03/06/2026
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
संकष्टी चतुर्थी र्निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏
मा. उपसरपंच मांजरी बुद्रुक
03/06/2026
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
संकष्टी चतुर्थी र्निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏
01/06/2026
#माध्यमांची दखल
30/05/2026
महादेवनगर ते गोपाळपट्टी या मुख्य मार्गावर रस्त्याच्या कडेला नो-पार्किंग क्षेत्रात उभी राहणारी वाहने, तसेच रस्त्यालगत बसणाऱ्या विक्रेत्यांकडे भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी रस्त्यावरच थांबणारी वाहने यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाचे पीआय, मांजरी पोलीस स्टेशनचे पीआय तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना व अपेक्षा जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत आहेत.
📅 दिनांक : ३१/०५/२०२६
🕚 वेळ : सकाळी ११.०० वाजता
📍 स्थळ : सिरम कंपनी गेट समोर, गोपाळपट्टी मांजरी बु.
महादेव नगर ते गोपाळपट्टी पर्यंत रस्त्याच्या कडेला ज्या नो पार्किंग मध्ये गाड्या उभे राहतात व रस्त्याच्या बाजूला बसणारे विक्रेते यांच्याकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी रस्त्यावरती उभे राहतील वाहने यामुळे जो येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा येतो त्या संदर्भात वाहतूक विभागाचे पीआय मांजरी पोलीस स्टेशनचे पीआय व पालिकेचे सर्व अधिकारी उद्या दि.३१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गोपाळपट्टी येथील श्रीराम कंपनी गेट समोर उपस्थित राहणार आहे तरी सर्व नागरिकांनी आपल्या अडचणी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे.
जाई मंगल कार्यालय, मांजरी बु.
पाठीमागील कॉलनीमध्ये परिसर ड्रेनेज लाईनचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, सध्या आउटलेटसाठी योग्य स्रोत उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
24/05/2026
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी ₹१५० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये तब्बल ₹७५० कोटींची भरीव तरतूद करून मराठा समाजातील युवकांच्या प्रगतीला नवे बळ देण्यात आले आहे.
या निर्णयामुळे युवकांना स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसाय आणि स्वावलंबनासाठी मोठी संधी उपलब्ध होणार असून हजारो तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळणार आहे.