31/05/2026
प्रजेच्या रक्षणासाठी सतत तत्पर असलेल्या अहिल्याबाई अत्यंत न्यायप्रिय होत्या. उचित न्यायदानासाठी त्यांना ओळखले जात होते. तसेच दानशूरता, उदारता, दया, करुण, सामान्य कर्तृत्व, उत्तम शासक, प्रजापालक, वीरांगनाआणि परोपकार हे त्यांचे अजून काही खास गुण. अशा महान राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
#राजमाता #अहिल्याबाईहोळकर
#अहिल्याबाईहोळकरजयंती
28/05/2026
आदरणीय अजितदादा,
आज तुम्हाला जाऊन चार महिने झाले… पण तुमच्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.
तुमचं नेतृत्व, तुमचं मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम कायम स्मरणात राहील.तुम्ही आमच्यात नसाल, पण तुमचे विचार आणि कार्य आजही आम्हाला प्रेरणा देत आहेत.
तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते.
It has been four months since you left us, but your memories are still fresh in our hearts.
Your leadership, guidance, and love for everyone will always be remembered. Even though you are not with us today, your thoughts and work continue to inspire us.
28/05/2026
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रखर क्रांतीसूर्य, अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा हसतमुखाने भोगणारे थोर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#स्वातंत्र्यवीरसावरकर
#वीरसावरकर
27/05/2026
देशाच्या राजकीय व आर्थिक जडणघडणीला दिशा देणारे पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन...
Nehru
27/05/2026
मुस्लिम बांधवांसाठी शांती आणि त्यागाचं प्रतीक असलेला पवित्र सण ईद- अल-अजहा म्हणजेच बकरी ईद ! सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
#बकरीईद #मुस्लिम
26/05/2026
जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, विकासदृष्टी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
13/05/2026
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती ! त्यांनी आपल्या धाडस, धैर्य, शौर्य, चातुर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.
छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा!
10/05/2026
जगातील प्रत्येक नात्यापेक्षा निरपेक्ष आणि पवित्र नातं म्हणजे आई. तिचे प्रेम, तिचा त्याग आणि तिचे संस्कार आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात. संकटात धीर देणारी, यशात आनंदाने डोळे भरून येणारी आणि प्रत्येक क्षणी आपल्या मुलांसाठी निःस्वार्थपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे आई. तिच्या मायेची ऊब आणि तिच्या आशीर्वादाची ताकद शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
आई ही फक्त एक व्यक्ती नसून, ती आपल्या आयुष्याची पहिली गुरू, प्रेरणा आणि शक्ती असते. तिच्या कष्टांची आणि प्रेमाची परतफेड कधीच होऊ शकत नाही, पण तिचा सन्मान, आदर आणि प्रेम जपणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
मातृदिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
#मातृदिन #आईसाहेब❤🌍😘
08/05/2026
🎉 दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
तुमच्या अथक मेहनतीला, जिद्दीला आणि आत्मविश्वासाला आज यशाची सुंदर किनार लाभली आहे.
हा निकाल म्हणजे केवळ गुणांचा टप्पा नसून, उज्ज्वल भविष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात आहे. ✨
सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#दहावी_निकाल #हार्दिकअभिनंदन
05/05/2026
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, यावर्षी ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे.
प्रत्येक नागरिकाने Self Enumeration द्वारे अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया देशाच्या विकास व धोरणनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
👉 आजच नोंदणी करा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपला सहभाग नोंदवा
#जनगणना२०२७