29/01/2026
जेव्हा पासून समाजकारण राजकारण समजायला लागलं, तेव्हा पासून सदैव दादांसोबत एकनिष्ठपणाने उभा होतो. आज दादांने पोरकं केलं.आज जेव्हा तुमची सर्वात जास्त गरज महाराष्ट्राला होती तेव्हा तुम्ही आम्हाला सोडून जायचे नव्हते दादा. शेवटी महाराष्ट्राला तुम्ही गेल्यावर तुमची किंमत कळाली. आज तुम्ही एकमात्र नेते होतात ज्यांच्याकडे मी आदर्श म्हणून पाहत होतो. तुम्ही मला कलेश्वर म्हणून प्रत्येक वेळी मारलेली हाक नेहमीच आपूलकीची होती. “कलेश्वर माझा जुना कार्यकर्ता आहे” हे शब्द सतत आठवणीत राहतील.पुन्हा ते शब्द ऐकता येणार नाही हे दुर्दैव आहे. नियतीने काही आपली काल संध्याकाळी होणारी भेट घडून दिली नाही.आपली ही भेट होऊ शकली नाही ही खंत आयुष्यभर मनात राहील. तुमची प्रत्येक आठवण मनात साठून आहे. तुमची कामाची पद्धत नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी असेल. आज तुम्हाला निरोप देताना मन अजून देखील हे सत्य स्वीकारण्यास तयार नाही. जड अंतःकरणाने तुम्हाला भावपूर्ण आदरांजली दादा !
#भावपूर्ण_श्रध्दांजली
12/01/2026
#प्रचारदौरा
#प्रभाग_क्रमांक_४१
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
Ajit Pawar
31/12/2025
आपल्या महंमदवाडी–उंड्री प्रभागात प्रचाराच्या निमित्ताने घराघरांत जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या आशीर्वादाने आत्मविश्वास आणखी दृढ झाला. नागरिकांनी दाखवलेला विश्वास, दिलेले पाठबळ आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा हीच आमच्या पुढील कार्याची दिशा ठरत आहेत.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांचा विकास—या प्रत्येक क्षेत्रात प्रभागाचा बदल जाणवेल अशा पद्धतीने काम करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांचे सहकार्य आणि सततचा संवाद हीच विकासाची खरी ताकद असून, त्यावर आधारित आम्ही पुढील काळातही तुमच्या सेवेसाठी निष्ठेने कार्यरत राहू.
28/12/2025
आपल्या महंमदवाडी–उंड्री प्रभागातील नागरिकांच्या कौटुंबिक भेटी घेत त्यांच्या प्रेमळ संवादातून ऊर्जा घेतली आणि त्यांचे आशीर्वाद स्वीकारले. आपला पाठबळ आणि विश्वास हेच काम करण्याची खरी प्रेरणा आहे.
#आपला_कलेश्वरभाऊ "
28/12/2025
उद्योगविश्वाला मूल्यांची दिशा देणारे, राष्ट्रउभारणीला समर्पित नेतृत्व घडवणारे आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारे टाटा उद्योग समूहाचे मा. अध्यक्ष, पद्मविभूषण रतन टाटा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
27/12/2025
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री तथा शिक्षणमहर्षि #डॉ_पंजाबराव_देशमुख यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!