01/07/2020
ज्याच्या मुळे तुझ्यात रंग आहे, जो तुझ्यासाठी झटण्यात दंग आहे,
समोर बघ तो विटेवरी उभा आहे,तोच तुझा पांडुरंग आहे 🙏🙏
Come join us�
01/07/2020
ज्याच्या मुळे तुझ्यात रंग आहे, जो तुझ्यासाठी झटण्यात दंग आहे,
समोर बघ तो विटेवरी उभा आहे,तोच तुझा पांडुरंग आहे 🙏🙏
04/06/2020
परकीय जुलमी इस्लामी सत्तेच्या छाताडावर पाय ठेऊन
हिंदूंचे सत्व स्वाभिमानाचे स्वतंत्र हिंदवी स्वराज्य चे ३२ मन सुवर्ण सिंहासन स्थापन करणारे ⚔️हिंदुपदपातशहा⚔️ शककर्ते
🚩पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवजी महाराज🚩
यांच्या ३४७ वा
🚩श्रीराज्यभिषेक सोहळा, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी,
शिवशक ३४७ आरंभ🚩
21/05/2020
Arsenic album 30 हे कोरोना--covid 19 वर प्रतिबंधत्मक homopathic औषध असलेबाबत आयुष मंत्रालयामार्फत घोषित केले आहे .
या औषधाने रोगप्रतिकारकशक्ती चांगली रहात असल्याने हे उपयोगी ठरत आहे
हे homopathic औषध कोरोना च्या काळात duty वर असणाऱ्या सर्वं पोलिसांनाही देण्यात आले असुन ,
Dr .श्री राहुल यादव ,
होमिओपॅथी एम.डी.
यांचे सल्यानुसार Arsenic album 30 हे औषध आपण देत आहोत .
Lockdown चा हा चौथा phase सुरू आहे .
आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व आपली रोगप्रतकारकशक्ती वाढावी , चांगली रहावी यासाठी सदरच्या औषधाचे आपण मोफत वाटप करत आहोत .
आपण सर्वांनी तसेच आपल्या शेजारी असणाऱ्या सर्वं नागरिकांनाही या बाबत अवगत करून सदरचे औषध आपण नक्की घ्यावे .
जर आपणांस नाही मिळाले तर औषध मोफत ऑफीसवरून घेऊन जावे .
आपलाच
मा.श्री सतीश (बापु) सोनवणे
सभागृह नेता तथा नगरसेवक प्रभाग क्र. ३०
घरी थांबा, कोरोना टाळा, प्रशासनाला सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घ्या आपल्या परिवाराची काळजी
18/05/2020
*आपल्या युनिक परिवारातील तसेच प्रभाग क्र.30 मधल्या अनेक सदस्यांनी Lockdown च्या काळात समाजपयोगी मदत , कोणते कार्य केले असेल अश्या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन*
*कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती, संस्था, आपली सोसायटी*
कोरोनाच्या महामारीत अवघे जग हादरलंय... मात्र याही परिस्थितीत शासनाला, प्रशासनाला मदत करत प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी पार पाडतोय...
सामाजिक बांधिलकी जपत महामारीत कोरोनाबाबत जनजागृती, मदतीला धावून जाणारे घटक नक्कीच मोलाची भूमिका बजावताहेत... आपणही काही आपल्या उपक्रमाची छायाचित्रे आमच्याकडे पाठवा.
आपले योगदान नक्कीच प्रशासन, शासनाला व आपल्या *युनिक परिवाराला* अभिमानास्पद आहे...
*आपलेच*
*सभागृह नेता तथा नगरसेवक प्र.क्र.३० चे नगरसेवक श्र सतीश (बापु) सोनवणे*
*कोरोनाला हरवूयात... प्रशासनाला सहकार्य करत सामाजिक भान जपूयात...*
14/05/2020
प्रसाद होऊनी, भवानी आईचा पुरंदरी
जणू प्रचंड दुर्ग जन्मला🚩
दऱ्या, नभामधून, सप्त सागरामधून
घोष शंभू शंभू येऊ लागला🚩
धर्मवीर श्री श्री शंभूराजे जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩
आज दि. १३.५.२० रोजी कोरोनाचे १५ अहवाल प्राप्त झाले, त्यातील १ जण *राजीवनगर येथील टेक्नोफोर्स या अपार्टमेंट मधील रहिवासी आहेत.* त्या नाशिक सिव्हील रूग्णालयात परिचारिका आहेत. त्या कोरोनाग्रसतांना सेवा देतांना कोरोना बाधित झाल्या आहेत. तरी नागरीकांनी घाबरून जाऊ नये.
त्या देत असलेल्या सेवेसाठी त्यांना युनिक ग्रुपचा सलाम🙏🏻
*घरी रहा, सुरक्षित रहा*
सतीश(बापु)सोनवणे
नगरसेवक तथा सभागृह नेता
प्रभाग क्रं. ३०
12/05/2020
रूग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असलेल्या तमाम परिचाराकांच्या कार्याला मनापासून #सलाम..!
10/05/2020
दखल घेतल्याबद्दल वृत्तपत्रांचे आभार.
भारतीय जनता पार्टी च्या आदेशानुसार सभागृह नेता श्री. सतीश बापू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयाने आजपावेतो गरीब कामगार कुटुंबामध्ये रोज ५०० लिटर दुधाचे वाटप त्याचप्रमाणे वसाहतीतील पाच हजार गरजू कुटुंबांमध्ये धान्याचे किट वाटप. मध्यमवर्ग कुटुंबे जी अडचणीत होती अश्या ३०० कुटुंबांचा माग काढत त्यांच्याही घरात आवश्यक तेवढा किराणा पोहोचविला गेलाय. मुंबईतून मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचे स्थलांतर चालू असताना त्यांना जेवणाचे डबे व पादत्राणे पुरविण्यात आले. नाशिक मधून स्वगृही जाण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना त्याचप्रमाणे नाशिक मध्ये स्वगृही येण्यासाठी अडकलेल्या नागरिकांना परवानगी काढून देण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रुप च्या सदस्यांनी पोलिसमित्र म्हणून इंदिरा नगर पोलिस ठाणे हद्दीत पोलिस प्रशासनाला मदत केली. तसेच आमच्या या कार्याला प्रभागातील नागरिकांनी हातभार लावला त्याबद्दल त्यांचे आभार.
टीप : प्रसिद्धीचा हेतू नसून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा हेतू आहे त्याचप्रमाणे कोणी गरजू असल्यास कळवावे🙏😇
मदतीसाठी सदैव तत्पर🙏
Satish Bapu Sonawane
Bhartiya Janata Party BJP
सुप्रभात🙏आपल्या सर्वाना माहितच आहे,की या कोरोनाच्या संकटात गेल्या 1.5 महिन्या पासून Satish Bapu Sonawane यांच्या मार्गदर्शना नुसार आपण अन्न,धान्य,दुध,मासक व सेनिटाइज़र चे वाटप गरजू लोकान मधे करत आहोत,त्याच प्रमाणे आपण आज पासुन रोज साय 7 वाजता,highway वरुन जाणारे मजूर याना जेवणाचे वाटप करणार आहोत,रोज 600 700 गरिब मजुराना जेवण देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.या कार्यात मदत करण्यास आपण कोणही इच्छुक असाल तर जरूर संपर्क करा,आपली छोटी मदत अनेक गरीबांचे पोट भरु शकते🙏
संपर्क:अनिकेत सोनवणे:8087303045
रोहित परब:8390988822
मदत नव्हे तर जबाबदारी🙏🚩
जय श्रीराम,🙏
07/05/2020
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते.
महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!💐💐💐
#नमो_बुद्धाय !!!
नमस्कार,हा पेज पुन्हा नव्याने सुरु करत आहोत,यात unique group ने केलेले सामाजिक उपक्रम,येणारे नवे कार्यक्रम याची माहिती आपल्याला भेटेल,जसा प्रतिसाद आपण आपल्या कार्यक्रमाना देता,तसेच प्रेम या पेज ला मिळेल अशी आशा बाळगतो🙏
युनिक ग्रुप आयोजित १ मे महाराष्ट्र दिना निमित्त सेवानिवृत्त कामगार सत्कार सोहळा तसेच महाराष्ट्र गीते व मराठी गीतांचा कार्यक्रम तसेच १०० मराठमोळे खाद्य पदार्थांचे स्टॉल ई. कार्यक्रमांचे आयोजन केले असुन आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
दि.१ मे २०१६, सायं,०६ :०० वा,
ठिकाण:युनिक मैदान,राजीवनगर.
आयोजक:- श्री.सतीश (बापु) सोनवणे,नगरसेवक प्र.क्र.५३