04/02/2026
नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके व उपमहापौर पदासाठी श्री. मच्छिंद्र भाऊ सानप यांची उमेदवारी एकमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
Himgauri Adke
Machhindra Mla Balasaheb Mahadu Sanap
04/02/2026
भारत-अमेरिका संबंधांमधील हे नवे पर्व खरोखरच अभिनंदनीय आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय तरुणांसाठी रोज प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होत आहेत. हा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसह 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' या मोहिमांना नवी गती देणारा ठरेल. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष Nitin Nabin जी
17/12/2021
जनतेच्या मनातील प्रश्न आज ‘दिव्य मराठी‘ने उपस्थित केला आहे.
03/05/2021
आज भाजपने आसाम जिंकले, भाजपने पोंडीचेरी जिंकले, भाजपने पंढरपूर आणि बेळगाँव जिंकले, भाजपने बंगालमध्ये ३ वरून ७५+ जागा आणल्या.
यातही ज्यांना भाजपचा पराभव दिसत असेल त्यांनी आयुष्मान भारत योजनेतून मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घ्यावे
29/04/2021
नाशिक जिल्ह्यास ऑक्सीजन व रेमडीसीवर मिळवण्यासाठी भाजपा नेत्यांचा मुंबईत एफ डी ए कार्यालयात ठिय्या.
नाशिक जिल्हा हा कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडला असून जिल्हाभरात अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे .वाढत्या रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी 400 ते500 रेमडीसीवर इंजेक्शन चा पुरवठा नासिक जिल्ह्याला होत असल्याने अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत तसेच नाशिक जिल्ह्यासाठी125 मेट्रिक टन ऑक्सीजन ची गरज असतांना तो फक्त सरासरी70 मेट्रिक टन च मिळत असल्याने अनेक रुग्ण हे ऑक्सीजन अभावी दगावत आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविनजी दरेकर, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचे महापौर सतीश कुलकर्णी ,दिंडोरी लोकसभेच्या खा. डॉ भारती पवार ,आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुलजी ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, नाशिक शहराध्यक्ष गिरीशजी पालवे , संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांतजी जाधव भाजपा सभागृह नेते सतिशजी सोनवणे भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी एफ डी ए चे सेक्रेटरी विजय सौरभ यांचेशी चर्चा केली व त्यांना नाशिक जिल्ह्याची परिस्थिती अवगत केली व जो पर्यंत ह्यावर योग्य तोडगा निघत नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका सर्व शिष्टमंडळाने घेतली असता त्यांनी नाशिक साठी 100 मेट्रिक टन ऑक्सीजन आणि सुमारे 2000 रेमडीसीवर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले.
तसेच ही बैठक चालू असतांना एफ डी ए चे आयुक्त परिमल सिंग , एफ डी. ए .महाराष्ट्र उप आयुक्त विजयजी वाघमारे ,नाशिक चे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेसह सर्व शिष्ट मंडळाची तातडीने व्हिडिओ काँफेरन्स घेणात आली व नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी वाढीव रेमडीसीवर व ऑक्सीजन उपलब्ध करून घेण्याचे लेखी आश्वासन घेतले ह्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना पुरेशा प्रमाणात उपचारासाठी रेमडीसीवर व ऑक्सीजन मिळण्यास मदत होणार आहे
27/04/2021
Read carefully.
22% of India's population lives in Congress ruled states.
52% actives cases are being reported in Congress ruled states.
44% deaths are being reported in Congress ruled states.
Point to ponder!! https://t.co/j5WodZsOFT
19/08/2020
सुशिक्षित बेरोजगार तरूण तरूणींसाठी सुवर्णसंधी. प्रदेश सरचिटणीस, भाजपा तथा प्रा. आ सौ. देवयानीताई सुहास फरांदे आणि डॉ. प्रशांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावा, २०२०. पुढिल लिंकवर टिक करून आपला अर्ज भरा
Google Forms - create and analyze surveys, for free.
Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.
13/08/2020
*फेम इंडिया - एशिया तर्फे देशातील 31 विधानसभा मध्ये काम करणाऱ्या 3958 आमदारांचे सर्वेक्षण करून देशातील उत्कृष्ठ काम कारणार्या 50 आमदारां मध्ये प्रा. देवयानी फरांदे यांची निवड*
नाशिक- फेम इंडिया - एशिया पोस्ट या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणात भविष्यवादी श्रेणीत मध्य नाशिक मतदार संघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची निवड करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे देशभरातील आमदारांचे सर्वेक्षण करुन ही निवड करण्यात आली आहे. यामुळे नाशिकच्या लौकीकात भर पडल्याचे मानले जात आहे.
फेम इंडिया - एशिया पोस्ट तर्फे वेगवेगळ्या ५० श्रेणींसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संबंधित लोकप्रतिनिधिची सामाजिक प्रतिमा, लोकप्रियता, कार्यशैली, प्रभाव, जनतेबरोबर आस्थेचे संबंध, जनहिताचे कार्य, विधानसभेतील उपस्थितीती, सभागृहात केलेली भाषणे, मुद्दे मांडण्याची शैली आणि एकूणच नेतृत्व गुण या बाबीं यात विचार करण्यात आला आहे. यात भविष्यवादी आमदार या श्रेणीत आ. फरांदे यांची निवड झाली आहे. आमदार देवयानी फरांदे तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षात कार्यरत आहे. 1997 ते 2014 या कालावधीत तीन वेळा नगरसेवक, नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर या पदावर त्यांनी प्रभावीपणे काम केलेले आहे. विधानसभेत पक्षप्रतोद या महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. सध्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून देखील कर्तव्य बजावत आहे. विधानसभा सदस्य म्हणून निवडून येण्याची त्यांची ही दुसरी वेळ असताना राष्ट्रीय मासिकाने या कामाची दखल घेऊन देशात उत्कृष्ट काम करणार्या 50 आमदारां मध्ये त्यांची निवड होणे ही मोठी बाब असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समाजासाठी चांगले योगदान देणार्यांना पुढे आणणे आणि त्यांना पुढे आणणे हा फेमचा इंडियाचा उद्देश आहे. जे चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे फेम इंडियाने स्पष्ट केले आहे. देशभरातील ३१ विधानसभांमध्ये ४ हजार १२३ आमदार कार्यरत असतात. मात्र सध्या एक विधानसभा गठीत झालेली नाही आणि १६५ जागा रिक्त आहे. या अनुषंगाने एकूण ३ हजार ९५८ आमदारांचे सर्वेक्षण करुन फेम इंडिया- एशिया पोस्टने हे निकाल पुढे आणले आहेत.
महाराष्ट्रातील चार आमदारांची निवड-
यात प्रेरक श्रेणीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार , उत्कृष्ठ शैलीत आशिष शेलार, भविष्यवादी श्रेणीत नाशिकच्या प्रा. देवयानी फरांदे, दूरदर्शी श्रेणीत वर्सोवाच्या डॉ. भारती लव्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.
फेम इंडिया - एशिया पोस्ट 50 उम्दा विधायक सर्वे 2020
राजनीतिक पथ पर स्थापित रहना मुश्किल , जरूरी है दायित्व बोध के लिए प्रोत्साहन