Dr Smita Yogesh Jadhav

Dr Smita Yogesh Jadhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Smita Yogesh Jadhav, Social service, pune, Pune.

Official - BJP–Mahayuti Candidate | Pune Graduates’ Constituency


Dr. Smita Jadhav | Official Supporters’ Page
🌱 Educationist | Institutional Leader
🎓 Pro-Vice-Chancellor, DPU, Pune
✨ Education • Youth • Skills • Leadership
📍 Pune Graduates’ Constitue

आज पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आवर्जून मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झ...
23/10/2026

आज पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आवर्जून मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झालेल्या सर्व पदवीधर बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार!

गेल्या काही दिवसांत तुम्ही दिलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. ज्यांनी रात्रंदिवस न थकता काम केले, त्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती आणि सर्व मित्रपक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, बूथ प्रमुखाचे आणि पदाधिकाऱ्याचे ऋण शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता.

– डॉ. स्मिता योगेश जाधव

's

आज लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार तर आहेच, पण ते आपले कर्तव्यही आहे. सर्व पदव...
23/10/2026

आज लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार तर आहेच, पण ते आपले कर्तव्यही आहे. सर्व पदवीधर आणि शिक्षक बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की आपण आज आवर्जून मतदान करा आणि लोकशाही अधिक बळकट करा.

– डॉ. स्मिता योगेश जाधव

देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!देशाच्या सुरक्षित...
22/10/2026

देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

देशाच्या सुरक्षिततेसाठी कणखर निर्णय घेणारे आणि सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवी दिशा देणारे शाह साहेबांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!

– डॉ. स्मिता योगेश जाधव

आज दादांचा, माझ्या आजोबांचा, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस. ते गेल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस. दरवर्...
22/10/2026

आज दादांचा, माझ्या आजोबांचा, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस. ते गेल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस. दरवर्षी या दिवशी घरात माणसांची वर्दळ असायची, शुभेच्छांचे फोन थांबायचे नाहीत. यंदा घर तेच आहे. माणसंही तीच आहेत. फक्त दादा आपल्यात नाहीत.

लोक त्यांना शिक्षणमहर्षी म्हणतात. मी त्यांना आधी आजोबा म्हणून ओळखलं. मग हळूहळू कळत गेलं की हा माणूस किती मोठं काम करून बसला आहे. ज्या काळात गावातल्या शेतकऱ्याच्या मुलाला डॉक्टर होण्याचं स्वप्नही परवडत नव्हतं, त्या काळात त्यांनी कोल्हापूरपासून पुण्या- मुंबईपर्यंत वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाची दारं उघडली. ज्यांच्या घरात कधी कोणी कॉलेजची पायरी चढलं नव्हतं अशा कितीतरी कुटुंबांतली पहिली पदवी त्या शिक्षण संस्थांमधून आली.

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयतने पश्चिम महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षणाचा पाया घातला होता. त्याच वाटेवर अनेकांनी शिक्षणसंस्था उभ्या केल्या. दादा त्यांच्यापैकी एक. कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि उच्च शिक्षणाचं जाळं उभं केलं. सरकार जिथे पोहोचू शकलं नाही तिथे या संस्था पोहोचल्या. पण माझ्या मते त्यांच्या कामाचं खरं मोल इमारतींमध्ये नाही. त्यांनी लोकांसाठी ज्या संधी उपलब्ध करून दिल्या, जी दारं उघडली त्यात त्यांच्या कामाचं खरं महत्त्व आहे. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनिअर, कुणी प्राध्यापक. एका पिढीत एका कुटुंबाचं आयुष्य बदललं. आज पश्चिम महाराष्ट्रातल्या गावागावात जे डॉक्टर, इंजिनिअर दिसतात, त्यामागे अशा अनेक शिक्षणसंस्थांची गोष्ट आहे.

दादांकडून मी जे शिकले ते एका वाक्यात सांगता येईल. प्रश्न दिसला की त्यावर भाषण द्यायचं नाही, उपाय उभा करायचा. रुग्णांना उपचार मिळत नाहीत? हॉस्पिटल उभं करा. मुलांना शिक्षण मिळत नाही? कॉलेज उभं करा. आणि एकदा उभं केलं, की ते पिढ्यान्पिढ्या चालवायचं. एक हॉस्पिटल उभं राहिलं की तिथे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी, शेकडो कुटुंबं उभी राहतात. संस्था म्हणजे फक्त इमारत नसते. ती एक जिवंत व्यवस्था असते. हे मला कुठल्या पुस्तकाने शिकवलं नाही. ते मी घरात, त्यांना काम करताना पाहत पाहत शिकले. शिक्षणाचं बाळकडू म्हणतात ना, ते मला असं मिळालं. आज मी ज्या संस्थांमध्ये काम करते तिथे रोज कुठलातरी निर्णय घेताना मनात प्रश्न येतो की दादांनी हा निर्णय कसा घेतला असता? उत्तर बहुतेक वेळा एकच असतं. ज्याच्यासाठी हे सगळं उभं केलं त्या विद्यार्थ्याचा, त्या रुग्णाचा आधी विचार करा.

दादा, तुम्ही उघडलेली दारं आजही उघडी आहेत. त्यातून रोज नवी मुलं आत येतात, डोळ्यांत स्वप्नं घेऊन. त्या प्रत्येक मुलात मला तुम्ही दिसता. आज मी एका नव्या वाटेवर उभी आहे. ही वाट माझ्यासाठी नवी आहे पण तिची दिशा नवी नाही. तुम्ही आयुष्यभर ज्या माणसांसाठी काम केलंत त्याच माणसांसाठी काम करण्याची ही वाट आहे. पहिल्यांदाच अशा वळणावर उभी आहे जिथे तुमचा हात खांद्यावर नाही. पण एक गोष्ट मला मनापासून माहीत आहे. तुम्ही जिथे असाल तिथून तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही शिकवलेलं सगळं, संयम, कष्ट, माणसांवरचा विश्वास, ते माझ्यासोबत आहे. आणि तेच मला पुढे नेणार आहे. तुम्ही उघडलेली दारं उघडी ठेवणं आणि जमलं तर अजून नवी दारं उघडणं हीच तुम्हाला माझी खरी आदरांजली असेल.

आज तुमची खूप आठवण येतेय...
विनम्र अभिवादन!

21/10/2026

कौशल्य प्रशिक्षण, काळाची गरज...

आज सोलापूर येथे "गंगा निवास" या निवासस्थानी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर समितीचे विश्वस्त मा. श्री. धर्मराज काडादी यांची...
21/10/2026

आज सोलापूर येथे "गंगा निवास" या निवासस्थानी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर समितीचे विश्वस्त मा. श्री. धर्मराज काडादी यांची सदिच्छा भेट घेतली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या सेवेसोबतच सहकार आणि सामाजिक क्षेत्रात सोलापूरच्या प्रगतीसाठी योगदान देणारे धर्मराजजी हे सोलापूरचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. काडादी कुटुंबीयांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने मन भरून आले. सोलापूरचा विकास, शिक्षण आणि तरुणांच्या संधी यावर मनमोकळा संवाद झाला.

या प्रसंगी भाजपा सोलापूर शहराध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजिताताई चाकोते, श्री. पुष्कराज काडादी, सौ. तेजश्री काडादी, प्राचार्य श्री. गजानन धरणे सर, श्री. गिरीश बुगडे, श्री. संजय मंठाळे, श्री. शांतय्या स्वामी, श्री. संजय कुलकर्णी, डॉ. शैलेश पाटील आणि श्री. अमोल पाटील उपस्थित होते.

– डॉ. स्मिता योगेश जाधव

आज सोलापूर येथील श्री मार्कंडेय मंदिरात भेट देऊन श्रद्धेने दर्शन घेतले.सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची आणि कष्टकरी विणकर परं...
21/10/2026

आज सोलापूर येथील श्री मार्कंडेय मंदिरात भेट देऊन श्रद्धेने दर्शन घेतले.

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची आणि कष्टकरी विणकर परंपरेची श्रद्धा जिथे जोडलेली आहे, त्या या पवित्र स्थानी नतमस्तक होताना मन प्रसन्न झाले. भगवान मार्कंडेयांच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच प्रार्थना.

– डॉ. स्मिता योगेश जाधव

Address

Pune
Pune
411018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Smita Yogesh Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category