दिवाळी पहाट २०२५ 🪔
✨ #2025
Ranjit Shrikant Shirole
सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
General Secretary Maharashtra Navnirman Sena
अनेक वर्षे राजकारणाद्वारे लोकसेवेसाठी सक्रियपणे काम करत सामान्य मराठी माणसासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष पद स्वीकारून पर्यावरणाबाबत नितांत प्रेम असणारे लोकनेते.
18/10/2025
आपणांस सहपरिवार सस्नेह निमंत्रण... सालाबादप्रमाणे कमला नेहरू उद्यान येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.😊🙏🏻
✨
17/10/2025
स्वर दिपावली संगीत महोत्सव 2025
'अविस्मरणीय क्षणांची सुरेल उधळण"
आपल्या पार्कात आपली दिवाळी पहाट🪈🪘
15/10/2025
एक पिढी पुढे सरकते आणि मागे राहतात त्या फक्त आठवणी.
पुणे शहरासाठी अणि देशासाठी शिरोळे परिवाराच्या योगदानाचा इतिहास हा खूप जुना आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची शाहीस्तेखानाची मोहिम - सरदार बांदल ह्यांच्या बरोबर पावनखिंड युद्ध- श्रीमंत पेशवे साहेबांच्या बरोबर पानिपत ची लढाई पासून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणे ते आधुनिक पुणे शहराच्या जडणघडणीत - शैक्षणिक शासकीय क्रिडा क्षेत्रात मोठा वाटा उचलणे ( फर्ग्युसन महाविद्यालय उभारणी साठी भाडेतत्त्वावर जागा देणे मनपा इमारत उभारणी असेल, डेक्कन जिमखाना, पी वाय सी, सारख्या संस्थांसाठी जागा देणे इत्यादी) संयुक्त महाराष्ट्र समिती मध्ये सहभागी होऊन आमच्या आजी श्रीमती शकुंतलादेवी ह्यांनी कारावास देखील भोगला.आमच्या चुलत आजी मालतीबाई शिरोळे ह्या बारामती च्या आमदार होत्या. Deputy General of Police - DIG शिरोळे हे तत्कालीन मुंबई province che मोठे पोलिस अधिकारी होते (संपूर्ण मुंबई province ला फक्त दोन DIG असत त्यातील ते एक)
त्यानंतर परिवारात क्रिडा, व्यावसायिक नंतर वैद्यकीय क्षेत्रात डॉ धैर्यशील शिरोळे आणि आता त्यांचे चिरंजीव डॉ श्रीरंग शिरोळे हे कार्यरत आहेत तसेच राजकीय क्षेत्रात आमचे वडील श्री श्रीकांत शिरोळे हे सगळ्यात तरुण नगरसेवक झाले आणि सगळ्यात तरुण स्थायी समितीचे अध्यक्ष ही झाले त्यांच्या पुढाकाराने जंगली महाराज रस्ता बनला जो आज 50 वर्षांनी देखील पुण्यातील सर्वोत्तम रस्ता म्हणुन त्याची कीर्ती आहे. नंतर श्री अनिल शिरोळे हे नगरसेवक आणि पुढे खासदार झाले आज त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री सिद्धार्थ शिरोळे हे नगरसेवक आणि आज आमदार आहेत... ह्या मधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे दोन सख्खे भाऊ आणि त्यांनी केलेला विक्रम म्हंटलं तर काही वावगे ठरणार नाही..ते म्हणजे स्व भाऊसाहेब शिरोळे आणि त्यांचे धाकटे बंधू स्व बाळासाहेब शिरोळे, पुणे शहरात कदाचित ही एकमेव सख्ख्या भावांची जोडी असेल जे दोघेही ह्या पुण्यनगरी चे महापौर झाले. आज हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे काल १४.१०.२०२५ रोजी आमच्या लाडक्या काका आजोबांचे म्हणजेच स्व बाळासाहेब शिरोळे ह्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
एक पिढी पुढे सरकते आणि मागे राहतात त्या फक्त आठवणी... स्व बाळासाहेब शिरोळे - काका आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती: 🙏🏼
19/08/2025
पावसामुळे अडचणीत आलात?
मदतीसाठी महाराष्ट्र सैनिक तत्पर आहेत!
आपल्या जवळच्या मनसे शाखेशी संपर्क साधा.
18/08/2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील औंध ते सिमला ऑफिस कडे जाणारा उड्डाणपूल काम पूर्ण होऊन तयार आहे परंतु नेतेमंडळींची उद्घाटन साठी वेळ मिळत नाही . नागरिकांची गैरसोय होत आहे पण शासनाला त्याचे महत्व नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करून जर लवकर पूल सुरू नाही केला तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. अपेक्षा आहे की दखल घेऊन उड्डाणपुल नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल .
Flyover at SPPU chowk from aundh towards simla office is ready but only due to non availability of leaders (time) the inauguration is not done causing immense inconvenience to citizens. We Maharashtra Navnirman Sena ( MNS ) did a symbolic inauguration and gave a stern warning if the Flyover is not opened soon for public we will put up a strong protest. And the general public will start using the Flyover.
- मनसे सोशल *t_shirole_official Shirole .mns18
randive.7
01/04/2025
https://youtu.be/-m5jNjohUbk?si=9XSqHXk09Y0D-44Q
On the occasion of Gudhi Padwa I
was given the opportunity to give a speech at Chatrapati Shivaji Maharaj Park- Mumbai
Tried to put forth the current situation and impending issues of ,Hope it helps in resolving them and we have a better city.
Thank you shri Raj Thackeray for this honour.
MNS Adhikrut
Ranjit Shirole : ाझा Raj Thackeray LIVE | MNS | Gudhi Padwa Melava | Maharashtra P...
30/03/2025
#गुढीपाडवामेळावा२०२५
03/03/2025
रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड, जिल्हा पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार आहे
सन्माननीय अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांचे आगमन ठीक १०.३० वाजता थेट व्यासपीठावर होईल व ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करून शुभेच्छा देतील.
तरी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे कि १०.३० पर्यंत सभागृहात स्थानापन्न व्हावे.
13/12/2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
प्रभाग क्रमांक-७ आयोजित
नवमतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटननिमित्ताने मनसे प्रदेश सरचिटणीस
मा.रणजितदादा शिरोळे
मनसे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष
मा.विनायकभाऊ कोतकर, उपविभाग अध्यक्ष विशालभाऊ पवार व निलेशभाऊ रणदिवे
यांच्या सर्व सहकारी उपस्थित होते.
अभियानास पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला...
आयोजक
आकाश दिपक धोत्रे
उपविभाग अध्यक्ष-छत्रपती शिवाजीनगर विधानसभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
21/10/2024
पोलीस स्मृतिदिन !
देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सर्व पोलिसांना
हुतात्मा दिनी कोटी कोटी प्रणाम !
#पोलीस_स्मृतिदिन
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Website
Address
Pune
411004
