Republican Yoddha

Republican Yoddha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Republican Yoddha, Social service, at post kusumbi, Satara.

17/10/2026

जेव्हा महिला दुर्गावतार धारण करतात.

दिवसभर मजूरी केल्याने नवरा पिऊन झोपलेला, त्याच्या शेजारी ती कलंडलेली,आतल्या खोलीत एकुलता एक मुलगा झोपलेला.६ तारखेला रात्...
11/10/2026

दिवसभर मजूरी केल्याने नवरा पिऊन झोपलेला, त्याच्या शेजारी ती कलंडलेली,आतल्या खोलीत एकुलता एक मुलगा झोपलेला.६ तारखेला रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत जातीवाद्यांनी " पोलीस " म्हणत दरवाजा ठोठवला. अशिक्षित गरीब दलित महिलेने पोलीस आहेत म्हणून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिघे चौघे आत घुसले अन मारहाण नासधूस करण्यास सुरवात केली. मुलगा कुठं आहे त्याला जिवंत सोडणार नाही म्हणत त्या महिलेचा अर्वाच्छ भाषेत जातीवाचक लज्जा उप्पत्न होईल अशी शिवीगाळ केली. बाहेर उभे असलेले तिघे चौघे तिच्या मदतीला कोण येत यं का म्हणून बाहेरून घाणघाण शिव्या देत होते. कालवा - आरडा ओरड - गलीच्छ शिव्या आणि साहित्याची नासधूसीत भांड्यांचा आवाजाने अंधारात वातावरण भेसूर झाले. गोंधळाने आतल्या खोलीत झोपलेला मुलगा जागा झाला. परिस्थितीचा अंदाज आला, आपल्याच जिवावर बेतणार ही खात्री झाल्याने त्याने मागच्या दरवाजाने पळ काढला.
तो भेटला नाही म्हणून ते जातीवादी निघून गेले अन्यथः शेंद्रेतल्या सौरभ भिसे खुन प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती.
घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या महिलेने RPI (गवई) महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ आर्चना बगाडेंना कल्पना दिली आणि सौ बगाडे यांनी दि. ८ रोजी कोरेगांव पोलीस स्टेशन गाठले. तक्रार द्यायची म्हणून सांगितले मात्र पिडीतेचा जातीचा दाखला नसल्याचे कारण सांगून त्यांना पोलीस चौकीतून हुसकावून लावण्यात आले. हतबल महिलेच्या समोरच सौ बगाडे यांनी RPI जिल्हाध्यक्ष मा.संजय गाडे (तात्या ) यांना फोन लावला त्यांनाही ढमाळ हवालदार यांनी जातीचा दाखला असल्याशिवाय गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही असा आदेश Dysp राजश्री तेरणे चा असल्याचे सुनावले. तात्या बाहेर असल्याने आणि पोलीसांची दलितांप्रती असलेली मानसिकतेचा अनुभव असल्याने पिडीतेला अर्ज द्या आणि घरी जा असे सांगितले.दुसऱ्या दिवशी दि. ९ तारखेला गाडे तात्यांनी पक्षाच्या लेटरहेडवर सदर तक्रार अर्ज कोरेगांव पोलीस चौकीत मेलव्दारे पाठवत प्रत राज्य अनु.जाती आयोग, महिला आयोग, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांनाही पाठवल्या आणि दि.१० तारखेला आमच्या सोबत पश्चि महाराष्ट्र महासचिव मा.चंद्रकांतदादा कांबळे,जिल्हा मुख्यसंघटक मा.दिपकभाऊ कदम* यांना घेऊन गाडे तात्या सायं ४ वा.कोरेगांव पोलीस चौकीत पोहचले. नन्ना चा पाढा ऐकुन थोडा फार कायदा युवती जिल्हाध्यक्षा ॲड.पायल गाडेंनी सांगताच तक्रार घेतो तुम्ही गेला तरी चालेल असे प्रभारी अधिकारी देवकर यांनी सांगितल्याने आम्ही पिडीत महिलेसह एक महिला आणि सौ.आर्चना बगाडे यांना तक्रार देण्यास बसवून निघून आलो. साडेचार ते सायं ते रात्री ९ वाजे पर्यंत पोलीसांचे हो नाही हो नाही च चालू होते. Dysp राजश्री तेरणे नावाचं तुणतुणे वाजवत होते.शेवटी वैतागून सौ बगाडेंनी आम्हाला रात्री ९ : ३० वाजता याची कल्पना दिली. आणि आमच्या सहनशिलतेचा अंत झाला. गाडे तात्यांना या बाबीची कल्पना दिली आणि लेडी सिंघम मा.वैशाली कडूकर (अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक) यांना मॅसेज केला आणि चमत्कार झाला.दुर्गा प्रतिष्ठापनेच्या पूर्व संधेलाच I P S वैशाली कडूकर मॅडमनी दुर्गावतर धारण करत DYSP राजश्री तेरणेचे कानच उपटले आणि P I देवकरांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
_जातीवादी Dysp राजश्री तेरणे ला पिडीत बाईची दया येत नाही. टेबलाखालच्या कमाईवर पोसलेल्या अशा धर्मांद पोलीस अधिकाऱ्यांना " माणुसकी " नावाच्या प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. त्याचा खर्च आम्ही देऊ_ मात्र सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी दुर्गावतार असलेल्या लेडी सिंघम वैशाली कडूकर मॅडम आणि त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक मा. निखिल पिंगळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🙏

[ _महिला कोणत्याही जातीधर्माची असो, RPI ( गवई ) महिला आघाडी त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर._ ]

मा.रेखाताई सकटे _ जिल्हाध्यक्षा
ॲड.पायल गाडे - जगताप _ युवती जिल्हाध्यक्षा

09/10/2026


पोलिसांची दाखल करण्याची मानसिकता नसते.
Dysp ची योग्य तपासाची मानसिकता नसते.
सरकारी वकिल मजबूरी म्हणून फक्त कोर्टात उभा रहातो.
कोर्टाचा निकाल त्या पद्धतीनेच लागतो.
आमचा
सामाजिक न्याय समाज कल्याण विभाग निधी अभावी हतबल असतो.
समाजिक न्याय मंत्री काय उपटत बसतो का ?
खेत में का गवत.

07/10/2026



06/10/2026

स्वतः अजितदादांना स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त अपेक्षा ह्या रोहित पवार ह्यांच्या कडून होत्या दादा गेलें तेव्हा कोणाला दुःख झालं नाही एवढं दुःख रोहित पवार ह्यांना झाले हे महाराष्ट्राने बघितले एकमेव माणूस जो निरंतर अजितदादा च्या अपघातची चौकशी व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे.

ज्या प्रकारे दादांची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली होती त्याप्रमाणे रोहित पवार काम करताना दिसतात मग तो कर्जत जामखेड साठी विकास असो की MPSC विद्यार्थी आंदोलनातील सक्रिय सहभाग असो येणाऱ्या काळात रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नक्कीच मोठं नावं असेल

विचार सामान्यांचे

05/10/2026

04/10/2026

Address

At Post Kusumbi
Satara
415012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Republican Yoddha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category