Bipin Kadam - बिपिन कदम

Bipin Kadam - बिपिन कदम

Share

भारतीय जनता पार्टी सामाजिक कार्यकर्ते
We rise by lifting others !!

10/02/2026

इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे,(HSC) बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने परीक्षा द्या, शांतपणे पेपर सोडवा, यश तुमचेच आहे. यशस्वी व्हा!

20/01/2026

आदरणीय श्री. नितीन नबीन जी यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

आपल्या नेतृत्वात भाजपचा संघटनात्मक विस्तार प्रभावी अधिक मजबूत होईल तसेच पक्ष विस्ताराचे कार्य अधिक जोमाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, अशी खात्री आहे.

Bharatiya Janata Party (BJP) Narendra Modi Amit Shah
Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan Chandrakant Patil Dhananjay Hari Gadgil Prithviraj patil

18/01/2026

सांगली महानगरपालिका प्रभाग १६ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अँड. सौ स्वातीताई नितीनराजे शिंदे या प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल प्रत्यक्ष भेटून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

या भेटीदरम्यान त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, आता सांगली शहराच्या व प्रभाग १६ च्या सर्वांगीण विकासासाठी त्या अजून जोराने काम करतील

पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिला सशक्तीकरण व मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात उत्तम कार्य होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी श्री. नितीनराजे शिंदे. आनंदराव चिकोडे , अवधूत जाधव , सुरेश जाधव , दिनेश भिंताडे, शैलेश राऊत तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

Swati Shinde

15/01/2026

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे.

अंत्यदर्शन सायं 5 वाजता निवासस्थानी वसंत कॉलनी सांगली

दहन देण्याचा विधी सायं 7 वाजता अमरधाम, सांगली येथे होणार आहे.

ईश्वर त्यांना सद्गती देवो , आणि पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो !!

14/01/2026

आनंद, उत्साह आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा !

मकर संक्रांतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#मकरसंक्रांती

12/01/2026

“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका!”
युवाशक्तीला दिशा देणारे, भारताला विश्वगौरव मिळवून देणारे
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



12/01/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, स्वराज्याच्या संकल्पनेला संस्कारांची पायाभरणी देणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची आज जयंती.

धर्म, राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे संस्कार शिवरायांच्या मनात रोवणाऱ्या जिजाऊ साहेबांनी ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन आणि पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू दिले. एका महान योद्ध्याच्या मागे उभी असलेली तीव्र राष्ट्रनिष्ठा आणि तेजस्वी मातृशक्ती म्हणजेच जिजाऊ माँ साहेब.

अशा या आदर्श मातेला, स्वराज्याच्या जननीला त्रिवार मानाचा मुजरा!

#माँ_साहेब_जिजाऊ

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Near Khanbhag Police Station
Sangli
416416