Mayur Daundkar

Mayur Daundkar

Share

थोर क्रांतिकारक "राजगुरू" भक्त

25/08/2024

आज काळूस येथील शेतकरी उपोषणाचा सलग अकरावा दिवस…

काळूस गावातील बेकायदा पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या आता सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन मंजुरी साठी मंत्रालयामध्ये निर्णायक वळणावर आहेत. सरकारला हा निर्णय घेण्यासाठी जाग यावी आणि गांभीर्याने या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. म्हणून उद्या काळूस याठिकाणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. माझी आपणा सर्व जाणकार शेतकरी बांधवांना तसेच खेड तालुक्यातील नागरीकांना विनंती आहे की आपण या उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने काळूस या ठिकाणी सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे.

आपला
मयुर मगन दौंडकर
प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी युवा आघाडी
महाराष्ट्र राज्य.

24/08/2024
23/08/2024

केंद्र सरकारने सामान्य माणसाच्या खिशातून जाणाऱ्या करातून संपूर्ण भारतातील ग्रामपंचायत कार्यालय डिजिटल करण्याच्या नावाखाली बीबीएनएल कंपनीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांचा अपव्यय होत असल्याचे सर्वसामान्य नागरिक तसेच प्रशासनाच्या निदर्शनास यावे यासाठी गेली चार दिवस श्री कुंडलिक कोहिनकर हे पंचायत समिती कार्यालय खेड या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत.
उपोषणाचा आज सलग चौथा दिवस असताना देखील प्रशासनाने या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही. म्हणूनच आपणा सर्व नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे जास्तीत जास्त संख्येने या अति महत्त्वाच्या मुद्द्याला समर्थन दर्शविण्यासाठी उपोषण स्थळी भेट द्यावी.
आपला
मयूर मगन दौंडकर
प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी युवा आघाडी
महाराष्ट्र राज्य.

#LIVE | खेड तालुक्यासाठी व्हिजनरी आमदार पाहिजे ! -मयुर दौंडकर (आप - प्रदेश युवक अध्यक्ष) 23/08/2024

| खेड तालुक्यासाठी व्हिजनरी आमदार पाहिजे ! - मयुर दौंडकर (आप - प्रदेश युवक अध्यक्ष)

संपूर्ण मुलाखत पहा पीसीबीच्या फेसबुक व युट्यूब चॅनेलवर

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा 👇

YouTube :

#LIVE | खेड तालुक्यासाठी व्हिजनरी आमदार पाहिजे ! -मयुर दौंडकर (आप - प्रदेश युवक अध्यक्ष) | खेड तालुक्यासाठी व्हिजनरी आमदार पाहिजे ! -मयुर दौंडकर (आप - प्रदेश युवक अध्यक्ष) ...

18/08/2024

आज काळूस येथील शेतकरी बांधवांच्या उपोषणाचा सलग चौथा दिवस….

गेले ४ दिवस उपोषणकर्त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाहीये. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. माझी सर्व नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने उपोषण स्थळी पोहचून आपला पाठिंबा जाहीर करावा.

आपला
मयुर मगन दौंडकर
प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी युवा आघाडी
महाराष्ट्र राज्य

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Khed-Alandi Constituency
Pune
410501