Raunak Jayyaa Shetty

Raunak Jayyaa Shetty

Share

सचिव भारतीय जनता युवा मोर्चा,महाराष्ट्र
अध्यक्ष,मराठी साम्राज्य सेना
संस्थापक युवत्व फाऊंडेशन

24/04/2026

📍कोकण प्रवास

काल रायगड किल्ल्यावर युवा जागर यात्रे वेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री कृष्णराजजी महाडिक यांच्या सोबत.

Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Vinod Tawde Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Vikrant Patil Krish Mahadik Sunil Rane

21/04/2026

माझे बंधूं श्री निखिलजी चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी कल्याण शहराच्या महामंत्री पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.

17/04/2026

श्री हिम्मतराव जाधव ( DCP, Traffic ) पुणे शहर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

16/04/2026

आज IPS श्री सदानंद दाते साहेब, (महासंचालक, महाराष्ट्र पोलीस) यांची भेट घेतली. यावेळी माझे भारतीय जनता युवा मोर्चाचे सहकारी श्री. रमाकांत कापसे उपस्थित होते. आदरणीय दाते साहेब हे माझे वडिल जया अण्णा शेट्टी साहेब यांचे जवळच्या परिचयाचे होते, आमच्या आजच्या भेटी वेळी जुन्या आठवणींना उजाळा दाते साहेबांनी दिला.

Today, met IPS officer Mr. Sadanand Date Sir, Director General of Police, Maharashtra.
Mr. Ramakant Kapse, was also present.

Date Sir shares a close acquaintance with my father, Jayyaa Anna Shetty. During our meeting, Mr. Date fondly reminisced and shared memories from the past.

Ramakant Kapse

Photos from Raunak Jayyaa Shetty's post 12/04/2026

📍 केरळम

केरळमधील हा प्रवास माझ्यासाठी केवळ राजकीय नव्हता, तर भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता. मागील एकवीस दिवसात माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे माझे सर्व सहकारी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी घेणारे हे माझ्यासाठी कुटुंबासारखे झाले.

येथील स्थानिक सहकार्यांनी पद्मनाभस्वामी यांची प्रतिमा भेट म्हणून दिली, ही केवळ भेट नाही, तर इथल्या प्रेमाची आणि जिव्हाळ्याची आठवण आहे, जी कायम माझ्यासोबत राहील.

साजनजी, रतिशजी आणि अजितजी यांच्या सारखे समर्पित सहकारी या प्रवासात भेटले जे प्रामाणिकपणे, निःस्वार्थ भावनेने, आणि कठीण परिस्थितीतही भारतीय जनता पार्टीसाठी झटत आहेत अहोरात्र मेहनत करत आहेत. ट्रायबल आणि बफर झोनसारख्या आव्हानात्मक भागात काम करताना त्यांचा संघर्ष आणि चिकाटी पाहून खरोखरच प्रेरणा मिळाली.

आज जिथे भारतीय जनता पार्टी उभी आहे, तिथे पोहोचवण्यात अशा असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान आहे हीच खरी ताकद आहे आपल्या संघटनेची, आणि हाच आपला खरा परिवार आहे.

केरळमधून निरोप घेताना मनात कृतज्ञता, आदर आणि अनेक आठवणी घेऊन जात आहे. आगामी विधानसभेच्या निकालासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Photos from Raunak Jayyaa Shetty's post 11/04/2026

📍 केरळम

केरळम निवडणुकीच्या प्रचाराची नुकतीच सांगता झाली. या मध्ये सुमारे २१ दिवस मला पक्ष कार्यात सहभागी होता आले. अत्यंत सुदंर असा अनुभव यावेळी मला मिळाला. आदरणीय आमदार विक्रांत दादा पाटील यांचे विशेष आभार. विक्रांत दादा पाटील यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी खूप मोठा ठरला. परसाला या विधानसभा क्षेत्रासाठी आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये काम करत होतो.

विक्रांत दादांच्या नेतृत्वाखाली केरळममधील निवडणुकीत पंचायतीची जबाबदारी सांभाळताना, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतून खूप काही शिकायला मिळालं.
दादांची एक खासियत म्हणजे ते कितीही कठीण काम असलं तरी ते अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. त्यांनी आम्हाला फक्त काम दिलं नाही, तर असा आत्मविश्वास दिला की जणू आम्हीच त्या निवडणुकीचे उमेदवार आहोत.

त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, विचार करण्याची पद्धत आणि प्रत्येक गोष्टीतली बारकाई या सगळ्यांतून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. दादांचं मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष विद्यापीठच आहे.

मनापासून धन्यवाद Vikrant Patil दादा.

Photos from Raunak Jayyaa Shetty's post 07/04/2026

📍 केरळम

विकसित केरळमच्या दिशेने वाटचाल करताना महिला माता भगिनींसोबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, समस्या आणि मते जाणून घेतली. त्यांच्या मनातील विकसित केरळमची संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित महिलांमध्ये लेखी फॉर्म भरून घेण्याचा उपक्रम राबवला या वेळी त्यांनी त्यांचे विकसित केरळम बाबतचे मत मांडले.

महिलांचा सक्रिय सहभाग हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. त्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कामाची दिशा ठरवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सशक्त महिला – सशक्त समाज – विकसित केरळम!

Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Vinod Tawde Dr. Bhagwat Karad Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Vikrant Patil Krish Mahadik

Photos from Raunak Jayyaa Shetty's post 31/03/2026

📍केरळम

विधानसभा निवडणुकी निम्मित केरळम येथे.

Photos from Raunak Jayyaa Shetty's post 29/03/2026

📍 केरळम | आंबोरी

भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. गिरीशजी नायर यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच शक्ती केंद्रे व बूथ प्रमुखांसोबत संवाद साधून संघटनात्मक बळकटीसाठी संवाद करण्यात आली.

Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Vinod Tawde Dr. Bhagwat Karad Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Vikrant Patil Krish Mahadik

27/03/2026

📍 केरळम | परशाला विधानसभा मतदारसंघ

परशाला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ते यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
या अधिवेशनाचे उद्घाटन करणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सैयद जफर इस्लाम जी, माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड, आमदार श्री. विक्रांतदादा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित मायाजी विश्वनाथ, तसेच सर्व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांचे मनापासून आभार

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उत्साह आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे. चला, विकसित परशालासाठी एकत्रितपणे पुढे जाऊया

Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Vinod Tawde Dr. Bhagwat Karad Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Vikrant Patil Krish Mahadik

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Shivajinagar
Pune