Nationalist Congress Party Malad Taluka Social justice Department

Nationalist Congress Party Malad Taluka Social justice Department

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nationalist Congress Party Malad Taluka Social justice Department, Political Party, Pune.

Photos from Nationalist Congress Party Malad Taluka Social justice Department's post 22/06/2017

पुण्यातील कोंढवा येथे 'हज हाऊस' करण्यासाठी प्रयत्न करू : Sharad Pawar

'पुण्यात हज हाऊस करण्यासाठी प्रयत्न करू', असे आश्वासन आज शरद पवार यांनी कोंढवा येथील कौसरबाग येथे रोझा इफ्तार’ च्या आयोजित कार्यक्रमात दिले.
मुंबईयेथे हज हाऊस व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते . त्याप्रमाणे मुबंईत हज हाऊस झाले .सध्या सत्तेत दुसरे असले तरी त्यांच्याकडे आम्ही शिफारस करू . आणि पुण्यात हज हाऊस होण्यासाठी प्रयत्न करू .

मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणार्‍या रमझान निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यातर्फे आणि त्यांच्या उपस्थितीत ‘रोझा इफ्तार’ चे आज आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन तुपे यांनी केले. सूत्र संचालन इक्बाल शेख यांनी केले . आभार नंदा लोणकर यांनी मानले .

शिक्षण तज्ज्ञ पी . ए . इनामदार म्हणाले ,'सर्व धर्मीय सण एकत्रित साजरे करणे ,सलोखा वाढीस लावणे तसेच पुणे हे शांतताप्रिय ,सर्वांना बरोबर घेवून प्रगती करणारे शहर आहे’ पुण्यातील सर्वधर्मीय सलोख्याचे वातावरण राखणे, मुस्लिम धर्मिय बांधवांच्या सणात सहभागी होणे हा या उपक्रमाचा उद्देश स्वागतार्ह आहे'.

मौलाना अयुब अशरफी , मौलाना निजामुद्दीन ,मौलाना कारी ईसीद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .

यावेळी अजित पवार , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , धनंजय मुंडे , खासदार वंदना चव्हाण , पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे , पुणे शहर अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इक्बाल शेख , माजी महापौर प्रशांत जगताप , राजलक्ष्मी भोसले , चंचला कोद्रे , वैशाली बनकर , दत्ता धनकवडे , प्रवक्ता अंकुश काकडे ,रूपाली चाकणकर,आजी माजी नगरसेवक , कोंढवा येथील स्थानिक नगरसेवक ऍड. हाजी गफूर पठाण , हमीद सुडके , परवीन शेख , अनीस सुडके , रईस सुंडके , हाजी फिरोज, नारायण लोणकर , संजय लोणकर ,राहुल लोणकर , फहीम शेख , मोहिदीन खान, मुस्लिम बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
*आशिष पाटील*
*मालाड तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग*

Photos from Nationalist Congress Party Malad Taluka Social justice Department's post 11/06/2017

*शेतकर्‍यांसाठी ना.धनंजय मुंडे रस्त्यावर;येवल्यातील आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या घेतल्या भेटी*

*सरकार शेतकर्‍यांविरूध्द हिटलरा सारखे वागत आहे-ना.धनंजय मुंडे*

नाशिक दि.10............ कर्जमाफीसह आपल्या न्यायहक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांवर अमानुष लाठीमार गंभीर गुन्हे दाखल करून भाजपा सरकार हिटलरासारखे वागत आहे. आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी करतानाच शेतकर्‍यांना न्याय मिळवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

संपुर्ण राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपा दरम्यान आंदोलन करणार्‍या येवला तालुक्यातील शेतकर्‍यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, खोटी गुन्हे दाखल केले, दहशद निर्माण केली. त्यामुळे प्रचंड दबावाखाली असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांनी आज येवला तालुक्याचा दौरा केला. उंदीरवाडी व पंचक्रोशीतील शेतकर्‍यांशी संवाद साधला या आंदोलनात सहभागी झालेल्या व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या पिंप्रीच्या नवनाथ भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत आ.पंकज भुजबख, आ.जयवंत जाधव, नानासाहेब महाले व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे, अमानुष लाठीमार करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची व घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकर्‍यांनो तुम्ही घाबरू नका तुम्हाला न्याय मिळवुन दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाही, खोटे गुन्हे मागे घेण्यास सरकारला भाग पाडु असे त्यांनी शेतकर्‍यांशी बोलतांना सांगितले.

येवला येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकार कर्जमाफीसाठी अभ्यास गट, मंत्री गट स्थापन करून वेळकाडुपणा करत आहे. त्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही असा आरोप केला. शेतकरी संपाबाबत विरोधकांशी चर्चा करणार नाही या भुमिकेचा समाचार घेताना आम्ही विरोधक म्हणजे काय पाकिस्तानातील आहोत का ? असा सवाल करतानाच गेल्या निवडणुकीत विरोधकांना 37 टक्के मते मिळाली होती आणि भाजपाला 26 टक्के मते मिळाली होती हे लक्षात ठेवावे असे ही त्यांनी सुनावले.

उत्पादनावर खर्च अधिक 50 टक्के हमीभाव देऊ असे सांगुन मते घेणार्‍या मोदी सरकारने सुप्रिम कोर्टात मात्र असा हमीभाव देता येणार नाही असे सांगुन शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. फ क्त व्यापार्‍यांना एल.बी.टी माफी दिली त्यापोटी विविध कर लावुन शेतकरी आणि मध्यमवर्गीय यांच्या खिशातुन वर्षाला दहा हजार कोटी रूपये काढले जात असल्याचेही ते म्हणाले.

*शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकुन ना.मुंडे व्यथित*

आंदोलना दरम्यान पोलिसांनी किती अमानुषपणे मारहाण केली याचे वळ शेतकर्‍यांनी दाखवताच ना.मुंडे हे ही व्यथित झाले. काही महिलांना आपल्या भावना व्यक्त करतांना आश्रु अवरता आले नाहीत.
----------------------
*आशिष पाटील*
*मालाड तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग*

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune