26/03/2026
|| श्रीराम नवमी ||
मर्यादा, सत्य आणि धर्म यांचे प्रतीक प्रभू श्रीराम यांच्या पवित्र जन्मोत्सवानिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…! प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सदैव सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना…
08/03/2026
आदिशक्तीचे रूप म्हणजे स्त्री, मायेचा सागर, त्यागाची मूर्ती आणि कर्तृत्वाची ओळख म्हणजे स्त्री. घर, समाज आणि देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
02/03/2026
आज फाल्गुनी पौर्णिमा अर्थात होळी ! अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण !
होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार, ईर्ष्या आणि द्वेषाचे दहन व्हावे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्याचे नवे रंग नांदावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
#होळी
27/02/2026
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञानपीठ विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
मराठी ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे. “माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके…” या अभिमानास्पद भावनेने मराठी जपूया, वाढवूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया!
#जागतिकमराठीभाषादिन #मराठीभाषा #मराठीअभिमान
06/01/2026
‘एका कपात… आनंद अफाट!’ ☕
या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या
‘गुरुकृपा आरोग्यदायी गुळाचा चहा’
या नवीन व्यवसायाच्या भव्य उद्घाटनानिमित्त मा. श्री. शुभम भैय्या सपकळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याला प्राधान्य देत गुळाच्या चहाची ही अभिनव संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आहे. तुमच्या मेहनतीला, जिद्दीला आणि दूरदृष्टीला यशाची मोठी साथ लाभो, हीच सदिच्छा.
भवानीनगर परिसरातील चहाप्रेमींसाठी ही एक उत्तम आणि आरोग्यदायी भेट ठरेल, यात शंका नाही. तुमचा हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करत जावो आणि ‘गुरुकृपा’ ब्रँडची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण होवो, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा!
30/12/2025
नको श्रीमंतीची आस देवा |
नसावा सौंदर्याचा मोह ||
चरणांचा असो ध्यास देवा |
असावी भक्तीची मज आस ||
पुत्रदा एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
23/12/2025
आज राष्ट्रीय शेतकरी दिन!
मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाच्या अथक परिश्रमांना व त्यागाला नमन करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य, समाधान आणि शांती लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
27/10/2025
आदरपूर्वक भेट
आमचे मित्र श्री. गोविंद केला सर यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी विशेष सन्मान करून आमचे मनःपूर्वक स्वागत केले.
पॉलिसी क्षेत्रातील त्यांचा 25 वर्षांचा अनुभव आणि 30,000 समाधानी ग्राहक हेच त्यांच्या कार्याची साक्ष देतात. 18 प्रकारच्या पॉलिसींमधून प्रत्येक गरजेसाठी योग्य उपाय देणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलेले व्यक्तिमत्व —
श्री. गोविंद केला सर यांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा!