BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली

BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली

Share

.

सांगली भाजपा महिला मोर्चा - एक प्रभावी, ऊर्जावान आणि उद्यमशील टीम!"

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 11/06/2025

🌿 वटपौर्णिमेनिमित्त भाजप महिला मोर्चाचा अनोखा उपक्रम 🌿

आज वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भाजप महिला मोर्चाच्या वतीने विश्रामबाग येथील महावीर गार्डनमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. वटसावित्रीच्या व्रतानिमित्त उपवास करून, पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी एकत्र येत वडाचे पूजन केले.

हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहेच, पण या सणामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे. याच विचारातून, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. गीतांजली ढोपे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि ईशाताई साठे यांच्या सहकार्याने ५१ महिलांना तुळशीचे रोप देऊन औटी समारंभ पार पडला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन, आणि तुळशीसारख्या औषधी वनस्पतींचे आरोग्यदायी महत्त्व याची जाणीव निर्माण करणे हाच होता.

कार्यक्रमावेळी भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया संयोजिका सौ. सुष्मिता कुलकर्णी व ज्योचीताई माने यांचीही उपस्थिती लाभली.

या उत्साही आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी उपस्थित महिलांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली.

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 11/06/2025

💐 आरोग्य महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐

आदरणीय आमदार अमर दादा पडळकर आणि वैशालीताई अमरदादा पडळकर यांच्या आरोग्य महोत्सवी (25) लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

या प्रसंगी मी भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष सौ. गीतांजली ढोपे पाटील, सोशल मीडिया संयोजिका सौ. सुस्मिता कुलकर्णी, पूर्व मंडळ सरचिटणीस सौ. ज्योतीताई माने, भाजपा सिने कलाकार कामगार प्रदेश सचिव श्री. विजय शेटके, आणि आमची लाडकी छोटी अनीनी या सर्वांनी मिळून आदरणीय दादा व ताईंना मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला.

अमर दादा व वैशालीताई यांचे एकमेकांवरचे प्रेम, विश्वास व सहकार्य हे नवदांपत्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे.

🌷 त्यांच्या सहजीवनास असेच आरोग्य, सौख्य व उत्तम साथ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🌷


Chitra Wagh Dhananjay Hari Gadgil Devendra Fadnavis Gitanjalee Dhope-Patil Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP) Sudhir Mungantiwar Suresh Khade Chandrakant Patil Vanathi Srinivasan Murlidhar Mohol Mahila Morcha BJP Swati Shinde Susmita Kulkarni Rahul Dhope Patil Ravindra Chavan

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 11/06/2025
Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 09/06/2025

🌟 व्यावसायिक महिलांसाठी ऐतिहासिक पाऊल! 🌟

भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष नेहा दातार यांच्या संकल्पनेतून सांगली येथे प्रथमच आयोजित "सर्व मंगल ग्रुप" तर्फे भव्य व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आरमोल हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात १०,००० स्क्वेअर फूट जागेत ८० पेक्षा अधिक स्टॉल्स सहभागी झाले होते.


🍲 खवय्यांसाठी चविष्ट खाद्यपदार्थ
👗 फॅशनप्रेमींकरिता खास वस्त्रप्रदर्शने
💍 दागिने, गृहसजावट, हस्तकला वस्तू आणि बरेच काही...

या प्रदर्शनाला १०,०००+ लोकांनी भेट दिली, हे यश निश्चितच उल्लेखनीय आहे.

🌸 भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील,
🌸 ज्येष्ठ नेत्या नेताताई केळकर,
🌸 सोशल मीडिया संयोजिका सुष्मिता कुलकर्णी,
🌸 उपाध्यक्ष अस्मिता ताई भाटे,
🌸 पूर्व मंडळ सरचिटणीस ज्योतीताई माने
.. यांनी विशेष उपस्थिती दर्शवून आयोजक नेहा दातार यांना शुभेच्छा दिल्या व पुढील आयोजनास प्रोत्साहन दिले.

💐 या उपक्रमातून महिलांच्या व्यवसायिक आत्मनिर्भरतेला नवी दिशा मिळाली आहे.

Chitra Wagh BJP Maharashtra Social Media Dhananjay Hari Gadgil Devendra Fadnavis Gitanjalee Dhope-Patil Swati Shinde Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP) Mahila Morcha BJP BJP Mahila Morcha Maharashtra Murlidhar Mohol Sudhir Mungantiwar BJP INDIA Suresh Khade Chandrakant Patil Vanathi Srinivasan Adv. Swati Shinde - ॲड. स्वाती शिंदे BJP INDIA BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली Rahul Dhope Patil Adv Swati Shinde

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 02/06/2025

राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त महिलांसाठी सामाजिक सन्मानाचा उपक्रम!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने एक आगळा-वेगळा आणि समाजमनाला स्पर्श करणारा उपक्रम राबविण्यात आला.

त्याकाळी अहिल्याबाईंनी हुंडाबंदी, सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांच्या या विचारांची साक्षात प्रचिती देणारा विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू व सन्मान सोहळा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेविका उर्मिला ताई बेलवलकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात विधवा महिलांना हळदी-कुंकवाने सन्मानित करून त्यांच्या ओटी भरण्यात आली. त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच या उपक्रमामागचा उद्देश होता.

सोबतच, महिला शिक्षकांचाही सन्मान करून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.

या वेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅड. स्वातीताई शिंदे, जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, सुस्मिता कुलकर्णी, स्मिता भाटकर, शोभा राजमाने, रेखा पवार, विदुला साठे, रेखा सरनोबत, सुलभा जोशी, रजनी गोखले, सुनिता पाटणकर यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

या उपक्रमाने समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मानाची जाणीव करून दिली, आणि राजमाता अहिल्यादेवींच्या विचारांना खरी आदरांजली वाहिली.
Chitra Wagh BJP Maharashtra Social Media Dhananjay Hari Gadgil Devendra Fadnavis Gitanjalee Dhope-Patil Swati Shinde Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP) Mahila Morcha BJP BJP Mahila Morcha Maharashtra Murlidhar Mohol Sudhir Mungantiwar BJP INDIA Chandrakant Patil Suresh Khade Vanathi Srinivasan Adv. Swati Shinde - ॲड. स्वाती शिंदे BJP INDIA Rahul Dhope Patil

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 02/06/2025

काशी विश्वनाथाच्या प्रेरणेने सांगलीत श्री महादेव महाआरती!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, ही गौरवशाली आठवण जागवण्यासाठी श्री केशवनाथ मंदिर, गावभाग, सांगली येथे श्री महादेव महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले.

या धार्मिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने, सरचिटणीस व माजी नगरसेविका उर्मिला ताई बेलवलकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमास प्रदेश महामंत्री अॅड. स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, सुस्मिता कुलकर्णी, स्मिता भाटकर, रेखा पवार, स्नेहल जगताप, शोभा राजमाने, रेखा पाटील, रेखा सरनोबत, विदुला साठे, सुलभा जोशी, रजनी गोखले, सुनिता पाटणकर यांच्यासह महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या महाआरतीने धार्मिक वातावरण भारले गेले असून, संस्कृती आणि परंपरेचा सन्मान राखत, महिलांनी एकत्र येऊन एक नवे आध्यात्मिक व सामाजिक उदाहरण प्रस्थापित केले.
Chitra Wagh BJP Maharashtra Social Media Dhananjay Hari Gadgil Gitanjalee Dhope-Patil Devendra Fadnavis Swati Shinde Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP) Mahila Morcha BJP Murlidhar Mohol BJP Mahila Morcha Maharashtra Sudhir Mungantiwar BJP INDIA Suresh Khade Chandrakant Patil Vanathi Srinivasan Adv. Swati Shinde - ॲड. स्वाती शिंदे BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली BJP INDIA Rahul Dhope Patil

Photos from BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली's post 31/05/2025

🌸 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एक येथे भव्य मोफत आरोग्य व व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 🌸

या प्रेरणादायी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा महिला मोर्चा सांगली शहर जिल्हा अध्यक्षा सौ. गीतांजली ढोपे पाटील यांनी भूषवले.
नेहमीच महिलांच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनुसार समाज uplift करणाऱ्या गीतांजली ताईंच्या प्रेरणेतूनच या कार्यक्रमास एक नवे बळ मिळाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री ॲड. सौ. स्वातीताई शिंदे आणि भाजपा नेत्या सौ. नीताताई केळकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची प्रेरणा जागृत झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चा अनुसूचित जाती-जमाती अध्यक्षा सौ. कोमलताई चव्हाण आणि भाजपा महिला मोर्चा ओबीसी उपाध्यक्षा सौ. दिपालीताई गडदे यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.

🔹 संस्कृती मल्टिपल हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत जनरल हेल्थ चेकअप
🔹 नंदादीप हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर
🔹 घरेलू कामगार व बांधकाम कामगार योजना अंतर्गत फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण
🔹 उद्योग भवन अंतर्गत महिलांना घरी बसून व्यवसायासाठी कर्ज प्रकल्पाचे मार्गदर्शन

या सर्व गोष्टींबाबत सविस्तर माहिती भाजपा महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजिका सौ. सुस्मिता कुलकर्णी यांनी दिली.

या कार्यक्रमास पुढील मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली:
🔸 भाजपा महिला मोर्चा सचिव सौ. सुनंदाताई राऊत
🔸 भाजपा महिला मोर्चा पूर्व मंडळ सरचिटणीस सौ. ज्योतीताई माने
🔸 भाजपा महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजिका सौ. काजलताई पाटील
🔸 भाजपा कार्यकर्त्या सौ. संगीताताई ठोंबरे

💐 या शिबिराला प्रभाग क्रमांक एक मधील महिलांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.

जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी! जय महिला शक्ती! जय भाजपा!
Chitra Wagh BJP Maharashtra Social Media Dhananjay Hari Gadgil Devendra Fadnavis Gitanjalee Dhope-Patil Swati Shinde Narendra Modi Bharatiya Janata Party (BJP) Mahila Morcha BJP BJP Mahila Morcha Maharashtra Murlidhar Mohol Sudhir Mungantiwar BJP INDIA Chandrakant Patil Suresh Khade Vanathi Srinivasan Adv. Swati Shinde - ॲड. स्वाती शिंदे BJP INDIA

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Sangli
Sangli
416416