19/09/2026
सातारा जिल्हयामध्ये दहशत माजवणान्या समाजकंटका विरुव्द मोक्का कायद्यान्वये कारवाई!
दाखल गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी नामे
१) प्रेम गणेश पवार वय २२ वर्षे रा.४८ शुक्रवार पेठ सातारा व टोळी सदस्य आरोपी
२) प्रेम आबासाहेब अडागळे वय २१ वर्षे रा. हिंदवी पब्लीक स्कुल पाठीमागे सिध्दीविनायक कॉलनी शाहूपुरी सातारा
३) आनंद उर्फ आण्णा लक्ष्मण माने वय २१ वर्षे रा.प्लॉट नं १२, जिव्हाळा कॉलनी दिव्यनगरी शाहुपुरी सातारा
विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावरती खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरदस्तीने पैसे हिसकावून घेणे, मारामारी करणे, बेकायदेशिर हत्यार बाळगणे, हडपार आदेशाचे उल्लंघन करणे, शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देवून मारहान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून आपल्या टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न सदर आरोपींचेविरुध्द श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला,
मा.श्री.रंजन कुमार शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवून गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांचेकडे देण्यात आलेले आहे.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, श्री. विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. संग्राम शेवाळे पोलीस पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे, सपोनि प्रियांका बाबर शाहुपुरी पोलीस ठाणे, तसेच पो.हवा. अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा. म.पो.हवा. पदमिनी जायकर, पो.ना.सुनिल रोकडे, पो.शि. केतन शिंदे, सुमित मोरे, शाहुपूरी पोलीस ठाणे. या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.