सागर अ शेळके

सागर अ शेळके

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सागर अ शेळके, सातपूर, Nashik.

Photos 13/06/2017

श्री क्षेत्र #जेजुरी येथील #कुलदैवत श्री #खंडोबा मंदिरामधील #चांदीचा जुना #मंडप काढुन नविन #सोन्याचांदीचा #गाभारा #बनवण्यात येणार आहे...... !! #जय #मल्हार !!.,,,,,,,

Photos 11/06/2017

शिवराय सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहेत पण शिवरायांना अंगीकरणे खुप कठीण आहे.
आणि जो शिवरायांना स्वत:च्या आचारणात आणेल तो या जगावर राज्य करेल ऐवढे मात्र नक्की..."
*जय शिवराय मित्रांनो*

*कोवळ्या वयात प्रगल्भ न्यायबुद्धीचा परिचय देत रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे शिवाजी महाराज

*शहाजीमहाराज आदिलशहाच्या कैदेत असताना कर्तव्याला प्राधान्य देत आदिलशाहच्या सरदार फत्तेह खानाला धूळ चारणारे शिवाजी महाराज
*प्राणप्रिय पत्नीच्या निधनानंतर दुःखाचा डोंगर दूर सारून अवघ्या २ महिन्यांत अफजलखानाला यमसदनी घडणारे शिवाजी महाराज
*आग्ऱ्यातून सुटकेनंतर लहानग्या शंभूराजेंना त्रयस्थांकडे सुपूर्द करून राजगडकडे वाटचाल करणारे शिवाजी महाराज

*कर्तव्यपालनात कसूर करताच आपल्या अत्यंत जुन्या व विश्वासू *सरदारांना (नेताजी पालकर) क्षणार्धात दूर लोटणारे शिवाजी महाराज.
*साडेतीनशेहूनही अधिक किल्यांचे गडपती असताना देखील एकाही किल्याला आपले स्वतःचे अथवा आपल्या कुटुंबियांचे नाव न देणारे शिवाजी महाराज.

*स्वराज्याचे उद्दात ध्येय उराशी बाळगत आणि सर्व कसोट्यांवर खरे उतरत कठोर परिश्रमानंतर स्वतःचा राज्याभिषेक करवून घेणारे शिवाजीमहाराज. (आधी रयतेच्या घरी बसायला पाट मग स्वतःचा राजपाट.)

शिवाजीमहाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात कर्तव्यासमोर भावनांना कधीच स्थान दिले नाही.

सांगणे इतकेच शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला भावनिक(emotional) नव्हे तर कर्तव्यकठोर(practical) होण्यासाठी प्रेरित करत असतो.

Duty First हा शिवाजीमहाराजांनी यश मंत्र कधीच विसरता कामा नये... हीच शिवाजीमहाराजांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.

☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

Photos 10/06/2017

*ज्ञानेश्वरीतील नावे........*

" मी पणा " ची *निवृत्ती* व्हावी म्हणुन पहिला *निवृत्ती*

*निवृत्ती* झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा *ज्ञानदेव*

*ज्ञान* प्राप्त झाले की जीवनमार्ग *सोपा* होतो म्हणुन तिसरा *सोपान*

ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा *मुक्त* होतो म्हणुन चौथी *मुक्ताई* .

*निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत.*

*_राम कृष्ण हरि_*

10/06/2017
Photos 10/06/2017

“मेरी झॉंसी नहीं दूंगी”, म्हणत बेडरपणे इंग्रजांशी भिडलेल्या राणी लक्ष्मीबाईंस स्मृती दिनानिमित्त झी मराठी जागृतीचा सादर प्रणाम!

Photos 10/06/2017

काही प्रेरणादायक व नवी उमंग करण्याची एक धडपड तर त्यामधून एक यशस्वी किरणं
-------------------------------------------------------
अशीच एक कोल्हापुरातील त्या कॉलेज तरुणीची एक धडपड व, आपलं आयुष्य आपण नव्या व आपल्या स्वतःच्या हिमतीवर कस साध्य करता येते हे तुम्ही सुद्धा थोडे पाहून घ्या....... मित्रांनो

कोल्हापूर मधील विठ्ठल कामत यांनी ताट, वाट्या, प्लेट धुवत, धुवत हॉटेल विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले, हे ऐकायला, वाचायला चांगले वाटते; पण प्रत्यक्षात असं काम करायचं म्हटलं की, बहुतेकांना ते नको वाटते. मात्र या तिघींनी ठरवलं, आपण एखादी प्रेरणा घेतली तर ती आपल्या परीने पूर्ण करायची आणि त्यांनी तसं करूनही दाखवलं. ऐश्वर्या, श्रद्धा व गीता या महाविद्यालयीन युवतींनी आठवड्यापूर्वी अंबाई टॅंकसमोर चक्क पाणीपुरी, शेवपुरीची गाडी चालू केली. ज्या वयात आई-पप्पांकडून पॉकेटमनी घेऊन पाणीपुरी- शेवपुरीवर ताव मारायचा, त्या वयात त्यांनीच पाणीपुरी-शेवपुरी तयार करत आपल्या पॉकेटमनीसाठी वेगळी पायवाट मळायला सुरवात केली.

ऐश्वर्या विजय शिंदे, गीता संजय पवार व श्रद्धा संजय माळकर या मैत्रिणींच्या जिद्दीची ही एक वेगळी कथा आहे. ऐश्वर्या, गीता राजाराम महाविद्यालयात विज्ञान शाखेत (एफ.वाय.) शिकतात तर श्रद्धा डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्टच्या दुसऱ्या वर्षाला आहे. या त्यांच्या शिक्षणात व्यवस्थित; पण यांना काही तरी वेगळे करायची धडपड. त्यातही अनेक मर्यादा. मग त्यांनी ठरवलं की खाद्य क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं. अर्थात मोठे हॉटेल त्या उभं करू शकत नव्हत्या. मोक्याच्या ठिकाणी मोठी जागा भाड्याने घेऊ शकत नव्हत्या. त्यांनी त्यातून मार्ग शोधण्यास सुरवात केली व रंकाळा, अंबाई टॅंकसमोरच्या रस्त्यावर त्यांना ‘मार्ग’ मिळाला. त्यांनी तेथे चक्क हातगाडीवर पाणीपुरी, शेवपुरी विकायचे ठरवले. घरी परवानगी मिळाली; पण ‘रस्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी, शेवपुरी विकायची, तीही मुलींनी...’ अशी कुजबूजही सुरू झाली; पण या तिघी ठाम.

त्यांनी मुहूर्त वगैरे काहीही न बघता एक दिवस हातगाडी सुरू केली. पुरी, चिंचेचे पाणी, धण्याचं पाणी, शेव, रगडा, दही याची सांगड घालता घालता तिघींची लगबग होऊ लागली.

पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी, मसालापुरी, चुरापुरी असे वेगवेगळे प्रकार करण्यात त्यांचा आता हात बसला आहे. त्यांच्या हाताला चव तर आहेच; पण त्याला वेगळ्या धडपडीची किनारही आहे. हे करता करता ऐश्वर्या, गीताचे बी.एस्सी.चे व श्रद्धाचे आर्किटेक्टचे शिक्षणही चालू राहणार आहे. प्रेरणादायी कथा ऐकणे, वाचणे सोपे असते; पण प्रेरणा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात उतरवणे कसे आवश्यक असते, हेच या तिघींनी दाखवून दिले आहे.

पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद
तीन कॉलेजकुमारींना हातगाडीवर बघून लोकांना पहिल्यांदा या तिघीच पाणीपुरी, दहीपुरी खायला उभ्या असलेल्या ग्राहक वाटायच्या; पण नंतर लक्षात आले की, या तिघीच ही गाडी चालवतात. आता त्यांना पहिल्या आठवड्यातच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांची लगबग सुरू आहे. काका, मामा, दादा, भावा, काकू, मावशी असा ग्राहकांशी संवाद साधत त्यांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे.

Photos 10/06/2017

Shree Tuljabhavani evening Abhishek puja on 02/06/2027

Photos 07/06/2017

एका जंगलामध्ये एक साधू आपल्या झोपडीमध्ये राहत असत. त्याच जंगलामध्ये एक पारधी दररोज शिकारीला जात असायचा. साधू बाबांच्या झोपडी समोरून त्याच जाण होत असे. पण त्याचा एक नियम होता, तो नेहमी त्या साधूबाबांना वंदन दर्शन करून च जायचा. एके दिवशी तो पारधी साधूबाबांना म्हणाला, मी तर जंगलामध्ये हरिणांची शिकार करतो. पण आपण कोणाची शिकार करण्यासाठी जंगलात बसला आहात,त्यावर ते साधूबाबा बोलले श्रीकृष्णा ची. एवढे बोलून ते रडू लागले. त्यावेळी तो पारधी विचारतो बाबा आपण का रडता ? मला सांगा तो कसा दिसतो ? मी पकडून आणतो. साधूबाबांनी भगवंतांचे स्वरूप सांगितले. त्याचा रंग सावळा आहे,बासरी वाजवतो, मोरपंख परिधान करतो. पारधी म्हणतो ठीक आहे जोपर्यंत तुमचे सावज पकडणार नाही तोपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही. जंगलात त्याने जाळे पसरून ठेवले आणि लपून बसला. एक,दोन,तीन दिवस झाले भगवंतांला दया आली. भगवान स्वतः बासरी वाजवत वाजवत आले. आणि स्वतःच त्याच जाळ्यात मुद्दाम अडकले.पारधी आनंदा ने ओरडू लागला. सावज साप डले, सावज सापडले. पारधी म्हणतो,काय रे, तीन दिवस.बिना अन्नपाण्याचे ठेवले, आत्ता बरा,सापडलास ? भगवान् श्रीकृष्णाला त्याने सावजाप्रमाणे खांद्यावर घालून तो साधूबाबांकडे पोहचला. बाबाजी आपले सावज घेऊन आलोय. साधूबाबा पाहतात तर काय, पारध्याच्या खांद्यावर श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या जाळ्यात आहेत, व हसत.आहेत. साधूबाबा भगवंतांच्या चरणी लीन झाले नतमस्तक झाले. आणि भगवंतांला बोलू लागले, मी लहानपणीच तुला शोधायला घराबाहेर पडलोपण तु नाही भेटलास आणि ह्या पारध्याला तीन दिवसात सापडलास ? भगवान् सांग तात,या पारध्यानी तुझा.आश्रय घेतला. म्हणून त्याला तीन दिवसांत दर्शन झाले. अर्थात कायतर भगवान् पहिली कृपा त्याच्यावर कर तात जे भगवंतांच्या भक्तांचे चरण आपल्या हृदयात ठेव तात. पारध्याला माहीतही नव्हतेकी,भगवंत कोणआहेत. परंतु तो दररोज त्या साधुबाबां चे दर्शन आणि त्यांना प्रणाम करत असे. संतांच्या दर्शनाचा आणि त्याना वंदन करण्याचे फळ हेचकी त्या पारध्याला भगवंतांचे दर्शन तीन दिवसात झाले.
Today's Jeshta Shukla dwadashi Shree Shalivahan shake 1939 Hemlambnaam Sanvatsare Tuesday 6 June 2017. Darshan of shri. Saptashrungi Mata.
आजचे जेष्ठ शुक्ल व्दादशी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबनाम संवत्सरे मंगळवार ,दि. ६ जून २०१७.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मिका स्वरूपिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी जगदंबा श्री. सप्तशृंगी निवासिनी मातेचे आजचे दर्शन.
🌹🌹 *॥ जय माता दी ॥ * 🌹🌹 ,

Photos 16/01/2016

📢📢📢📢📢📢📢📢📢📢📢

राष्ट्रीय प्लस पोलिओ लसिकरण मोहीम

पोलिओ रविवार

17 जानेवारी 2016
21फेब्रुवारी 2016

या दिवशी 5 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ डोस अवश्य पाजा.

# यापूर्वी पोलिओचा डोस दिलेला असला तरीही
# बाळ आजारी असले तरीही
# बाळ नुकतेच जन्मलेले असले तरीही

आपण प्रवासात असाल तरीही डोस पाजन्यास विसरु नका, आता पोलिओ बूथ सर्व रेल्वेस्टेशन🚋, बस स्थानके🚌, येथे आयोजित केली आहे.

दोन थेंब💧💧 जीवनाचे,
लस दया पोलिओचे.

लस दया बाळा, पोलिओ टाळा.

लसिकरणाला साथ करा, पोलिओवर मात करा.

विसरु नका लसिकरण अवश्य करा.

आपलेच:- सौ ऊषाताई शेळके सभापति तथा नगरसेविका प्रभाग क्र 19
नाशिक महानगर पालिका - आरोग्य विभाग नाशिक

Photos 03/01/2016

आज ३ जानेवारी...
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती,
महिला मुक्तिदीन,
स्त्री-पुरुष साक्षरता संग्रामाच्या आद्य 'ज्योत', क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांस विनम्र अभिवादन..
सर्व भागिणींस-बांधवास क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीच्या हार्दिक सदिच्छा...

Photos 28/11/2015
Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

सातपूर
Nashik
422007