Swapnil Dudhane

Swapnil Dudhane

Share

नगरसेवक, पुणे मनपा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रभाग क्रमांक ३०
President : Urban cell - Pune
Secretary : Omkar Charitable Trust

Photos from Swapnil Dudhane's post 31/05/2026

अर्बन सेलची महत्वपूर्ण बैठक संपन्न!

📍शुक्रवार, दि. २९ मे २०२६

आज अनेक महिन्यानंतर महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा मा. वंदनाताई चव्हाण आणि समन्वयक मा. नितीनजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे अर्बन सेलची बैठक संपन्न झाली.

पुणे अर्बन सेलच्या सर्व सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत पुणे शहराच्या विविध समस्या आणि नागरिकांच्या अडीअडचणी यांचे निराकरण करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अर्बन सेलची भविष्यातील वाटचाल आणि नागरिकांच्या आणि पर्यायाने समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न याबद्दल दिशा ठरवण्यात आली.

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

31/05/2026

विनम्र अभिवादन...

आपली संस्कृती आणि परंपरा यांची जपणूक करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या पाईक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

आपला
सस्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

Photos from Swapnil Dudhane's post 31/05/2026

रस्ता बाधित जागामालक आणि प्रशासन यांचा सुसंवाद!

📍शुक्रवार, दि. २९ मे २०२६

आपल्या प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जावळकर वस्तीमार्गे जाणारा ३० मी. डीपी रस्ता शिवणे ते खराडी १०० फुटी डीपी रस्त्यास मिळतो. सदर रस्ता ते राजाराम पूल, महालक्ष्मी लॉन्स ते दुधाने लॉन्स हा शिवणे ते खराडी ३० मी. रस्ता भूसंपादन होणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने आज पुणे मनपा भूसंपादन विभाग आणि नगर भूमापन अधिकारी क्र. १ या दोन्ही विभागांच्या वतीने संयुक्तपणे सरकारी मोजणीकरिता रस्ताबाधित जागामालकांकडून जागा हस्तांतरण कामाची सुरवात करण्यात आली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या या जागा मनपाकडे हस्तांतरीत होत असून जागाबाधित मालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ही मोजणी पुणे महापालिका तर्फे करण्यात येत आहे. सदर प्रक्रियेमुळे येत्या महिनाभरात मनपाला याबद्दल सविस्तर माहिती प्राप्त होणार असून जागामालकांना यथायोग्य नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या या जागा लवकरात लवकर मनपाकडे हस्तांतरीत होणे, काळाची गरज बनले असून याप्रसंगी प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शवली आणि सदर प्रक्रिया विनाविघ्न पार पडेल, याची काळजी घेतली. याप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करतच नागरिकांनाही नुकसान भरपाई मिळणेबाबत आश्वस्त केले. यामुळे वाहतूक समस्या लवकरच निवारीत होणार असून नागरिकांतून याबद्दल संतोष व्यक्त केला जात आहे.

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

29/05/2026

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या जीवनात आनंद आणि उत्साह जिच्या पावलांनी आला, त्या माझ्या अर्धांगिनी सौ. तेजश्री यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या कुटुंबात येऊन सर्वांना प्रेम आणि स्नेहाने आपलेसे करण्याची त्यांची कला नेहमीच आमचे कुटुंब बांधून ठेवत आली आहे.

त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून आमचे कुटुंब असेच आनंद आणि सुख-समृद्धीत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना...

29/05/2026

आग आटोक्यात आणण्यात यश...

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

Photos from Swapnil Dudhane's post 28/05/2026

गोल्ड लिफ सोसायटी या ठिकाणी विकासकामे करण्यासाठी वचनबद्ध!

📍गुरुवार, दि. २८ मे २०२६

आपल्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी येथील जावळकर वस्ती या ठिकाणी असणाऱ्या गोल्डी सोसायटी परिसरातील नागरिकांना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. याबद्दल माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नागरिकांची भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

आपल्या परिसरातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पदपथ याचसह विविध समस्यांबद्दल माहिती प्राप्त झाली. तद्नंतर त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवत पॅचवर्कचे काम पूर्ण केले आहे. अन्य समस्याही लवकरात लवकर निवारीत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून नागरिकांची याच पद्धतीने आम्हाला साथ लाभत राहो आणि आपला प्रभाग सुसमृद्ध होवो, अशी आशा व्यक्त केली. आपली कामेही वेळेत पूर्णत्वास जात असल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

Photos from Swapnil Dudhane's post 28/05/2026

एकसष्ठी समारंभास उपस्थिती आणि शुभेच्छा!

📍गुरुवार, दि. २८ मे २०२६

आपल्या प्रभागातील अक्षय कॉलनी येथील रहिवासी ह. भ. प. श्री. विठ्ठल महीपती कडू यांचा एकसष्ठी समारंभ संपन्न होत आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कडू कुटुंबियांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा वाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

काल कथा वाचनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थिती दर्शवली आणि ह. भ. प. रघुराज महाराज शास्त्री पारेकर (धारूरकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून कथा ऐकण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी श्री. विठ्ठलजी कडू यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. आयोजकांच्या विनंतीस मान देत आरतीचा स्वीकारलेला सन्मान आणि नागरिकांच्या गाठीभेटी मनोधैर्य वाढवणाऱ्या होत्या, यात शंकाच नाही.

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती म न पा

28/05/2026

पाठपुराव्यास यश, नूतन ५ कचरा गाड्या सेवेत रुजू...

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती म न पा

Photos from Swapnil Dudhane's post 27/05/2026

ई-लर्निंग स्कुलमध्ये मैदान नव्या मातीने सज्ज!

📍मंगळवार, दि. २६ मे २०२६

आपण आपल्या प्रभागात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल विकसित केले असून दि. १५ जून रोजी शाळा सुरू होण्यापूर्वी मैदानात लाल माती टाकून मिळावी, याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून आपण भवन विभागाकडे पाठपुरावा करत आलो आहोत.

या अनुषंगाने दोनच दिवसांपूर्वी मनपाच्या वतीने लाल माती उपलब्ध करण्यात आली असून सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. शाळेच्या शुभारंभप्रसंगी लावलेल्या रोपट्यांचे आज मोठमोठे वृक्ष बनले आहेत, त्यांनाही ही उत्कृष्ट दर्जाची माती टाकून नवसंजीवनी देण्यात आली आहे. मैदानात घडणारे खेळाडू यांना कोणत्याही प्रकारची तोषिस होऊ नये, यासाठी आम्ही कटीबद्ध असून भविष्यातही याच पद्धतीने उत्तमोत्तम काम करण्याचा आमचा मानस आहे.

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

Photos from Swapnil Dudhane's post 27/05/2026

आग आटोक्यात आणण्यात यश...

📍मंगळवार, दि. २६ मे २०२६

आपल्या प्रभागातील कर्वेनगर स्मशानभूमी नजीक असणाऱ्या नदीपात्रात अनेक नागरिकांकडून कचरा टाकण्यात येतो, ज्याला आज आग लागली असून यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली.

याची माहिती प्राप्त झाली असता त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. परंतु पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्याने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आणि आग विझवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी यातून बोध घेत गांभीर्य ध्यानात घेणे, काळाची गरज बनले आहे. भविष्यात कचरा या पद्धतीने न टाकता पर्यावरण आणि पर्यायाने समाजाची काळजी घेतली जाईल, ही माफक अपेक्षा...

आपला
स्वप्नील देवराम दुधाने
नगरसेवक पुणे म न पा
सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Karvenagar
Pune
411052