01/06/2026
महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे कैवारी, राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर, गुरुवर्य ना. भरतशेठ गोगावले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!✨💐🚩🚩🚩🚩
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले Vikas Bharatsheth Gogawale
31/05/2026
हडपसरमधील अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांविरोधात शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका, हडपसर पोलीस स्टेशनसमोर केलेले ठिय्या आंदोलन तसेच त्यानंतर थेट अवैध दारू हातभट्ट्या उध्वस्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला पुणे शहरातील सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, डिजिटल मीडिया आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेली व्यापक प्रसिद्धी अत्यंत मोलाची ठरली. पुणे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रश्नाला जनहिताच्या मुद्द्याच्या स्वरूपात सातत्याने अधोरेखित केल्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मनःपूर्वक आभार. माध्यमांनी या विषयाचे गांभीर्य प्रभावीपणे समाजासमोर मांडल्यामुळे अवैध दारूविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळाले असून प्रशासनावरही आवश्यक कारवाईसाठी दबाव निर्माण झाला आहे, जनतेच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या या लढ्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
31/05/2026
काल शिवसेनेने हडपसर परिसरातील अवैध दारू हातभट्ट्यांवर कारवाई करत त्या उध्वस्त केल्या. त्यानंतर आता पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर पुणे शहरातील बेकायदा दारू अड्ड्यांची माहिती स्वतःहून शिवसेनेकडे देत आहेत. कालपर्यंत पुणे शहरातील 42 अवैध दारू हातभट्ट्यांची माहिती शिवसेनेला मिळाली आहे. पुणे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढील 48 तासांत संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण पुणे शहरातील अवैध दारू हातभट्ट्या, विक्री केंद्रे आणि दारू माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करावे,अन्यथा नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक अवैध दारू अड्ड्यावर शिवसेना थेट हल्लाबोल करेल. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या दारू माफियांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पुणे पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची असेल.
Pune City Police Pune Traffic Police CMOMaharashtra Sunetra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis
30/05/2026
विषारी दारूकांडानंतर हडपसरमध्ये शिवसेनेचा दणका, अवैध हातभट्ट्या जमीनदोस्त..!!
विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना हडपसरमध्ये मात्र काही दारू माफिया खुलेआम बनावट गावठी दारूच्या हातभट्ट्या चालवत होते. कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागे आणि साठे वस्ती परिसरात सुरू असलेल्या या अवैध दारूच्या साम्राज्याविरोधात आज शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून हल्लाबोल केला. शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा नष्ट करत अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. हडपसरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.
हडपसरमधील सर्वसामान्य नागरिकांना या अवैध दारूभट्ट्या दिसतात, मग संबंधित यंत्रणांना त्या का दिसत नाहीत, हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही जर असे धंदे सुरू राहत असतील, तर ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. नागरिकांच्या जीवापेक्षा कोणाच्याही आर्थिक हितसंबंधांना अधिक महत्त्व दिले जाणार नाही.
हडपसर हा दारू माफियांचा नाही तर कष्टकरी, प्रामाणिक आणि कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांचा परिसर आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील लढा यापुढे आणखी तीव्र केला जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रत्येक माफियाचा पर्दाफाश करून त्यांचे अवैध साम्राज्य उद्ध्वस्त केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. हडपसरच्या जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी हा लढा अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
यावेळी माझ्यासमवेत प्रवीण हिलगे,विक्रम घाडगे, रोहित भालचिंम, प्रकाश कालगुडे, गणेश साळुंखे, माऊली साळुंखे,रवी लोखंडे, सुरज खिल्लारे, यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
29/05/2026
शिवसेनेचा दणका, हडपसर पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकासह तीन अधिकारी तात्काळ निलंबित..!!
पुण्यातील हडपसर परिसरात घडलेल्या भीषण विषारी दारूकांडानंतर अखेर पुणे पोलिस प्रशासनाला कारवाई करावी लागली असून हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशन समोर याबाबत ठिय्या आंदोलन घेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती.
शिवसेना सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आक्रमकपणे सांगत होती. हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारू हातभट्ट्या, गावठी दारू विक्री आणि गरीब नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्या जात होती. या विषारी दारूमुळे तब्बल १२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली होती.
या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे. अवैध दारू विक्रीची माहिती असूनही प्रभावी कारवाई करण्यात अपयश आले होते.
विषारी दारू विक्री करणारे दारू माफिया, त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि गरीबांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, हडपसरमध्ये अवैध धंद्यांविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येणार आहे, जय महाराष्ट्र 🚩🚩
29/05/2026
विषारी दारू बरोबरच पुण्यातील नकली दारूचे जाळे उध्वस्त करा..!!
पुणे शहरात विषारी दारूमुळे नागरिकांचे जीव जात असतांना शहरातील अनेक रेस्टॉरंट बार आणि वाईन शॉपमध्ये ब्रँडेड दारूच्या नावाखाली सर्रास नकली दारू विकली जात असून, ग्राहकांच्या ग्लासात ओरिजनल ब्रँडेडच्या नावाने थेट मृत्यू ओतला जात आहे. पुणे शहरभर हे डुप्लिकेट (नकली) दारू रॅकेट राजरोसपणे सुरू असून, हजारो नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळ खेळला जात आहे, उद्यापासून पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरातील सर्व बार, पब, रेस्टॉरंट आणि वाईन शॉपवर संयुक्त सखोल तपासणी मोहीम राबवून या डुब्लीकेट (नकली) दारूचा काळाबाजार उध्वस्त करावा, अन्यथा शिवसेना स्वतः शहरातील बार, पब आणि वाईन शॉपमध्ये उतरून नकली दारूचा साठा ताब्यात घेईल. अवैध हातभट्ट्यांनंतर आता पुण्यात “नकली ब्रँडेड दारू” हेच सर्वात मोठे मृत्यूचे रॅकेट बनले असून, या दारू माफियांना नेमकं कोणाचं संरक्षण आहे, याचाही पर्दाफाश झाला पाहिजे.