21/03/2026
*लेंगरे गावात 'रमजान ईद' निमित्त पुस्तक वाटप करत विचार पेरण्याचा अनोखा उपक्रम*
*राज ग्रामीण विकास प्रतिष्ठान व निसर्ग फाउंडेशन चा विशेष उपक्रम : परिसरातून कौतुक*
लेंगरे येथे पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने राज ग्रामीण विकास प्रतिष्ठान व निसर्ग फाउंडेशनच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांसाठी पुस्तक वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी मा.आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, प्रा. संजय ठिगळे, आलम देसाई,नशीर मौलाना, सईफ देसाई, खन्ना मुजावर, पोपा पटेल, नूरजमा मुजावर, मुस्तफा आत्तार, याकूब शिकलगार, कादर काझी, निसर्ग फाउंडेशन चे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, सचिव नानासाहेब मंडलिक आदी उपस्थित होते
--------------------
21/03/2026
* #लेंगरे*
04/01/2026
' िटा' मॅरेथॉन स्पर्धेत ' #निसर्ग_फाउंडेशन रुग्णवाहिका सेवेची सामाजिक बांधिलकी
विनामूल्य व निःस्वार्थ सेवा देणाऱ्या #निसर्ग फाउंडेशनचा #आमदार_सुहासभैय्या_बाबर यांच्या हस्ते विशेष सन्मान
विटा प्रतिनिधी -
विटा येथील 'रन विटा-फिट विटा' या विशेषणीय मॅरेथॉन स्पर्धेत निसर्ग फाउंडेशन संस्थेने अत्यावश्यक सेवा पुरवत संस्थेची विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
विटा येथे पार पडलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत लोक सेवेसाठी अत्यावशक सेवा म्हणून संस्थेने सुसज्य रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. व या उपक्रमात संस्थेने आपले यथाशक्ती योगदान देण्याचा प्रयत्न केला.
या योगदानबद्दल रन विटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने आमदार सुहास भैय्या बाबर व नगरसेवक नंदकुमार पाटील यांच्या हस्ते निसर्ग फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला हे प्रमाणपत्र निसर्ग फाउंडेशन चे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी स्विकारले.
सदरचा उपक्रम संस्थेचे कार्यवाह व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिह कदम, सहकार्यवाह मा.जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख, सल्लागार व जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. संजय ठिगळे यांच्या मार्गदर्शन खाली उपक्रम यशस्वी करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, उपाध्यक्ष डॉ. वैशाली हजारे, खजिनदार भगवान जाधव, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, सदस्य सुरज मंडले, डॉ. शिवाजी गुजर, अभि गायगवळे, सुरज भारते, प्रतिक्षा जाधव, सौरभ मंडलिक, निखिल मंडलिक, प्रशांत शिंदे, परवेज मणेर, नवनाथ सगरे आदींनी योगदान दिले.
27/10/2025
*'युवा वर्गाचा आश्वासक चेहरा*
*••मा. फिरोजभैय्या शेख••*
♾️♾️🎀🎀🌹🌹♾️♾️
_प्रतिभावंत व्यक्तिमत्वचा वाढदिवस अभिष्टचिंतन_
--------------------------
आमचे नेते, सांगली जिल्हा परिषदेचे आदर्श सदस्य, जिल्हा नियोजन समिती, खानापूर - कडेगाव कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अश्या विविध पदावर कार्यरत राहून लोकांभिमुख विकासाचे पर्व उभा करणारे *आदरणीय स्व. अनिलभाऊ बाबर* यांचे निष्ठावंत शिलेदार राजकारण आणि समाजकारणातील तेजस्वी व अभ्यासू व्यक्तित्व, *निसर्ग फाउंडेशन चे सहकार्यवाह* लेंगरे व पंचक्रोशीतील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी निसर्ग फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून *रुग्णवाहिका* हा उपक्रम सत्यात उतरवून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे बुलंद नेतृत्व *मा.श्री.फिरोजभैय्या शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
-------------------------
☘️ *निसर्ग फाउंडेशन* ☘️
13/06/2025
*"विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे" - सौ.सोनियावहिनी सुहासभैय्या बाबर*
लेंगरे येथे निसर्ग फाउंडेशनवतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
-------------------------
⭕ *दैनिक सकाळ, सांगली*
⭕ *दैनिक मुक्तागिरी, सांगली (सातारा)*
13/06/2025
11/06/2025
*लेंगरे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न*
*शेठ च. ग. शहा विद्यामंदिर व निसर्ग फाउंडेशन वतीने सत्कार सोहळा : प्रा. संजय ठिगळे यांचे 'करिअर विशेष' मार्गदर्शन*
लेंगरे येथील इयत्ता 10 वी व 12 वी मधील शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पहिले पाच क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये व जीवनप्रबोधिनी महाविद्यालयाच्या कार्यवाह सौ. सोनियावहिनी बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेठ च. ग. शहा विद्यामंदिर व निसर्ग फाउंडेशन वतीने संपन्न झाला.
कार्यक्रमात सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक डी आर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यामध्ये इयत्ता 10 वी मधील कु. मोरे आदिती प्रवीण,चि. शिंदे वेदांत,कु.बोबडे सानिका संपत, कु. उथळे धनश्री नाना,चि. खंडागळे ओजस संतोष
इयत्ता 12 वी मधील कु. सिद्धी दशरथ भारते, कु.स्नेहल माणिक पाटील, कु.कोमल धनाजी कांडेसर,कु. गौरी हणमंत डोंबे, कु.वैष्णवी सुरेश भारते यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
याप्रसंगी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी करिअरच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत स्वतःतील कर्तृत्व सिद्ध करत जागतिक स्तरावरती नावलौकिक करणे महत्त्वपूर्ण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावेत यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम घेतले जातात निसर्ग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन केले
प्रमुख पाहुणे मनोगतात सोनिया वहिनी बाबर म्हणाल्या की निसर्ग फाउंडेशन ने आयोजित केलेला विद्यार्थी सत्कार सोहळा हा विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारा सोहळा आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे करिअर निवडून त्यामध्ये अव्वल स्थान मिळवावे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा प्रशासनात उच्च पदावर पोहोचावा यासाठी शाळा पातळीवरती होणारे सत्कार नेहमीच प्रेरणादायी ठरतात विद्यार्थ्यांना उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा निसर्ग फाउंडेशन ने केलेले उपक्रम अतिशय महत्त्वकांक्षा आहे व समाजामध्ये आदर्शवत आहे
अध्यक्ष मनोगत बोलताना जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये म्हणाले की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित केलेला हा सोहळा महत्वपूर्ण आहेत निसर्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेने असंख्य उपक्रमासोबत देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आयोजित केलेला सत्कार सोहळा विद्यार्थ्यांच्या वाटचालीस प्रेरणादायी ठरेल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, जीवन प्रबोधिनी महाविद्यालय विटा कार्यवाह सोनियावहिनी बाबर, गुरुवर्य सदाशिव मोरे सर, मा. सभापती मनिषाताई बागल, मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख, माजी चेअरमन सुनिलदादा पाटील जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.संजय ठिगळे, सोसायटी संचालक पांडुरंग शिंदे, उद्योजक सईफ देसाई, सौ.सुवर्णा ठिगळे, अजित कांडेसर, मुख्याध्यापक डी.आर. जाधव, संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, अभि गायगवळे, सचिन जाधव सर, पत्रकार याकूब शिकलगार, रफिक आत्तार अन्य उपस्थित होते
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. आर. जाधव यांनी केले, आभार जंगम सर यांनी मानले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे यांनी केले.
24/04/2025
प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल
24/04/2025
मान्यवरांना पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण देताना
24/04/2025
नमस्कार,
*निसर्ग फाउंडेशन* संस्थेच्यावतीने खानापूर आटपाडी मतदार संघाचे नवनिर्वाचित *आमदार श्री. सुहासभैय्या बाबर,* सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक *श्री.अमोलदादा बाबर* तसेच *प्रा. संजय दादासाहेब ठिगळे* यांच्या सेवापुर्ती निमित्ताने
♾️ *भव्य नागरी सत्कार...!*
♾️ *पुरस्कार वितरण सोहळा*
♾️ *रेकॉर्ड डान्स स्पर्धा*
रविवार, दि. *27* एप्रिल 2025
सायंकाळी *6* वाजता
ठिकाण : हनुमान चौक लेंगरे
*या शानदार सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे!*
----------------
निमंत्रक 👏🏻🙏
*निसर्ग फाउंडेशन*