DDI Konkan News

DDI Konkan News

Share

We are Government media. we are pramote Government schemes and Government programs.

31/08/2022

श्री गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभ आता दूर झाले आहे. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणरायाचे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, या शब्दांत मुख्यमंत्री #एकनाथशिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

#गणेशोत्सव२०२२
#गणेशोत्सव
#मुख्यमंत्री
#एकनाथशिंदे
#महाराष्ट्र

21/01/2022

दि.21.01.2022

*प्रजासत्ताकदिनी कोकण भवन येथे*
*शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम*

नवी मुंबई, दि.21: कोकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी बुधवार दि.26 जानेवारी 2022 रोजी कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात सकाळी 9.15 वा. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. उपस्थितांनी मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सूचनांचे पालन करावे. असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले आहे.

000 000

11/01/2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नूतन महासंचालक श्री. दीपक कपूर यांनी राज्यातील उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी संचालक श्री. गणेश रामदासी आणि प्र. संचालक दयानंद कांबळे उपस्थित होते.

27/12/2021

कोंकणात काही प्रमाणात एसटी वाहतूक सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद.

Photos from DDI Konkan News's post 26/12/2021

_*मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न*_



*कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील*

*---उपमुख्यमंत्री अजित पवार*

रत्नागिरी दि. २६ : कोरोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) ३.५ कि.मी. लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयनचा धुपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे या भागातील धूप कमी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते आज मिऱ्या बंदर येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी रत्नागिरी चे पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सांमत, गृह(शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितमकुमार गर्ग आदि मान्यंवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कोनशिलेचे अनावरण करुन उपमुख्‍यमंत्र्यांनी बंधाऱ्याच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती करुन घेतली, यावेळी ते म्हणाले की, या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे पांढऱ्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार आहे.समुद्र किनारी असणाऱ्या जमिनीचे, शेतीचे, गावांचे संरक्षण होणार आहे.महत्वाचं म्हणजे समुद्राला त्याच्या सीमेत अडविण्याचं काम हा बंधारा करेल. या प्रकल्पासाठी जवळपास 190 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या सुशोभिकरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीचीही तरतूद तत्काळ करण्यात येईल. या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी हमी त्यांनी यावेळी दिली. बंधाऱ्याचे व सुशोभिकरणाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार झाले पाहिजे. पुढची 50 वर्षे डोळयासमोर ठेवून चांगल्या प्रतीचे काम झाले पाहिजे. या बंधाऱ्याचा उपयोग या भागातील समुद्रकिनारे वाचवण्यासाठी होईल. जमीन, शेतीचं, गावांचं संरक्षण करतानाच, इथला निसर्ग, पशुपक्षांच्या अधिवास, कांदळवनांचं संरक्षण करण्यातही, हा बंधारा महत्वाची भूमिका बजावेल.

शहराच्या सार्वजनिक बाबींच्या विकासासाठी शासनाला स्थानिकाकडून जमिनी घ्याव्या लागतात. रत्नागिरीचा पर्यटनाच्या दृष्टिने विकास करताना स्थानिकांनी याबाबत सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्याबद्दल योग्य तो मोबदला दिला जाईल असे ते म्हणाले.

*रत्नागिरी जिल्हयाचा प्रशासकीय व औद्योगिक दृष्टया सर्वांगीण विकास*

रत्नागिरी जिल्हयाचा प्रशासकीय व औद्योगिक दृष्टया सर्वांगीण विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले की,

रायगड येथील रेवस ते सिंधुदुर्ग येथील रेड्डी महामार्गासाठी 9 हजार 570 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना व त्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यात साधनसंपत्तीचा वापर करुन उद्योगविकासासाठी 100 कोटी देण्यात आले आहेत . तसेच श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी 50 कोटी रुपये, राजापूरच्या धुतपापेश्वर मंदिराचा विकास, रत्नागिरीत भगवती इथे क्रूझ टर्मिनलची उभारणी, . अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायासाठी मोठा प्रमाणावर निधी उपलब्ध, तसेच रत्नागिरी जिल्हयासाठी सर्व सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द अशा प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

रत्नागिरीच्या पर्यटनाविषयी बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी किनाऱ्यांवरच्या पर्यटनवाढीलाही याचा उपयोग होईल. रत्नागिरी जिल्ह्याला २३८ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा जगातला सर्वात स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न किनारा आहे. गावखडीचा किनारा,आरे-वारेचा किनारा, गणपतीपुळ्याचा किनारा, प्रत्येक किनारा हा अप्रतिम, सुंदर आहे. रत्नदुर्ग किल्ला, पांढरा समुद्रकिनारा, औषधी वनस्पतींनी समृद्ध असा मिऱ्याचा डोंगर, इथून जवळ असलेलं अॅक्विरियम, स्कुबा डायव्हिंगची सोय अशा अनेक गोष्टींचा विकास आणि प्रसिद्धी, प्रभावीपणे केल्यास, रत्नागिरीत निश्चितपणे पर्यटकांचा ओघ वाढेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षात, निसर्ग, तौक्ते अशा अनेक वादळांनी कोकणच्या किनारपट्टीवर नुकसान केले. अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळल्यानेही मोठे नुकसान झाले. या संकटकाळात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, फळबागायतदारांच्या, मच्छिमारांच्या, दुकानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यासाठी, एनडीआऱएफच्या निकषांच्या पलिकडे जावून आपण आपत्तीग्रस्तांना मदत केली.

कोराना काळात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहून उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हयात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.विशेषत: 31 डिसेंबर रोजी नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, याकरिता पोलीसांना कारवाई करण्यास भाग पाडू नये अशी कळकळीची व आग्रहाची विंनती त्यांनी यावेळी केली.

यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आपल्या मनोगतात मुंबईच्या नरिमन पाईंटला ज्या प्रमाणे पर्यटक भेट देतात त्याचप्रमाणे येथेही पर्यटक मोठया संख्येने भेट देतील. हा बंधारा भविष्यात रत्नागिरीचे वैभव म्हणून नावारुपाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मा. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मर्यादित उपस्थितीत पार पडला. यावेळी कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करण्यात आले.

0000

26/12/2021

*'दिलखुलास' कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. खुशपत जैन यांची मुलाखत*

मुंबई, दि. २६ : - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. खुशपत जैन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील मराठी यशाचा टक्का वाढत आहे. यंदाही अनेक विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे शासनाची ध्येयधोरणे तसेच राज्यातील प्रशिक्षण देणा-या संस्थांचाही मोलाचा वाटा आहे. या संस्थांपैकी मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था नागरी सेवा परीक्षेसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेची आतापर्यंतची वाटचाल आणि नागरी सेवा परीक्षेतील महाराष्ट्राचा उंचावत असलेला आलेख याविषयीची माहिती डॉ. जैन यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
00000

Photos from DDI Konkan News's post 25/12/2021

कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मा. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या मा. उपमुख्यमंत्री यांचा रत्नागिरी दौरा मर्यादित उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून होणार आहे.
रत्नागिरी जिल्हयाला २३८ कि.मी. लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे . सागरी लाटा तसेच समुद्रातयेणाऱ्या चक्री वादळामुळे सागरी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धुप होते.मिऱ्या किनाऱ्यावर मोरटेंबे, भाटिमिऱ्या, जाकिमिया, मुरुगवाडा व पंधरामाङ ही गावे वसलेली आहेत. परंतु गेल्या काही दशकांमध्ये विविध कारणांमुळे तो हळूहळू नष्ट होत आहे . सन १९५५ पासुन ते सन २०२१ पर्यंन्त अंदाजे २०० मी. समुद्रकिनारा आतमध्ये सरकला आहे. त्यामुळे जिवीत तसेच वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . त्याकरिता याठिकाणी ३.५ कि.मी. लांबीचा टेट्रापॉड्सचा धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात येणार आहे. तसेच सात ठिकाणी ग्रोयन्स बांधण्यात येणार आसून ३.५ कि.मी. लांबीचा व ४ मी . रुंदीचा क्राँक्रिट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या बंधाऱ्यामुळे किनाऱ्याच्या ठिकाणी होणारी धुप कमी होईल . तसेच भविष्यात मुंबईतील मरीन ड्राइवच्या पार्श्वभुमीवर पर्यटनाच्या दृष्टीने उपाययोजना करुन मिऱ्या गावात पर्यटन क्षेत्र विकसित होऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होईल .

Certified Guide Training - DOT-Maharashtra Tourism - Maharashtra Tourism 16/12/2021

*ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी*
*अर्ज करण्याचे आवाहन*
नवी मुंबई, दि.14: कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्य उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व सविस्तर माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान 18 वर्षे वयोमार्यादा असून शैक्षणीक पात्रतेसाठी ज्यांचे वय 40 वर्षांच्या आत आहे. त्यांनी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ज्यांचे वय 40 वर्षांच्या वर आहे. त्यांनी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी *https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर भेट देऊन दि. 31 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.*.
या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (Indian Institute of Tourism and Travel Management) संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधतांना पर्यटनस्थळाबाबतची माहिती गोष्टीरुपाने कशी मांडावी, असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ञांमार्फत प्रशिक्षणार्थींना प्रात्याक्षिक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून, हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) म्हाणून कामकरण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणाव्दारे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे मान्यताप्राप्त “टूर गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) बनन्यासाठीच्या सुवर्णसंधीचा कोकणातील स्थानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहान कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
*******

Certified Guide Training - DOT-Maharashtra Tourism - Maharashtra Tourism

16/12/2021

दि.16.12.2021
*जपानमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी*
नवी मुंबई दि.16 :-नर्सिंग क्षेत्रात कुशल असणाऱ्या व परदेशात विशेषत: जपान सारख्या आधुनिक व तांत्रिकदृष्टया प्रगत देशात जावून काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या कालाविधीत निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम SSW (Specified Skilled Workers Programme) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान सुगा योशीहिदे यांच्या दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या बैठकीत उत्पादन, एमएसएमई आणि कौशल्य विकासामध्ये द्विपक्षीय भागीदारी विकसित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. याबाबत भारत व जपानमध्ये निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम SSW (Specified Skilled Workers Programme) बाबत करार करण्यात आला आहे. जपान येथे नोकरी करण्यास इच्छुक भारतातील युवक/युवतींकरिता जपानतर्फे कौशल्य आणि भाषा चाचणी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जपान मधील विविध क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येत असून, या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जपानी कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये नर्सिंग, ईमारत साफसफाई व्यवस्थापन, कच्चा माल उद्योग, मशिनरी निर्माण उद्योग, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक सूचना संबंधित उद्योग , बांधकाम उद्योग, जहाज निर्माण आणि समुद्री उद्योग, वाहन दुरुस्ती व देखभाल उद्योग, विमान उड्डाण उद्योग, आवास उद्योग, कृषी उद्योग, मत्स्यपालन, खाद्य आणि पेय निर्माण उद्योग, भोजनालय व्यवसाय या क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असणार आहे. या क्षेत्रांपैकी “ नर्सिंग क्षेत्रातील ” जपानमध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधीची माहिती देण्यासाठी दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी SSW कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याकार्यक्रमामध्ये विविध कंपन्यांव्दारे त्यांच्या कंपनीची माहिती देण्यातयेईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवक/युवतींना जपान कंपनीच्या प्रतिनिधी / कर्मचाऱ्यां सोबत प्रश्नोत्तरे आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमांतील विषय सविस्तरपणे समजण्यास सुलभ होण्यासाठी या कार्यक्रमाच्या चित्रफीती मध्ये “ तागालोख, खमेर, नेपाली, मंगोलियाई, इंडोनेशियाई, विएतनामी , थाई, सिंहल, उज्बेक व हिंदी " या १० भाषांमध्ये उपशीर्षक उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. भविष्यात SSW टेस्ट देणाऱ्या युवकयुवतींना सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच विशिष्ट कुशल कामगार रुपात काम करु इच्छीणाऱ्या उमेदवारांना देखील या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल.
Specified Skilled Workers Programme (SSW) कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी
त्यांच्या मोबईलवर LINEAPPडाऊनलोड करुन त्याद्वारे खालील क्युआर कोड स्कॅन करुन सहभाग नोंदवावा . LINEAPP च्या माध्यमातुन आपण माहिती व दिनांक निवडु शकता . तसेच आपण LINEAPP द्वारे संदेश सुद्धा प्राप्त करुन घेऊ शकता . नर्सिंग सेक्टरमध्ये कुशल असणाऱ्या व परदेशात जावुन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असुन, या संधीचा जास्तीत जास्त युवक/युवतींनी लाभ घ्यावाआणि जपानच्या SSW या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे .

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Divisional Information Office, 317, 3rd Floor, Konkan Bhavan
Navi Mumbai
400614