या पेज वरून तिकीट बुक करता येईल
https://nisargshala.in/rajgad-helicopter-ride-majestic-forts-from-the-sky-near-pune-mumbai/
Mulshi
Mulshi is a block(Tehsil) named after Mulshi village.
Mulshi is also well known for 'Mulshi Dam' , a monsoon wet destination... Mula river greens the land in this block.. Hi all,
This page is about everything in Mulshi... Nature,places,education,employment,history,social activities,adventure activities and everything else that needs people's attention for positive change in the lives of people of Mulshi and people come to see places in Mulshi....
मुळशी धरणातून २५००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे . सर्वांनी दक्षता घ्यावी-
सुरेंद्र नवले उपविभागीय अधिकारी मावळ व मुळशी
30/07/2024
रक्तबंबाळ सह्याद्री
परवा मुळशीतील कोंढुर या गावातुन येताना रक्तबंबाळ केलेला सह्याद्री दिसला. खुप वाईट वाटलं. होय सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत प्लॉटिंग स्किम, रीसॉर्ट बनवण्यासाठी हे पाप माणुस करतोय. हे नुसतं पाप नाहीये तर बेकायदेशीर देखील आहे. मागील पंचवार्षिक ला याच गावातील नागरीक तालुक्याचे सभापती होते. या गावाची ही अवस्था तर विचार करा अन्यत्र काय स्थिती असेल. तलाठ्याच्या हाताखालील कारकुन पासुन तलाठी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कुणालाच कसं दिसत नाहिये हे ?
या संदर्भात मी एक दोन वार्ताहरांशी देखील संपर्क साधला, पण या अपराधाला वाचा फोडण्यास मीडीया देखील असमर्थ आहे हे देखील दुर्दैव.
जोवर भुमिपुत्र जागे होत नाहीत तोवर हे थांबणार नाही. जागा विकल्याच्या अर्थ असा घेता कामा नये की आपला संबंध संपला, आपला संबंध ह्या दोंगर द-यांशी अनेक पिढ्यांचा आहे. हे डोंगर आपला आधार होते, अजुनही आहेत.
या डोंगरांची, सह्याद्रीची अशी दुर्दशा होऊ देऊ नका. थांबवा हे.
🛑 मुळशी धरण 🛑
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजता ७० टक्के क्षमतेने भरले असून आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नदी पात्रात ,पाऊस चालू/वाढत राहिल्यास अथवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
बसवराज मुन्नोळी
हेड-डॅम्स, इस्टेट ॲंड ॲडव्होकसी
टाटा पॉवर, मुळशी
20/03/2024
खगोल आणि निसर्ग पर्यटन कार्यशाळा
तुमच्या फार्म हाऊस, फार्म स्टे, रीसॉर्ट , कृषि पर्यटन केंद्रात तुम्ही देखील सुरु करा खगोल पर्यटन म्हणजेच आकाशदर्शन कार्यक्रम. इको टुरीझम केंद्र कसे चालवावे, खगोल पर्यटनातील पायाभुत ज्ञान आणि प्रशिक्षण, आलेल्या पर्यटकांशी संवाद कसा साधायचा, आहे त्या कमीतकमी संसाधनातुन उत्तम पर्यटनाचा अनुभव कसा द्यायचा, आपला सभोवताल व त्यातील वैशिष्ट्ये यांचा प्रभावी वापर पर्यटनासाठी कसा करायचा अश्या अनेक बाबतीत प्रत्यक्ष मार्गदर्शन या कार्यशाळेत सर्वांना मिळेल.
निसर्गपर्यटन केंद्रे आपल्या उत्पन्नाची साधने झाली पाहिजेत सोबतच ती पर्यटकांसाठी प्रबोधनाची, साहसाची, नवनवीन माहितीची, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलण्याची केंद्रे देखील व्हावीत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनातील रोल मॉडेल बनावीत आणि श्वाश्वत उत्पन्नासोबत श्वाश्वत जीवनाची केंद्रे व्हावीत यासाठी ही कार्यशाळा.
तुर्त ही कार्यशाळा मराठीमध्ये असेल.
स्थळ - निसर्गशाळा
दिनांक ३ मे ते ५ मे २०२४
तीन दिवस, दोन रात्री.
प्रशिक्षण शुल्क - ४६०० रुपये फक्त (Food & Stay included in the cost)
नावनोंदणी साठी 9049002053 या गुगल पे वर नावासहीत शुल्क जमा करुन याच नंबर ला स्क्रीनशॉट पाठवा.
29/02/2024
हुप्प्या (वयोगट - ८ ते १४ वर्षे) निसर्गशिबिरासाठी नावनोंदणी सुरु
हुप्प्या म्हणजे निखळ आनंद,
हुप्प्या म्हणजे भटकंती,
हुप्प्या म्हणजे निसर्गात बागडणे,
हुप्प्या म्हणजे नुसती धमाल,
हुप्प्या म्हणजे निसर्ग समजुन घेणे,
हुप्प्या म्हणजे निसर्गाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणे,
हुप्प्या म्हणजे धाडस करणे,
हुप्प्या म्हणजे भीती वर मात करणे ,
हुप्प्या म्हणजे दगड-धोंड्यांशी दोस्ती करणे,
हुप्प्या म्हणजे अफाट विस्तीर्ण विश्वाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणे,
हुप्प्या म्हणजे खोल अंतर्मनाला साद घालणे,
हुप्प्या म्हणजे आनंदी आनंद,
हुप्प्या म्हणजे खरतर खुपकाही आहे की जे शब्दात सांगताच येत नाही..
असा आपला हुप्प्या कॅम्प, या हंगामातील पहिला कॅंप २९ मार्च ते ३१ मार्च असा होणार आहे.
तुम्ही अजुन नावनोंदणी केली नसेल तुमच्या मुला मुलींसाठी तर त्वरा करा 🙏
अधिक माहितीसाठी 090490 02053 या नंबर वर संपर्क साधा
31/10/2023
हे तुम्हाला माहिती आहे का?
शिवाजी महाराजांनी मावळ प्रदेशाचा आधार घेत स्वराज्य स्थापिले. आपण सहज मावळ , मावळे असे शब्द बोलुन जातो. पण मावळ हा शब्द म्हणजे नक्की काय, याला काही अर्थ आहे का हे समजुन घ्या या छोट्याशा व्हिडीयो मधुन.
व्हिडीयो पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..
मावळ । महावलयेश्वर । महाबळेश्वर । गोकर्ण । कोकण । Western Ghats | Sahyadri | Nisargshala हे तुम्हाला माहिती आहे का?शिवाजी महाराजांनी मावळ प्रदेशाचा आधार घेत स्वराज्य स्थापिले. आपण सहज मावळ , मावळे असे शब...
देवराई म्हणजे काय?
आपली जंगले, वृक्षवल्ली, सजीवसृष्टी आणि भारतीय जनमानस, अगदी प्राचीनतम काळापासुन; या दोहोंच सौहार्द आहे. आपण अनादी काळापासुन प्रकृतीकडे माता म्हणुन पाहतो आहोत. म्हणजेच आपण या मातेची संतती आहोत. आणि म्हणुनच प्राचीन भारतीय खुप मोठ्या प्रमाणात निसर्ग, पर्यावरण संसक्षण आणि संवर्धनाचे काम केले आहे. याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे देवराई.
हुप्प्या निसर्गशिबिरातील (वयोगट ८ ते १४ वर्षे) मुला-मुलींसोबत मारलेल्या देवराई विषयीच्या या गप्पा तुम्हाला देखील नक्कीच आवडतील.
पुर्ण व्हिडीयो ची लिंक पहिल्या कमेंट मध्ये आहे.
12/10/2023
कॉसमॉसचा कहर
सध्या पुणे-मुंबई व इतरही अनेक शहरांच्या अवतीभोवती कोणत्याही दिशेला गाडी प्रवास करताना आपणास फुलांचे ताटवे रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. खुपच सुंदर दिसतात ही फुले. या फुलांची वनस्पती साधारण चार ते दहा फुटांपर्यंत वाढु शकते. एका झाडास दोन तीन डझनापेक्षा जास्त फुले येतात. हा फुलोरा इतका दाट असतो की रस्त्याच्या दुतर्फा केसरी,पिवळी चादरच अंथरली आहे असे वाटते.
पण..
काय आपणास हे माहित आहे का की ही वनस्पती पश्चिम घाटातील पर्यायाने देशी देखील नाहीये. साधारण वीसेक वर्षांपुर्वी अशी फुले दिसत नव्हती. सह्याद्रीची म्हणुन जी काही फुले आहेत त्यामध्ये यांचा समावेश नव्हता. आपल्या पर्यावरणात मिसळुन जाईल अशी देखील ही फुले व फुलाझाडे नाहीत. या फुलांचा रंग सोडला तर आणखी काहीही कौतुक करण्यासारखे नाही. तण वाढावे तशी ही वनस्पती पसरत चालली आहे. आणि हिचा पसरण्याचा वेग व तग धरुन राहण्याची क्षमता कमालीची जास्त आहे. सुगंध नाही तसेच गाई-गुरांना चारा म्हणुनही यांचा वापर होऊ शकत नाही. याउलट गाई गुरे खातील असे गवत वा अन्य वनस्पतींना वाढण्यास जागाच राहत नाही या फुलझाडांमुळे. बरं, ही फुले तोडुन यांचा हार करावा, पुजा-प्रार्थनेमध्ये वापरावी म्हंटले तरी ही फुले तशी नाहीत. तोडली की लागलीच कोमेजुन जातात. मधमाश्या, फुलपाखरे अथवा भुंगे या फुलांकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. पर्यावरणास कोणत्याही पध्दतीने पुरक नसलेल्या या वनस्पतीला कॉसमॉस म्हणतात. याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबत होतो. विशेषतः गाडीवेगाने जाताना, गाडीमागे जो वा-याचा आवेग असतो त्यामुळे ही जास्त पसरली जाते. नशीब चांगले म्हणुन अद्याप सह्याद्रीच्या मावळ पट्ट्यात, कोकणात ही जास्त पसरली नाहीये. पण जर का एकदा हिचा प्रसार डोंगर द-यांमध्ये झाला तर तर स्थानिक, मुळच्या इथल्या असलेल्या वनस्पतीस तसेच जैवविविधतेस प्रचंड धोका भविष्यात संभवतो.
एकेकाळी कॉन्ग्रेस (गाजरगवत) नावाची एक वनस्पती आपल्याकडे खुपच फोफावली, इतकी की अन्य पिकांवर देखील तिचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. हि कॉन्ग्रेस देखील भारतीय नव्हती. कधीकाळी अमेरिकेतुन आलेल्या गव्हासोबत याचे बीज आले व या गाजरगवताने ने थयथयाट केला होता. कालांतराने धोका जानवु लागल्यावर याचा बिमोड करण्यात आपल्याला यश आले खरे.
पण कॉसमॉस च्या बाबतीत असा बिमोड करणे अजुनही अवघड होईल कारण याच्या बीजांचा प्रसार वा-यासोबात कुठेही होत असतो. पडीक जमिनी, डोंगर उतार, द-या खो-या इत्यादी ठिकाणी जर यांचा प्रसार झाला तर कोण बिमोड करु शकेल याचा? खुप अवघड होणार आहे हे प्रकरण पर्यावरणासाठी. त्यामुळे आत्ताच सावध होऊन, ज्या ठिकाणी अजुन प्रसार फारसा झालेला नाही, त्या ठिकाणी त्यांना मुळासकट उपटुन टाकणे सोपे आहे. सह्याद्रीच्या गावागावात ही माहिती पोहोचवली पाहीजे. कृषिखाते, वनखाते यांनी याबाबतीत जनजागरण व लोकसहभाग द्वारे यावर काम सुरु करण्याची वेळ आत्ताच आलेली आहे. फुलोरा येण्यापुर्वीच जर हे उपटले तर बिमोड करणे शक्य होईल.
https://www.facebook.com/100001148870145/videos/3388671327847796/
हेमंत ववले,
निसर्गशाळा
सहयाद्रीचा अमुल्य ठेवा, जांभळ सोनं म्हणजे कारवी
दर सात वर्षांनी कारवीला फुले येतात. रानोमाळं, डोंगर उतार कारवी ने जांभळे दिसतात. फुले आल्यावर मग बीज येतात आणि मग ही कारवीची झाडें मरतात. हो योग्य वातावरण आणि मानवी हस्तक्षेप नसेल तर कारवीची चक्क झाडेच होतात, दहा पंधरा फुट उंच सहज वाढतात. सहयाद्री जो टिकून आहे त्यात कारवीचे योगदान सर्वात जास्त आहे.
कारवी विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी पहा हा व्हिडीयो.
23/01/2023
आपल्या समाजातील किर्तनकार, प्रवचनकार, साधु संतांनी आता हे समाजाला पृथ्वी पापापासून परावृत्त केलं पाहीजे. मातीच्या सर्वात वरच्या थरातच जीवन धारण करण्याची सर्वाधिक क्षमता आहे. एक चिमूटभर मातीत करोडो सूक्ष्म जीवाणु असतात की जे जमिनीस पिकाऊ बनवतात. ते नसतील तर ती माती म्हणजे मृत माती होय. जेव्हा जेसीबीं सारख राक्षसी यंत्र धरती मातेची छातीवर चालते व तिला जखमी करते तेव्हा हे सूक्ष्म जीव, खुल्या झालेल्या, मोकळ्या झालेल्या मातीसोबत वाहून जातात. भुसखलन सारख्या आपत्तीना सुरुवात येथूनचं होत असते. काही वर्षांनी धरणे पाण्याने नाही तर माटीनेच भरून जातील. शेती करण्यासाठी पोषक माती वाहून गेलेली असेल. जी असेल त्यात आपण कर्करोगाचीचं शेती करू शकू. एकुणच काय तर माती वाचवण्याविषयी प्रबोधन होणे गरजेचं आहे. शाळांमधून ते होईल न होईल पण समाज अजूनही ज्यांचं ऐकतो अश्या वारकरी परंपरेने हा विषय हाती घेतला तर खुप परिणाम होईल चांगला.
जमीन खरेदीविक्री करणारे व्यापारी अनावधानाने खुप मोठ पाप करीत असतात. सपाटीकरणाने होणाऱ्या या पापातुन मुक्ती नाही. हे पाप त्यांच्या पुढच्या सात पिढ्याना फेडावे लागणार आहे. कारण पृथ्वी आपली आराध्य आहे, दैवत आहे.
मित्रानो, खालील पोस्टर डाउनलोड करून स्टेट्स ला ठेवा, हा संदेश फॉरवर्ड करा. हा मेसेज 21 ग्रुप वर फॉरवर्ड केल्याने 100 टक्के पुण्य मिळेल याची खात्री बाळगा.
रामकृष्ण हरी 🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
412111
