07/04/2024
जवाब दो! आयोजित 'पोस्टर प्रदर्शन' नक्की या आणि इतरांनाही सांगा
कधी - आज, रविवार 7 एप्रिल , सायंकाळी 5 वा.
कुठे - कात्रज तलाव मेन गेट, कात्रज, पुणे
संपर्क - अविनाश पवार 9890339013
जन जागृती मोहीम. जनतेच्या मनातील विविध प्रश्नांचा जवाब रस्त्यावर उतरून सरकारला विचारणारे आंदोलन.
लोकशाही रक्षणासाठी पुणेकर नागरिकांची जन जागृती मोहीम. जनतेच्या मनातील विविध प्रश्नांचा जवाब रस्त्यावर उतरून सरकारला जवाब विचारणारे आंदोलन.
07/04/2024
जवाब दो! आयोजित 'पोस्टर प्रदर्शन' नक्की या आणि इतरांनाही सांगा
कधी - आज, रविवार 7 एप्रिल , सायंकाळी 5 वा.
कुठे - कात्रज तलाव मेन गेट, कात्रज, पुणे
संपर्क - अविनाश पवार 9890339013
03/04/2024
लोकशाही समोरील आजच्या आव्हानांबाबत दोन ज्येष्ठ कार्यकर्ते संवाद साधणार आहेत. नक्की सहभागी व्हा.
02/04/2024
आज 2 एप्रिल, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ च्या सभासदांची मासिक बैठकीमध्ये 'जवाब दो!' आयोजित 'पोस्टर प्रदर्शन' लावण्यात आले. डॉ. अनंत फडके आणि अविनाश पवार यांनी एकूण 250 महिला आणि काही पुरुषाशी संवाद साधला.
जनतेच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न कोणते आहेत? सरकार ते प्रश्न सोडवत आहे का? की दुसरेच काही करत आहे? येत्या निवडणूकीत आपण याचा विचार करणार की नाही?
आशा प्रकारचे जनतेला जागृत करणारे हे प्रदर्शन आहे.
Anant Fadake, Avinash Pawar, Milind Chavan Dattatraya Jadhav Sadhana Shrinivas Khati Ajinkya Seema kakade, Sachin Desai, Medha Thatte
01/04/2024
काल भक्ती शक्ती उद्यान मेन गेट समोर झालेल्या 'जवाब दो!' आयोजित 'पोस्टर प्रदर्शनाला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
नागरिक मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत, यावेळी लढाई ही भाजप विरुद्ध भारत, लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशीच असणार आहे. ही कोण्या एक पक्षाविरूद्ध लढाई नसुन लोकशाही टिकवण्यासाठीची आणि हुकुमशाही विरुद्धची आहे.
Milind Chavan Sadhana Shrinivas Khati Rohit Borawake Ajinkya Gaikwad Deepak Patil Dattatraya Jadhav
मित्रांनो,
गाझापट्टीत सुरू असलेल्या भीषण युद्धखोरीच्या निषेधार्थ खाली निर्देशित केलेल्या अनेक पुरोगामी संघटनांतर्फे निदर्शनं करण्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वा आयोजित केला आहे. स्थळ: गुडलक चौक, डेक्कन, पुणे.
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. आमचे आवाहन खालीलप्रमाणे:
इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष
युद्धखोरी थांबवा!
गाझापट्टीत तात्काळ शांतता प्रस्थापित करा!
७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ या संघटनेने इस्रायलमध्ये हल्लेखोरी केल्यावर इस्रायलने आक्रमक भूमिका घेऊन गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव करून भीषण युद्ध सुरू केलेलं आहे. इस्रायल ‘स्वतःच्या संरक्षणा’ची भूमिका घेऊन गाझापट्टीतील हजारो निरपराध पॅलेस्टिनी लोकांचे बळी घेत आहे; त्यांची घरदारं उद्ध्वस्त करत आहे. आम्ही दोन्ही बाजूच्या अशा युद्धखोरीचा तीव्र निषेध करतो आणि हे युद्ध तात्काळ थांबवावं असं आवाहन करतो.
वीस लाखावर वस्ती असलेल्या गाझापट्टीवर सतत हल्ले सुरू आहेत. तेथील हॉस्पिटल्स, दवाखाने आणि आश्रयस्थानांवर निर्दयपणे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हल्यांमध्ये जखमी झालेल्यांवर उपचारही होऊ शकत नाहीत. तेथील जनतेला अन्न, पाणी, इंधन सर्व मूलभूत गोष्टींपासून वंचित करून त्यांना स्थलांतर करायला भाग पाडलं जात आहे. अनेक स्त्रिया, मुलं, वृद्ध यांचे हाल केवळ अमानुष असेच आहेत. अमेरिका व पाश्चात्य देश अशा नरसंहारासम कृत्यांचं, अमानुषतेचं सक्रिय समर्थन करत आहेत, हे निषेधार्हच आहे. त्याचप्रमाणे, भारतातील बहुतांश प्रसारमाध्यमंही पाश्चात्य कथनानुसार पक्षपाती भूमिका घेऊन वा अपप्रचार करून युद्धखोरीचं समर्थनच करत असल्याचं चित्र आहे.
‘दहशतवाद विरोधी युद्धा’च्या नावाखाली अमेरिकेने यापूर्वी इराक, अफगाणिस्तान आदी देशांमधील अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले आहेत आणि जनजीवन उद्धवस्त केलेलं आहे, हा इतिहास आहे. इस्रायलने तर पॅलेस्टाइनचा मोठा भूभाग बळकावला आहेच, पण गेली सुमारे पाच दशकं वेस्ट बँक आणि गाझापट्टीमधील पॅलेस्टिनी जनांचा सातत्याने जिवंत छळ करत आहे. गाझापट्टी भाग तर गेली कित्येक वर्षं खुला तुरुंग ठरल्यागत स्थिती आहे.
युद्धखोरी आणि असा छळवाद तात्काळ बंद करून इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाबाबत शांततापूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू करावेत, अशी आग्रही भूमिका भारत सरकारने घ्यावी, असे संयुक्त आवाहन आम्ही पुण्यातील विविध संघटना आणि नागरी समाज-गट करत आहोत.
‘युवक क्रांति दल’, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’ (NAPM), ‘जवाब दो’, ‘लोकशाही उत्सव समिती’, श्रमिक महिला मोर्चा’, अ.भा.जनवादी महिला संघटन,
‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (PUCL, Pune), ‘पुणे कलेक्टिव्ह’, विचार वेध’,
‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ (CITU), ‘महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक महासंघ’, ‘नव समाजवादी पर्याय’, ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI), ‘लोकशाही युवा संघटन', ‘कम्युनिस्ट गदर पार्टी’.
संपर्क: सचिन पांडुळे ९०९६३१३०२२, सुनीती सु.र. ९४२३५७१७८४, मिलिंद चंपानेरकर ९८२३२४८००३
मणिपूर _ शासन पुरस्कृत हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधी आंदोलन । अभय शुक्ला । २३ जुलै २०२३
मणिपूर _ शासन पुरस्कृत हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधी आंदोलन । रजिया पटेल । २३ जुलै २०२३
मणिपूर _ शासन पुरस्कृत हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधी आंदोलन । किरण मोघे । २३ जुलै २०२३
24/07/2023
Jawab Do Demands during Protest against Manipur Violence and Sexual Abuse of Women
1) Chief Minister Biren Singh, who has miserably failed to mitigate the situation in Manipur, must accept responsibility and resign
2) The culprits, including Police (in women’s sexual exploitation) must be arrested immediately, and justice must be ensured in a time-effective manner. A separate committee of Judges (outside) Manipur should be formulated for speedy disposal of these cases.
3) All cases of r**e and seducement of women need to documented, and a special Tribunal has to be formulated for ensuring justice
4) Focus must be on rehabilitation of the displaced people, which can be achieved by providing ample resources to relief camps
5) All possible measures should be adopted to ensure peace in Manipur
PMO India
Amit Shah
N.Biren Singh
23/07/2023
मणिपूरमधील राज्य पुरस्कृत हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारांच्या धिक्कार करण्यासाठी जबाब दो आंदोलन.
मणिपूर मध्ये दीर्घकाळ उफाळलेला हिंसाचार आणि स्त्रियांवरच्या क्रूर लैंगिक अत्याचाराचा धिक्कार करण्यासाठी रविवारी संध्याकाळी संभाजी पार्क पदपथावर जवाब दो आंदोलन झाले.
मणिपूर मधील हिंसाचार घडलेला नसून घडवलेला आहे, राज्य पुरस्कृत आहे. भाजपच्या बहुसंख्यांकवादी आणि विदेशी राजकारणामुळे मणिपुरी जनता होरपळून निघाली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंग आणि केंद्रातील सत्ताधारी सरकार यांनी या हिंसाचाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खतपाणीच घातलेले आहे. गुजरात मध्ये झालेल्या शासन पुरस्कृत हत्याकांडाच्या धर्तीवरच मणिपूरमध्येही संघर्ष पेटवण्यात आला आहे. बेटी बचाव चा नारा देणारे मणिपूर मधील स्त्रियांच्या अत्याचाराबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत.
मणिपूर मधील लैंगिक अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मांडणी कार्यक्रमासाठी जमलेल्या संस्था संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.
संस्था संघटनांमध्ये लोकशाही उत्सव समिती, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, श्रमिक महिला मोर्चा, डीवायएफए, नव समाजवादी पर्याय, अखिल भारतीय महिला जनवादी संघटना, अखिल भारतीय जनरल कामगार युनियन, लोकजागर, निर्भय बनो, बिंदू क्विअर फौंडेशन, लोकशाही युवक संघटना, जन आरोग्य अभियान इ. संस्था संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. पुरोगामी वर्तुळातील कार्यकर्त्यांप्रमाणेच डेक्कन परिसरातील तरुणांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
23/07/2023
मणिपूरमणिपूर मधील हिंसाचार, लैंगिक अत्याचार आणि विद्वेषी राजकारणाचा अधिकार करण्यासाठी
जवाब दो आंदोलन
रविवार 23 जुलैजुलै 2023
छ. संभाजी उद्यान पदपथ, जंगली महाराज रस्ता पुणे
आपल्या अस्वस्थ होण्याला वाट करून देण्यासाठी, आणि आवाज उठवण्यासाठी.
सामील व्हा, आणि इतरांनाही सांगा!