01/06/2026
‘प्ले फिट’ क्रीडा महोत्सवात फुटबॉल, पिकलबॉल आणि फिटनेस प्रेमींचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. सिडको टर्फ, वाशी येथे आयोजित या महोत्सवात क्रीडा, कला आणि फिटनेस प्रेमींनी संपूर्ण मैदान आपल्या ऊर्जेने गाजवून सोडले.
आपल्या वाशीतील तरुणाईची ऊर्जा आणि खेळाप्रती असलेले प्रेम पाहून मनस्वी आनंद झाला. याप्रसंगी न.मुं.म.पा. सभागृह नेते श्री. सागर नाईकजी, रोटरी डिस्ट्रिक्ट - 3142 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल व इतर मान्यवर उपस्थित होते.
31/05/2026
न्याय, धर्म आणि सुशासनाच्या प्रतीक असणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन!
लोककल्याणासाठी समर्पित महाराणी अहिल्याबाई यांचे जीवन, देशभरातील सांस्कृतिक केंद्रांचे पुनरुत्थान आणि त्यांची धोरणे आजही सुशासनाची एक महान प्रेरणा आहे.
#अहिल्याबाई_होल्कर
30/05/2026
📢 सानपाडा: मतदार यादी मॅपिंग मोहिमेला सुरुवात! 🗳️
१५१ बेलापूर विधानसभा मतदार संघांतर्गत यादी क्रमांक १०७ ते १३६ मधील मतदारांसाठी आजपासून साधू वासवानी हायस्कूल येथे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कॅम्प सुरू आहे.
नागरिकांची धावपळ होऊ नये आणि प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे २ दिवसीय पूर्ण नियोजनबद्ध शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी सानपाडा मधील सुजाण नागरिकांकडून या कॅम्पला अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद लाभत आहे!
🗓️ दिनांक: ३० मे आणि ३१ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:००
📍 ठिकाण: साधू वासवानी हायस्कूल, सेक्टर १५, सानपाडा.
💡 महत्त्वाची विनंती: घरातील कोणत्याही एका सदस्याने आवश्यक कागदपत्रांसह (Voter ID आणि उपलब्ध असल्यास सन २००२ मधील मतदार यादीतील नोंदीची माहिती) उपस्थित राहून ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
28/05/2026
अखंड राष्ट्रभक्ती, प्रखर विचार, प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
27/05/2026
सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
#बकरी_ईद
27/05/2026
कमला एकादशी निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#कमला_एकादशी
24/05/2026
मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा दैदिप्यमान सोहळा! 🚩
नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 'द फोक आख्यान' हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषा, आपली समृद्ध संस्कृती, संतांची परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, ढोल-ताशांचा गजर आणि अंगावर शहारे आणणारे पोवाडे... या सर्वांचा एक अद्भूत संगम या निमित्ताने पाहायला मिळाला.
अंदाजे ५ ते ६ हजार नवी मुंबईकरांच्या अथांग जनसागरात, आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम अनुभवण्याचा एक सुवर्णयोग मला लाभला. माझ्यासोबत माझी आई आणि नवी मुंबईतील हजारो कुटुंबांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. आपल्या मातीचा हा वारसा मनाला वेगळी ऊर्जा देणारा आहे. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावा असा हा कार्यक्रम आहे.
#आख्यान #लोककला
24/05/2026
कायदा-सुव्यवस्था आणि सलोखा!
नवी मुंबई परिमंडळ-१ च्या उपायुक्त (DCP) पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माननीय श्री. विजयजी खरात यांनी नुकतीच वाशी पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. आगामी 'बकरी ईद' सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटी (Peace Committee) आणि मोहल्ला कमिटीच्या सर्व सन्माननीय सदस्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि जातीय सलोखा राखून कसे साजरे करता येतील, यावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी वाशी पोलीस स्टेशन आणि कमिटी सदस्यांच्या वतीने साहेबांचे स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
23/05/2026
आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि 'दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशन, ठाणे' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कुमार-मुली ठाणे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२६' ला उपस्थित राहून भरपूर ऊर्जेचा अनुभव घेतला.
याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध मान्यवरांची भेट झाली, तसेच आयोजकांच्या वतीने करण्यात आलेला आपुलकीचा सत्कार मनापासून स्वीकारला.
आपल्या मातीतल्या या पारंपारिक खेळाला आणि त्यात उतरलेल्या अष्टपैलू युवा खेळाडूंना पुढील प्रवासासाठी आणि निवडीसाठी मनापासून शुभेच्छा! या स्पर्धेत आणि निवड चाचणीतील सर्व खेळाडू उद्या राज्याचे आणि देशाचे नाव नक्कीच उंचावतील, हा विश्वास आहे.