23/10/2026
🚩 पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक २०२६ 🚩
भारतीय जनता पार्टी व पांडुरंग परिवार – अभेद्य संघटन आणि विजयाचा संकल्प!
आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री श्री.जयकुमारजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि 'पांडुरंग परिवार' यांच्या संयुक्त व प्रभावी सहभागाने पंढरपूरच्या भूमीत संघटनशक्तीचे उत्तम उदाहरण सादर केले.!
पंढरपूर परिसरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन बूथ स्तरावरील कामाचा सखोल आढावा घेतला. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि 'पांडुरंग परिवारातील' प्रत्येक कार्यकर्त्याने खांद्याला खांदा लावून एकजुटीने व नियोजनबद्ध पद्धतीने अहोरात्र काम केले.!
प्रत्येक पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून विचार पोहोचवणे, हा गड सर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. भाजपाची विचारसरणी आणि पांडुरंग परिवाराची तळागाळातील भक्कम पकड यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातून पक्षाला विक्रमी आणि ऐतिहासिक आघाडी मिळेल.!
या संपूर्ण निवडणुकीत जिद्दीने, उत्साहाने आणि समन्वयाने परिश्रम घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख तसेच पांडुरंग परिवारातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मानाचा मुजरा! 💐
🚩 संघटन मजबूत, कार्यकर्ता सज्ज!
कमळ फुलणार, विजय निश्चित! 🚩
#पुणेपदवीधरनिवडणूक #पुणेशिक्षकनिवडणूक #पदवीधरनिवडणूक२०२६ #भाजपा #पंढरपूर #सोलापूर #जयकुमारभाऊगोरे #पांडुरंगपरिवार #संघटनशक्ती #बूथस्तरीयकाम