BJP Bhosari

BJP Bhosari

Share

Official Page of BJP Bhosari (PCMC)
भारतीय जनता पार्टी, भोसरी अधिकृत फेसबुक पेज

Photos from BJP Bhosari's post 10/04/2026

पिंपरी-चिंचवडमधील पवना व इंद्रायणी नद्यांतील वाढते प्रदूषण हा शहराच्या आरोग्यासमोर गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांनी आज दोन्ही नद्यांवरी रावेत आणि निघोजे बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी महापौर श्री. रवि लांडगे, आमदार श्री. शंकर जगताप, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेता श्री. भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. अभिजीत चौधरी, मुख्य अभियंता श्री. प्रमोद ओंबासे यांच्यासह महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि पर्यावरण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नदीत मिसळणारे शहरी व औद्योगिक सांडपाणी हे नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट गावांमध्ये पवना नदीवर तातडीने STP प्रकल्प उभारणे. किवळे येथील 20 MLD STP साठी प्रलंबित GR त्वरित जारी करणे. रावेत व निघोजे बंधाऱ्यांवर अत्याधुनिक एरेटर बसवणे. प्रदूषण ‘हॉटस्पॉट’ ठिकाणी वर्षभरात STP कार्यान्वित करणे. PMRDA मार्फत जलपर्णी काढण्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवणे. यासह दीर्घकालीन उपायांमध्ये स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा, निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांवर टर्शरी ट्रीटमेंट व ओझोनेशन युनिट, तसेच नदी सुधार प्रकल्पांमध्ये जैवविविधता व पर्यावरणपूरक विकासावर भर याकडे मंत्रीमहोदय यांचे लक्ष वेधले.

नदी प्रदूषण आणि पाणीपुरवठा या मुद्यावर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून सर्व प्रकल्पांना कालबद्ध गती द्यावी, तसेच केंद्र सरकारकडून NRCD अंतर्गत मंजुरी लवकर मिळावी, अशीही मागणी करण्यात आली. “पिंपरी-चिंचवडकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त पाणी मिळणे हेच आमचे ध्येय आहे. यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सर्वोतोपरी राहील. शहराला प्रदूषणमुक्त पाणीपुरवठा करणे हीच आमची ‘फर्स्ट प्रायोरिटी’ आहे.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Pankaja Gopinath Munde Shankar Jagtap रवि बाबासाहेब लांडगे BJP Maharashtra

Photos from BJP Bhosari's post 09/04/2026

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने माध्यम प्रमुख पदी श्री. गोविंदजी येतयेकर तर, सह माध्यम प्रमुख पदी श्री. ओमप्रकाशजी चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्हीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस श्री. राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस श्री. सुनीलजी राणे, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराजजी महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. गोविंदजी येतयेकर, श्री. ओमप्रकाशजी चौहान यांचे हार्दिक अभिनंदन..!

Ravindra Chavan BJP Maharashtra Rajesh Pande Krish Mahadik BJYM

09/04/2026

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली नव्या भारताने अणूऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे.

तामिळनाडूतील कलपक्कम येथे ५०० मेगावॅट क्षमतेचा पहिला स्वदेशी ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर (PFBR)’ यशस्वीरित्या कार्यान्वित होणे ही केवळ तांत्रिक कामगिरी नसून भारताच्या आत्मनिर्भरतेची ठाम घोषणा आहे.

रशियानंतर असा पराक्रम करणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. २०० हून अधिक भारतीय उद्योगांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प ‘Make in India’ च्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे.

भारतीय अणूऊर्जा कार्यक्रमाचे जनकडॉ. होमी भाभा यांच्या त्रि-स्तरीय अणूऊर्जा कार्यक्रमातील दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार करत भारताने ऊर्जा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे.

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी हे पाऊल देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

हा केवळ प्रकल्प नाही, तर ‘शक्तिशाली, स्वावलंबी आणि विकसित भारता’कडे नेणारी एक भक्कम वाटचाल आहे.

Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

09/04/2026

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित आराखडा !

महामेट्रोकडून सुधारित निगडी ते चाकण डीपीआर तयार..!

असा आहे सुधारित आराखडा...

तीन ऐवजी सहा डब्यांची असणार मेट्रो

भक्ती शक्ती चौक ते तूळवडे चौक मार्गे चाकण एमआयडीसी असणार मार्ग.

भुजबळ चौक ते वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गांची रचना प्रवाशांना सोईस्कर

मेट्रो स्थानकांच्या जवळपास वाहन तळांची व्यवस्था

नवा मार्ग...

निगडी ते चाकण आराखड्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक, ट्रान्स्पोर्टनगर, गणेशनगर, मुक्ताई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर ('वायसीएम' जवळ), गवळीमाता चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग असून, सुधारित आराखड्यात भोसरीचाही समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि मेट्रो प्रशासनाचे मनःपूर्वक आभार!

Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

08/04/2026

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ - तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत.

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा.

Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

07/04/2026

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगती करत आहे. महाराष्ट्राची घोडदौड आता थांबणार नाही याची खात्री आहे.

🔰 मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त) 🔰

✅ स्वतंत्र AI विभाग:
राज्यात इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साyठी स्वतंत्र स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन करण्यास मंजुरी [४, ९].

✅ महावितरणची पुनर्रचना:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची (महावितरण) आर्थिक पुनर्रचना आणि शेअर बाजारात लिस्टिंग (Listing) करण्याचा निर्णय [४, ९, १०].

✅ प्रशासकीय सुधारणा:
सरकारी नोकऱ्यांमध्ये 'IT कॅडर' निर्माण करण्याचा निर्णय [४, ९].

✅ आपत्ती व्यवस्थापन:
आपत्ती व्यवस्थापन विभागाशी निगडीत महत्त्वपूर्ण निर्णय [१].

✅ पायाभूत सुविधा:
मुंबईतील ५ प्रवेशद्वारांवर हलकी वाहने, शालेय बसेस आणि एमएसआरटीसी बसेसना टोल माफी, तसेच हडपसर-यवत रस्ता सुधारणेबाबत निर्णय [७].

Devendra Fadnavis Ravindra Chavan CMOMaharashtra BJP Maharashtra

#मंत्रिमंडळनिर्णय

07/04/2026

मोदी सरकारच्या नेतृत्वात इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीेत भारताची ऐतिहासिक झेप..!

Narendra Modi Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

Photos from BJP Bhosari's post 06/04/2026

भाजपा म्हणजे – मिशन
भाजपा म्हणजे – समाजसेवा
भाजपा म्हणजे – समाजाचे सशक्तीकरण
भाजपा म्हणजे – नव्या भारताचे निर्माण

राष्ट्र प्रथम... या ध्येयाने शेवटच्या घटकांती प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन अखंडपणे पुढे जाणाऱ्या जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. भाजपा स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना आणि भाजपावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाला हार्दिक शुभेच्छा.

गेल्या १० वर्षांत विकासाच्या मार्गावर वेगाने धावणाऱ्या देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याची ग्वाही पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी दिली आहे. त्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीनजी नबीन यांच्या नेतृत्वाखाली तत्परतेने कार्यरत आहे.

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘‘सबका साथ... सबका विकास’’ या संकल्पाने काम करीत आहोत. देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने जोडून 'विकसित भारताचे' स्वप्न साकार करण्यासाठी, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जनसेवेसाठी पूर्णतः समर्पित आहोत.

अजेय भारत... अजेय भाजपा..!

Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

Photos from BJP Bhosari's post 05/04/2026

'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' म्हणजे कार्यकर्त्यांसाठी वैचारिक शिदोरी..!

📍स्थळ : हॉटेल कलासागर, कासारवाडी.

​मोशी - चऱ्होली मंडल व तळवडे-यमुनानगर मंडलचा प्रशिक्षण वर्ग हॉटेल कलासागर येथे आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

"भारतीय जनता पार्टी हा केवळ सत्तेसाठी चालणारा पक्ष नसून, तो विचारांवर अधिष्ठित असलेला पक्ष आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण आणि पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान' ही एक महत्त्वाची शिदोरी आहे," असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. ​यावेळी व्यासपीठावर मंडळाचे विविध पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

​अंत्योदय हाच आमचा ध्यास :
तळवडे- यमुनानगर सारख्या औद्योगिक आणि निवासी भागात काम करताना कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 'एकात्म मानववाद' आणि 'अंत्योदय' या विचारांनुसार समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

​प्रशिक्षणाचे स्वरूप:
या वर्गात प्रामुख्याने संघटन कौशल्य, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि केंद्र सरकारच्या १० वर्षांतील ऐतिहासिक निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. तळवडे-यमुनानगर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन केले होते. या प्रशिक्षण वर्गाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झाला आहे.

यावेळी विभागीय संगठन मंत्री पश्चिम महाराष्ट्र श्री मकरंदजी देशपांडे, शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, सदाशिव खाडे, सचिनजी पटवर्धन, संघटन सरचिटणीस श्री मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस श्री विकास डोळस, श्री मधुकर बच्चे, सौ वैशाली खाड्ये, माजी महापौर नितीन काळजे, राहुलदादा जाधव, नामदेवजी ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री संजय पटनी, मोशी चऱ्होली मंडलाचे अध्यक्ष श्री अजित बुर्डे, तळवडे-यमुनानगर मंडलाचे अध्यक्ष श्री रामदास कुटे, सर्व नगरसेवक, विविध पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Shatrughna Kate Uma Khapre - उमा खापरे Adv Moreshwar Shedge Vikas Harishchandra Dolas Vaishali Gogavale Khadye Nitin Pratap Kalje Rahul Gulab Jadhav Sanjay Patni BJP Maharashtra

04/04/2026

मोदी सरकारच्या नेतृत्वात संरक्षण निर्यातीत भारताची ऐतिहासिक झेप..!

Narendra Modi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

Photos from BJP Bhosari's post 30/03/2026

भाजपच्या ‘मंडल प्रशिक्षण वर्गा’तून कार्यकर्त्यांना मिळाले वैचारिक बळ; दोन मंडलाचे प्रशिक्षण संपन्न..

स्थळ :📍हॉटेल कलासागर,कासारवाडी

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक धार देण्यासाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत विशेष मंडल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल कलासागर येथे पार पडलेल्या या वर्गात दिघी-गवळीनगर- गव्हाणेवस्ती मंडल आणि धावडेवस्ती-इंद्रायणीनगर-नेहरूनगर मंडल अशा दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी उपस्थित राहून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दोन मंडळांचा समन्वय आणि उत्साह...
या प्रशिक्षण वर्गामध्ये दोन्ही मंडळांतील शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.एकाच छताखाली दोन महत्त्वाच्या मंडळांचे प्रशिक्षण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन समन्वयाची भावना अधिक दृढ झाली.

"पक्षाची विचारप्रणाली आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच कार्यकर्त्यांचे मुख्य ध्येय आहे. दिघी, गवळीनगर, गव्हाणेवस्ती सोबतच धावडेवस्ती, इंद्रायणीनगर आणि नेहरूनगर या भागांतील कार्यकर्त्यांनी नेहमीच पक्षासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या प्रशिक्षणातून मिळालेली शिदोरी कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी अधिक सक्षम करेल," असे मत श्री शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणातील प्रमुख विषय:👇
• संघटन बांधणी: प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाची उपस्थिती कशी वाढवावी.
• अंत्योदय विचार: पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा विचारांनुसार शेवटच्या व्यक्तीचा विकास.
• डिजिटल कनेक्ट: सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, आमदार श्री. अमित गोरखे, मा. खासदार श्री. अमरजी साबळे, श्री. हेमंतजी हरहरे, संगठन सरचिटणीस श्री. मोरेश्वर शेडगे, श्री. विकास डोळस, सौ. वैशाली खाड्ये, श्री.मधुकर बच्चे, महापौर श्री. रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते श्री. प्रशांत शितोळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री. सदाशिव खाडे, श्री. राजेशअण्णा पिल्ले, माजी सरचिटणीस श्री. राजू दुर्गे, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजय पटनी, मंडल अध्यक्ष श्री. प्रमोद परदेशी, श्री. शिवराज लांडगे तसेच स्थानिक पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख आणि मोठ्या संख्येने सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Shatrughna Kate Amit Gorkhe-अमित गोरखे Amar Sable BJP Maharashtra

30/03/2026

पुणे जिल्ह्यात पर्यटनाला नवा बूस्ट!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (PMRDA) मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांसाठी तब्बल ६७ कोटींचा पर्यटन विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. PMRDA चे पदसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली PMR ची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत असून, आगामी काळात आणखी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम पर्यटन अधिक सोपे होणार आहे. पर्यटकांसाठी सुरक्षित व स्वच्छ सुविधा मिळणार आहे आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत.

पर्यटन आराखड्यामध्ये काय असणार खास?
1. खडकवासला धरण येथे सुसज्ज चौपाटी
2. मुळशी तलाव सुशोभीकरण व सुरक्षित पर्यटन सुविधा
3. लोणावळा येथे भव्य स्कायवॉक
4. गड-किल्ल्यांसाठी सुधारित रस्ते – राजमाची किल्ला, लोहगड किल्ला, तुंग किल्ला
5. धार्मिक स्थळांचा विकास व सुविधा
6. पर्यावरण रक्षणासाठी २७ गावांत STP प्रकल्प

पुणे-पिंपरी-चिंचवडकरांचा निरंतर विश्वास,
‘‘ग्रोथ हब’’ PMR चा आता शाश्वत विकास..!

Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Pune