05/02/2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मा. सौ. सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदी मा. श्री. दशरथ सीताराम भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
मेरा काम ही मेरी पहचान है
Corporator (Panel 18B, BJP)
Navi Mumbai Municipal Corporation Ex - Corporatopr ( NMMC )
05/02/2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मा. सौ. सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदी मा. श्री. दशरथ सीताराम भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
05/02/2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मा. सौ. सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदी मा. श्री. दशरथ सीताराम भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
लोकाभिमुख कामकाज, प्रशासकीय पारदर्शकता आणि शहराच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी नवी मुंबईच्या प्रगतीला नवी दिशा देईल, या विश्वासासह आपल्या यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
26/01/2026
सदिच्छा भेट आणि स्नेहसंवाद ! 🚩
आज आमच्या नवी मुंबई येथील निवासस्थानी 'रयत सहकारी साखर कारखान्याचे' चेअरमन व येळगांव जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. उदयसिंहदादा पाटील उंडाळकर यांनी सदिच्छा भेट दिली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी माझा तसेच माजी स्थायी समिती सभापती श्री. संपत शेवाळे यांचा विशेष सन्मान केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या स्नेहाबद्दल संपूर्ण शेवाळे परिवारातर्फे त्यांचे मनापासून आभार!
26/01/2026
🟨 वाशीतील ‘डी-हेरिटेज’ संस्थेत ज्येष्ठ नागरिकांचा गौरव ; ७७ व्या प्रजासत्ताक दिनी विशेष उपक्रम
🗓️ २६ जानेवारी २०२६
📍 वाशी – सेक्टर १, नवी मुंबई
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाशी सेक्टर–१ येथील डी-हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभात उपस्थित राहण्याचा मान मिळाला . समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनप्रवासातून समाजाला मिळालेली दिशा, संस्कार व मूल्ये यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. हा सत्कार केवळ सन्मान नसून, भावी पिढीने ज्येष्ठांकडून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असा संदेश देणारा ठरला.
याप्रसंगी मा.नगरसेवक श्री. संपतजी शेवाळे यांच्यासह डी-हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी , सोसायटीचे रहिवासी , जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
#प्रजासत्ताकदिन२०२६
26/01/2026
२६ जानेवारी २०२६ | वाशी सेक्टर 17
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशी सेक्टर - 17 येथील मीनाताई ठाकरे उद्यान येथे मोठ्या उत्साहात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी ध्वजारोहण करून भारतमातेच्या प्रतिमेला वंदन केले.
याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला व बलिदानाला कृतज्ञतेने स्मरण करत संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली. तसेच देशाच्या एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांसमवेत केला.
याप्रसंगी मा. नगरसेवक श्री. संपतजी शेवाळे, समाजसेवक सुरज शेवाळे, समाजसेविका अश्विनी शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
#प्रजासत्ताकदिन२०२६ #७७वाप्रजासत्ताकदिन
24/01/2026
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा देशवासियांशी संवाद ी_बात!
जरुर ऐका व पहा!
🗓️उद्या रविवार, दि. 25 जानेवारी 2026 रोजी
⏰सकाळी ठिक 11:00 वा.
आकाशवाणी, दूरदर्शन व सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रक्षेपण!
♦️भेट द्या : www.Mygov.in
♦️डायल करा :1800117800
23/01/2026
अधिकृत नोंदणी पूर्ण !
नगरसेवक पदाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पूर्ण झाली. ही नवी जबाबदारी स्वीकारताना मनात एकच ध्येय आहे— जनहित !
या कायदेशीर प्रक्रियेनंतर आता जनसेवेच्या प्रवासाला अधिक जोमाने सुरुवात होत आहे. जनतेच्या समस्यांचे निराकरण, शहराचा कायापालट आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे.
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे कर्तव्य असून, पारदर्शक कारभारासाठी मी सदैव तत्पर असेन. तुमचे सहकार्य आणि पाठबळ असेच पाठीशी राहू द्या !
आपली नगरसेविका — सौ. दयावती संपत शेवाळे (नवी मुंबई महानगरपालिका)
#अधिकृतनोंदणी #नवीनजबाबदारी
Devendra Fadnavis Ravindra Chavan Ganesh Naik BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)
22/01/2026
माघी गणेशोत्सवानिमित्त वर्धमान पार्क सोसायटीतील श्री.हिवारकरजी यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
22/01/2026
|| श्री गणेशाय नमः ||
भक्ती, शक्ती आणि विकासाचा संकल्प !
आज माघी गणेशोत्सवाच्या मंगलमय औचित्याने सानपाडा येथील मोराज रेसिडेन्सी सोसायटीला भेट देण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन प्रभागाच्या सुख-समृद्धी व प्रगतीसाठी प्रार्थना केली.
या भक्तीमय वातावरणात सोसायटीतील रहिवाश्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली. मोराज सोसायटीतील प्रत्येक नागरिकाने दिलेले प्रेम, दर्शवलेली आपुलकी आणि दिलेला सन्मान याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. भक्तीच्या शक्तीने आणि नागरिकांच्या साथीने सानपाड्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
याप्रसंगी मा.नगरसेवक श्री.संपतजी शेवाळे हे देखील उपस्थित होते .
22/01/2026
सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावचे २० वर्षांचे सरपंच असणारे आमचे आप्तस्वकीय, शिंगटे परिवारातील श्री.सुरज संपत शेवाळे यांचे सासू-सासऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयाबद्दल प्रेमपूर्वक सत्कार व शुभेच्छा दिल्या. हा सन्मान मनाला स्पर्शून जाणारा आणि नव्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.
सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याची प्रेरणा या आपुलकीतूनच मिळते.
BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) Sampat Shewale
22/01/2026
🟨 ऋणानुबंध माणुसकीचे: स्वच्छता दूत आणि माळी बांधवांकडून प्रेमाची पावती!
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सेक्टर १७ येथील आमचे स्वच्छता दूत आणि उद्यान विभागातील माळी बांधवांनी प्रेमाने केलेला सत्कार माझ्या मनाला स्पर्शून गेला.
शहराला स्वच्छ आणि हिरवेगार ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या या हातांकडून मिळणारा सन्मान म्हणजे माणुसकीचं सर्वोच्च शिखर आहे. तुमच्या या निखळ प्रेमाने आणि विश्वासाने माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक गडद झाली आहे.
तुमच्या कष्टांचा सन्मान राखणे, तुमच्या आयुष्यात सन्मान आणि सुरक्षितता आणणे हेच माझे खरे कर्तव्य आहे. तुमच्या या निखळ प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुमची सदैव ऋणी राहीन!
Ganesh Naik BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) Shewale Sampat
22/01/2026
ऋणानुबंध !
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल माझ्या प्रभागातील वाशी सेक्टर–१७ येथील ‘आनंद सागर’ सोसायटीतील रहिवाशांनी दिलेल्या स्नेहपूर्ण सत्काराबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. या प्रसंगी मा.नगरसेवक संपत शेवाळे तसेच समाजसेविका अश्विनी शेवाळे यांची उपस्थिती लाभली.
वाशी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. आपुलकीच्या या सन्मानाबद्दल सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक आभार !
Shewale Sampat BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)