व अभिव्यक्तीचा जल्लोष
🗓️ शनिवार, १०/०१/२०२६
⏰ सायं. ६ वा.

🎙️ विचारक्रांती युवा वक्ता – २०२६
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
🗓️ रविवार, ११/०१/२०२६
⏰ सकाळी ९ वा.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवक-युवतींचे
🔥 विचार • शब्द • आत्मविश्वास • वैचारिक संघर्ष

📍 कार्यक्रम स्थळ :
🛕 मारुती मंदिर, जाखोरी
ता. जि. नाशिक

📣 सर्व विचारवंत, पालक, शिक्षक, युवक-युवती व ग्रामस्थांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन!
🤝 तुमची उपस्थिती म्हणजे आमच्यासाठी मोठा उत्साह व बळ

✨ विचारांचा उत्सव अनुभवायला नक्की या! ✨

📸🎥 फोटो • व्हिडिओ • आठवणी • प्रेरणा

📌 Follow us :
🔵 Facebook :
📸 Instagram :
▶️ YouTube
@विचारक्रांती_वाचनालय_जाखोरी

🎙️ विचारांची क्रांती… युवकांची शक्ती… संस्कृतीची ओळख! 🎙️

Photos from विचारक्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका जाखोरी, नाशिक's post 08/01/2026

🎙️💃✨ स्टेज सज्ज… विचार, शब्द आणि कलांना व्यासपीठ सज्ज! ✨🎶

विचारक्रांती आयोजित
🌟 वार्षिक स्नेहसंमेलन – शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६
🎶 नृत्य • कला • सादरीकरणांचा रंगतदार उत्सव
आणि
🏆 विचारक्रांती युवा वक्ता – राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा – रविवारी दिनांक ११ जानेवारी २०२६
या दोन्ही भव्य कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेले स्टेज बॅकग्राऊंड बॅनर
विचारांची उंची, शब्दांची ताकद
आणि 🎵 नृत्य-कलेची ऊर्जा
यांना अधिकच भव्य व प्रेरणादायी स्वरूप देत आहेत.

🎤 मंचावर उमटणारे विचार,
💃 नृत्यातून साकारलेली कला,
👏 प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद,
🔥 तरुणाईचा आत्मविश्वास
यांनी सजलेला हा मंच
कार्यक्रमाच्या गौरवात मोलाची भर घालणार आहे.
🙏 सर्व स्पर्धक, कलाकार, पालक, शिक्षक
आणि रसिक प्रेक्षकांचे
या वैचारिक व सांस्कृतिक पर्वात
मनःपूर्वक स्वागत! 🌼

— टीम विचारक्रांती, जाखोरी 🌸

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Nashik
422102