17/07/2025
पशुसंवर्धन योजनेत निवड झालेल्या व स्वहिस्सा भरलेल्या लाभार्थ्यांना पशुधनाचे तात्काळ वाटप करा..
पशुधन वाटप न झाल्यास आंदोलनाचा DYFI चा इशारा.
Democratic Youth Federation of India / भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ
17/07/2025
पशुसंवर्धन योजनेत निवड झालेल्या व स्वहिस्सा भरलेल्या लाभार्थ्यांना पशुधनाचे तात्काळ वाटप करा..
पशुधन वाटप न झाल्यास आंदोलनाचा DYFI चा इशारा.
17/07/2025
न्युक्लिअस बजेट योजनांची मुदतवाढ करून लाभार्थ्यांची निष्पक्षपातीपणे निवड करा..
DYFI आंबेगाव तालुका समितीची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..
GawariAjit NawaleDipak Walkoli
11/07/2025
न्युक्लिअस बजेट योजनांची मुदतवाढ करून लाभार्थ्यांची निष्पक्षपातीपणे निवड करा..
DYFI आंबेगाव तालुका समितीची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..
घोडेगाव दि. ११/०७/२०२५ डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत सुरु असलेल्या न्युक्लिअस बजेट च्या योजनांचे फॉर्म भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत वाढ द्या, ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करा व या निष्पक्षपाती पने लाभार्थी निवड करा.. या मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी मा. देसाई यांना देण्यात आले..
आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव तर्फे दरवर्षी न्यूक्लियस बजेट म्हणजे केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनां साठी अर्थसहाय्य केले जाते. यापूर्वी ही योजना ऑफलाइन असल्याने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व लाचखोरी होत होती त्यावर उपाय म्हणून यावर्षी ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2025 ही आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांना ग्रामसभांचे ठराव व उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे अद्याप बऱ्याच गरजू लोकांनी या योजनांसाठी अर्ज केलेले नाहीत. तसेच ऑनलाईन अर्ज भरताना योजनांची नावे यादीत न दिसणे व आवश्यकता नसलेली कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असल्याने नागरिकांना अर्ज भरताना समस्या उद्भवत होत्या. त्याचबरोबर या योजनांची लाभार्थी निवड पारदर्शीपणे होणार की मागच्या सारखाच सावळा गोंधळ चालणार याबाबत डी वाय एफ आय च्या प्रतिनिधींनी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावर सकारात्मक चर्चा करत, "मुदत वाढीचा व तांत्रिक अडचणी दुर करण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे येथील अप्पर आयुक्त कार्यालयाकडे आजच सादर केला जाईल व न्युक्लिअस बजेट च्या शासन निर्णयानुसार पारदर्शक व निष्पक्षपातीपणे लाभार्थ्यांची निवड केली जाईल." असे मा. प्रकल्प अधिकारी श्री. प्रदिप देसाई व मा. सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सोनुल कोतवाल यांनी सांगितले.
यावेळी DYFI चे आंबेगाव तालुका सचिव अविनाश गवारी, सहसचिव किरण दगडे, उपाध्यक्ष रोहिदास गभाले आदी उपस्थित होते.
07/06/2025
★ डेमोक्रॅटिक युथ फॅशन ऑफ इंडिया DYFI
पहिले DYFI आंबेगाव तालुका अधिवेशन..
रविवार दिनांक ०८/०६/२०२५
ठिकाण : त्रिमूर्ती भवन जुन्नर फाटा, घोडेगाव ता.आंबेगाव जि. पुणे.
युवा एकता जिंदाबाद..!!
सर्वांना शिक्षण, सर्वांना काम..!!!
जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे...
28/09/2024
शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी क्रांतिकारी अभिवादन..🌹
12/08/2024
हिरडा नुकसानभरपाई च्या ऐतिहासिक विजयी लढ्या नंतर..
जुन्या आंबेगाव मधील कातकरी वस्तीची कोणत्याच ग्रामपंचायत ला नोंद नसल्याने सदर वस्तीला नदीक च्या बोरघर ग्रामपंचायत ला जोडण्यासाठी पुणे जिल्हा परिषदे समोर आंदोलन सुरु..
यापूर्वीही सलग ४ दिवस उपोषण करून याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला होता मात्र त्यावर काहीच निर्णय न झाल्याने पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे..
शासनाने गरीब आदिवासी जनतेचा अंत पाहू नये तातडीने याबाबत निर्णय घ्यावा..
किसान सभा
Ajit Nawale Amol Popat Waghmare Avinash Gawari Dipak Walkoli कॉम्रेड.राजु घोडे Ashok Pekari Dr.Amol Kolhe Devdatta Nikam
15/07/2024
अखिल भारतीय किसान सभेच्या लढाऊ कार्यकर्त्यांनी सलग ४ वर्षे अहोरात्र प्रामाणिक मेहनत व चिवट लढा करून जुन्नर आंबेगाव व खेड मध्ये १५ कोटी रुपयांची यापूर्वी कधीही न मिळालेली हिरडा नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे..
मा. तहसीलदार यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ekyc करण्यासाठी महा ई सेवा केंद्रे गावनिहाय नेमून दिलेली असून सर्व शेतकऱ्यांची #मोफत करून देण्याच्या केंद्र चालकांना सुचना दिलेल्या आहेत..
सर्व शेतकऱ्यांनी आपापली EKYC आपल्या गावाला नेमून दिलेल्या सुविधा केंद्रातून करून घ्यावी यासाठी कोणतीही फी देऊ नये..
कुणी पैशांची मागणी केल्यास किसान सभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा..
अखिल भारतीय किसान सभा, पुणे जिल्हा समिती.
Ajit Nawale Dr.Amol Kolhe Amol Popat Waghmare Dipak Walkoli Avinash Gawari Ajit Abhyankar
21/05/2024
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 🌹
10/05/2024
INDIA व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माकप च्या कार्यकर्त्यांनी गावोगावी घरोघरी जाऊन पत्रके वाटून कोपरा सभा घेतल्या..
आघाडीला विजयी करा.
Dr.Amol Kolhe Amol Popat Waghmare Avinash Gawari Ajit Nawale Dipak Walkoli
10/05/2024
07/05/2024
डॉ. अमोल कोल्हे यांना Dyfi चा जाहीर पाठींबा..
Dr.Amol Kolhe Avinash Gawari Dipak Walkoli Amol Popat Waghmare
07/05/2024
लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा..
Dr.Amol Kolhe Avinash Gawari Dipak Walkoli Amol Popat Waghmare