लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आज त्यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून त्यांचे स्मरण केले. त्यांचा 'न्याय' आणि 'विकास' हीच आपली प्रेरणा आहे."
Bhausaheb Bhoir
विरोधी पक्षनेता तथा नगरसेवक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Corporator: PCMC
Leader of opposition PCMC Corporation
President: A.B.M.
Natya Parishad, Pimpari - Chinchwad
Vice-President: A.B.M. Natya Parishad, Mumbai
Ex-Member: DPDC, Pune
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समस्यांच्या निवारणासाठी एक खंबीर नेतृत्व आवश्यक आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक - ७ जून.
नव्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि कलाकारांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी **'समर्थ पॅनेल'**च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करूया. आपला एक एक मत चित्रपटसृष्टीच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरेल!
🙏 चला, एकत्र येऊया आणि समर्थ पॅनेलला निवडून आणूया!
31/05/2026
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
एक कुशल योद्धा, रणरागिणी, न्यायप्रिय शासक म्हणून राजमाता अहिल्याबाई सर्वश्रुत आहेत. स्त्रीचे सृजनात्मक दर्शन आणि स्त्रीशक्ती या दोन्हींचा उत्तम मिलाफ त्यांचा जीवनचरित्रात आढळून येतो. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन !!
#अहिल्यादेवीहोळकर
30/05/2026
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजले असून, त्यानिमित्ताने आज चित्रपट महामंडळाच्या सन्माननीय सदस्यांची महत्त्वाची बैठक आणि पत्रकार परिषद उत्साहात संपन्न झाली.
मराठी चित्रपटसृष्टीचा वारसा समृद्ध करणे, कलाकारांचे हित जपणे आणि महामंडळाच्या माध्यमातून नव्या ध्येय-धोरणांची आखणी करणे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले, तसेच श्री. अजित शिरोळे, श्री. राज काझी, श्री. सुनील महाजन या मान्यवरांसह पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व सन्माननीय सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗳️ मतदान प्रक्रिया: रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी पार पडणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सभासदांच्या हक्कासाठी हा लढा आपण सर्वांच्या साथीने नक्कीच यशस्वी करू, हा विश्वास या बैठकीच्या माध्यमातून अधिक दृढ झाला. उपस्थित सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि व्यावसायिक बांधवांचे मनःपूर्वक आभार!
29/05/2026
साहित्य आणि कलेच्या समृद्ध परंपरा जपणारे पिंपरी-चिंचवड शहर हे खऱ्या अर्थाने साहित्यिकांचे माहेरघर आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने काल आयोजित करण्यात आलेल्या 'मासिक काव्यधारा' या उपक्रमाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला, याचा विशेष आनंद वाटतो.
शब्दांच्या माध्यमातून भावनांना वाट करून देणारा हा उपक्रम साहित्यिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले मा. संजय खानोलकर,उद्योजक मा.सुरेश गोयल, राजेश अग्रवाल, साहित्य परिषदेचे मा.राजन लाखेजी, श्रीमती रजनी सेठ, संजय जगताप तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मान्यवर कवी आणि साहित्यिक मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत साहित्यविषयक संवाद साधता आला.
मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन होणे काळाची गरज आहे. साहित्याची ही धारा अशीच अविरत वाहत राहो आणि नवनवीन लेखकांना, कवींना प्रोत्साहन मिळत राहो, हीच सदिच्छा!
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिक मंडळींचे आणि रसिकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
#महाराष्ट्रसाहित्यपरिषद #मासिककाव्यधारा #पिंपरीचिंचवड #साहित्यसंस्कृती #मराठीसाहित्य #काव्यसंमेलन #साहित्यिकसंवाद
29/05/2026
चिंचवडे नगर येथे आज श्री. कासीम बागवान आणि श्रीमती झरीन कासीम बागवान यांच्या 'आयुष्यम वेलनेस सेंटर'चे उद्घाटन करताना विशेष आनंद झाला.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आणि या उद्देशाने सुरू केलेले हे नवीन केंद्र परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. याप्रसंगी नगरसेवक शेखर अण्णा चिंचवडे, स्थानिक नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. कासीम बागवान हे माझे होतकरू सहकारी असून
त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात सुरू केलेला हा नवीन उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी एक मोठी भेट ठरेल. श्री. कासिम बागवान आणि झरीन बागवान यांना त्यांच्या या नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!.
29/05/2026
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी येथे विषारी दारू सेवनामुळे १७ निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू ही घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि काळजाला पीळ घालणारी आहे. या भीषण दुर्घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.
आज मी प्रत्यक्ष दापोडी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक राजू बनसोडे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वच स्तरातून या घटनेबद्दल मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
या प्रकरणातील दोषींवर केवळ नाममात्र कारवाई करून चालणार नाही, तर त्यांच्यावर 'सदोष मनुष्यवधा'चा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शासन झालेच पाहिजे. शहरात फोफावलेले अवैध दारूचे अड्डे आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता ठोस मोहीम हाती घेणे काळाची गरज आहे.
पिंपरी-चिंचवड शहर सुरक्षित आणि व्यसनमुक्त करण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने समन्वयाने कडक पावले उचलावीत, हीच माझी मागणी आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! तसेच, जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
27/05/2026
27/05/2026
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनियां ॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबरा।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥
कमला एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा! ✨🌸
विठुरायाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. 🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411033
