03/03/2026
स्नेहाच्या रंगात न्हाऊन निघावे, विश्वासाचे धागे अधिक घट्ट व्हावे,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवनवीन रंग दरवर्षी असेच बहरत जावे !
धुलिवंदन निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hemant Aba Bagul, Pune.
03/03/2026
स्नेहाच्या रंगात न्हाऊन निघावे, विश्वासाचे धागे अधिक घट्ट व्हावे,
तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवनवीन रंग दरवर्षी असेच बहरत जावे !
धुलिवंदन निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
02/03/2026
होळी म्हणजे नवचैतन्याचा आणि सकारात्मकतेचा उत्सव.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम, शांतता व आनंदाचे नवे रंग भरू दे !
होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
01/03/2026
सहकार क्षेत्राला बळ देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आयुष्यभर झटणारे पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि लोकाभिमुख नेतृत्व होते. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी विकासाचा ठोस मार्ग आखला.
सहकारमहर्षी पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील यांना पुण्यतिथीदिनी भावपूर्ण विनम्र अभिवादन !
28/02/2026
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर व्यकट रमण यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञानातील त्यांचे योगदान सर्व वैज्ञानिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा आणि समाजाच्या प्रगतीसाठी नवे विचार निर्माण करण्याचा संकल्प करूया.
28/02/2026
जनतेला प्रेरणा देत आणि स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्व करत देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !
27/02/2026
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला समृद्ध करणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या अतुलनीय योगदानाच्या स्मरणार्थ २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या लेखणीतून व्यक्त झालेले स्वातंत्र्य, मानवता आणि सामाजिक जाणिवांचे विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात.
या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !
27/02/2026
विठ्ठला, तुझ्या दर्शनाने हृदय आनंदित होवे,
भक्ती आणि प्रेमाची सरिता अखंड वाहो।
आमलकी एकदशीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
27/02/2026
अद्वितीय धैर्य आणि देशप्रेमाच्या ज्वालेने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !
26/02/2026
अखंड राष्ट्रभक्ती, अदम्य धैर्य आणि क्रांतिकारक विचारांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
25/02/2026
पुणे महानगरपालिकेची राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल (सी.बी.एस.ई. बोर्ड), शिवदर्शन, पुणे येथे सन 2026–27 शैक्षणिक वर्षासाठी Junior KG (२ तुकड्या – एकूण ८० जागा) प्रवेश प्रक्रिया सुरू !
प्रवेशासाठी आवश्यक अटी -
* बालकाचा जन्मदिनांक १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान असावा.
* दिनांक ३१ डिसेंबर २०२६ रोजी वय किमान ४ वर्षे व कमाल ५ वर्षे ५ महिने ३० दिवस असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या - www.pmc.gov.in
आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाची भक्कम पायाभरणी आजच करा.
23/02/2026
स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देत जनजागृती करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
22/02/2026
मौलाना आझाद यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आणि देशाच्या युवा पिढीस सशक्त आणि जागरूक बनवण्याचे कार्य केले. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, प्रख्यात नेता आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !