19/04/2026
अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा! ✨🌼
ही पवित्र तिथी आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अखंड आनंद घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🌟
सोन्यासारखी उजळलेली स्वप्ने पूर्ण होवोत,
आणि प्रत्येक दिवस यशाने भरून जावो! 💛
— सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्रमांक २५
नाशिक महानगरपालिका, नाशिक
#अक्षयतृतीया # शुभेच्छा
15/04/2026
भव्य पापड महोत्सवासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏✨
सहकार भारती व राणी भवन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारा आहे. अशा सुंदर आणि उपयुक्त कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे. 😊
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🌟
— सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्र. २५
नाशिक महानगरपालिका
LocalBusiness NashikCity CulturalEvent FoodFestival SupportLocal
29/03/2026
📌 प्रभाग २५ मधील नागरी समस्यांबाबत निवेदन –
नगरसेविका सौ. कविता अमोल नाईक यांनी प्रभागातील विविध नागरी समस्यांबाबत विभागीय अधिकारी मा. श्री. नानासाहेब साळवे यांना सविस्तर निवेदन सादर केले. 📝
🔹 मुख्य मागण्या व मुद्दे:
🛣️ रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे व नवीन रस्ते तात्काळ करणे
🚧 योग्य ठिकाणी स्पीडब्रेकर बसविणे
💧 ड्रेनेज चेंबर दुरुस्ती, नवीन चेंबर बसविणे व नाले साफसफाई
🌧️ पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी व आवश्यक उपाययोजना
🦟 डास नियंत्रणासाठी नियमित फॉगिंग
🗑️ घनकचरा व्यवस्थापन सुधारणा व वेळेवर कचरा उचल
🏚️ धोकादायक इमारतींची दुरुस्ती व सार्वजनिक ठिकाणांची देखभाल
🌳 हरितीकरण – वृक्ष लागवड व छाटणी
🚰 स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्ती
💡 पथदिवे दुरुस्ती व नवीन पथदिवे बसविणे
🎥 महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
👉 संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सर्व विभागांनी एकत्रित प्रभाग पाहणी करण्यासाठी वेळ निश्चित करण्याचेही आदेश देण्यात आले. ⏱️
🗣️ नगरसेविका सौ. कविता नाईक यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
📢 नागरिकांकडूनही तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.
10/03/2026
जागतिक महिला दिनानिमित्त श्री संत गाडगेबाबा हास्य व योगा क्लब यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. 🌸
सकाळच्या प्रसन्न वातावरणात क्लबच्या सर्व सदस्यांसोबत थोडा योगाभ्यास करण्याचा आनंद मिळाला. योग, हास्य आणि सकारात्मकतेच्या माध्यमातून समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचे क्लबचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.
तसेच महिला दिनानिमित्त माझा सत्कार करून दिलेला सन्मान हा माझ्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.
यासाठी हास्य क्लबचे प्रमुख श्री सोनार सर तसेच क्लबमधील सर्व मान्यवर सदस्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांचे हे समाजहिताचे कार्य असेच पुढे चालू राहो, हीच सदिच्छा. 🙏
— सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्र. २५
नाशिक महानगरपालिका, नाशिक
#महिलादिन #हास्ययोगक्लब समाजकार्य नाशिक Nashik Ward25 KavitaNaik
Amol Naik - अमोल नाईक Dadaji Bhuse - दादाजी भुसे Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Amol Madhukar Naik
06/03/2026
🎉 महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. दादा भुसे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे, विकासाभिमुख व जनतेच्या मनातील नेते म्हणून आपण कार्य करत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺🙏
आपले नेतृत्व राज्याच्या प्रगतीसाठी असेच प्रेरणादायी राहो हीच सदिच्छा.
आपली नम्र,
सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्र. २५
नाशिक महानगरपालिका, नाशिक
Maharashtra PublicLeader KavitaNaik NashikPolitics BirthdayGreetings
05/03/2026
‘दिव्य मराठी’ वृत्तपत्र समूहाकडून नाशिकमधील नवनिर्वाचित लाेकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक २५ च्या नगरसेविका कविता अमाेल नाईक यांना कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. गाेविंदनगर परिसरातील ट्रीट हाॅटेलमध्ये झालेल्या या साेहळ्याप्रसंगी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, नाशिकच्या महापौर हिमगाैरी ताई आडके-आहेर, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ सानप, प्रमुख मान्यवर रतन लथ तसेच दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत आदींनी शुभेच्छा दिल्या.
02/03/2026
रंग, आनंद आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या होळी पौर्णिमेच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! 🔥
वाईट प्रवृत्तींचा होळा करून प्रेम, सौहार्द आणि सकारात्मकतेचा रंग आपल्या जीवनात सदैव फुलत राहो, हीच सदिच्छा.
आपली नम्र,
सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्रमांक २५
नाशिक महानगरपालिका, नाशिक
#होळीपौर्णिमा
#रंगोत्सव
#सौहार्द
#एकता
27/02/2026
✨ आज आयोजित सत्यनारायण महापूजा कार्यक्रमास उपस्थित राहून
नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती
सन्माननीय श्री. मच्छिंद्र सानप यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या नेतृत्वाखाली
नवीन दिशा, नवे निर्णय आणि जनतेच्या हिताचे कार्य सतत घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🌿
या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी लाभली, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. 🚩
आपली नम्र,
सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्रमांक २५
नाशिक महानगरपालिका
11/02/2026
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी संभाजी शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा जनसेवेच्या पुढील वाटचालीस निश्चितच प्रेरणादायी ठरतील. 🙏
30/01/2026
“आज विभागीय आयुक्तालय, नाशिक येथे शिवसेना गटाच्या गटनेते पदाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या निमित्ताने शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पदाधिकारी यांच्या समवेत टिपलेला एक क्षण.”
– सौ. कविता अमोल नाईक
नगरसेविका, प्रभाग क्र. २५
नाशिक महानगरपालिका