04/05/2026
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*💯🌹 #भारतीय संस्कृती (अलंकार)🌹💯*
*👉 #अलंकार व आभूषणे यांचे शास्त्रीय व वैज्ञानिक महत्व*
*👉 #हिरवी साडी- भारतीय संस्कृतीत हिरव्या नऊवार साडीला अनन्य साधारण महत्व आहे.हिरवा रंग प्रकृतीचा आहे. हिरव्या नऊवार साडीतील स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक माता,लक्ष्मी सारखा पवित्र आहे.*
*👉 #बांगड्या- काचेची बांगडी घातल्यानंतर मनगटावरील अक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात.त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याचा शरिरावर चांगला सकारात्मक परिणाम होतो.*
*👉 #कानातील रिंग ( झुमके)*...कानातील रिंग ब्लड सर्क्यूलेशन साठी उपयुक्त असतात.
*👉 #नाकातील नथ- नाकाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नथ घातली जाते.त्यामुळे सायनस सारखे आजार दूर होतात.*
*👉 #मंगळसूत्र- विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र सौभाग्य अलंकार घालतात.त्यामुळे हृदय विकाराचा त्रास होत नाही.*
*👉 #कमरबंद- यामुळे गर्भाशयाचे व पाठदुखीचे आजार यापासून संरक्षण होते.*
*👉 #पैंजण- शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैंजण या अलंकाराचा उपयोग होतो. पैंजण मुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो.*
*👉 #जोडवे- जोडवे विवाहानंतर घातले जातात. विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते...त्यासाठी जोडवे उपयुक्त ठरतात.*
*👉 #कुंकू/गंध- आज्ञा चक्राचा विकास होतो.निर्णय शक्ती व स्मरण शक्ती वाढते.*
*👉 #अंगठी- छातीतील वेदना ,घाबरल्यासारखे वाटणे., तसेच ताप,दमा,कफ इ. पासून संरक्षण होते.*
*‼️श्री स्वामी समर्थ #गुरुमाऊली
‼️Shri Swami Samarth‼️ - WhatsApp channel
Follow ‼️Shri Swami Samarth‼️'s WhatsApp Channel. *💯🌹श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक सेवा मार्ग, दत्त सांप्रदाय सत्पुरुष माहिती सेवा.🌹💯*
*Vikram BS*
https://www.facebook.com/share/19jPA81dfs/
https://whatsapp.com/channel/0029Vaqv3jOCMY0QNMQ5nZ0F. Join 25K followers for the latest updates.
04/05/2026
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*💯🌹 #स्वामीकृपेच्या अनुभूती🌹💯*
*धन्वंतरी..! माझी गुरुमाऊली.....‼️*
*👉 #परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार मुजरा, मला एक फार विचित्र #प्रकारचा आजार झाला होता. माझ्या गालावर पूर्ण सूज आली व माझी जीभ #अजिबात हलत नव्हती. मी पूर्ण घाबरुन गेलो होतो. मनात नाही नाही ते विचार येत होते. काय करावं काही समजत नव्हतं. कोणीतरी मला, 'श्री स्वामी समर्थ केंद्रात जा,' असे सांगितले. त्यानुसार आमच्या येथील #सेवाकेंद्रात गेलो. सेवेकऱ्यांनी मला #महामृत्युंजय मंत्राची सेवा करण्यास सांगितले.*
*👉 #ती सेवा सुरुच होती त्याचवेळी आम्ही दोन तीन दवाखान्यांमध्ये माझे रिपोर्ट #डॉक्टरांना दाखविले. त्यावर डॉक्टरांनी म्हटले की, 'लवकरात लवकर उपचार सुरु करावे लागतील.' मग आम्ही मुंबईतील अजून एका #नामवंत दवाखान्यात रिपोर्ट दाखविले. तेथील डॉक्टरांनी तर 'माझी जीभ कापावी लागेल' असा सल्ला दिला आणि आणखी एका दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितले. त्यांच्या #उपचाराने जर काही फरक पडला तर थोड्या कमी प्रमाणात जीभ कापावी लागेल असे सूचवले.*
*👉 #मग आम्ही त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. ह्या कठीण प्रसंगातही आमची मनोभावे सेवा सुरु होती. #केंद्रातही सेवेकऱ्यांमध्ये माझ्या #आजाराविषयी व उपचारांविषयी चर्चा सुरुच होत्या त्यामुळे दोन तीन सेवेकरी सतत घरी येऊन विचारपूस करत असत.*
*👉 #दोघा-तिघांनी पुढाकार घेत माझ्या आजाराविषयी #परमपूज्य गुरुमाऊलींना सांगून बघू असे ठरविले व ते लोक स्वतःच माझी फाईल घेऊन पहिले श्री #गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर व परमपूज्य #गुरुमाऊलींकडे निघाले. श्री गुरुपीठात आदरणीय श्री. #चंद्रकांतदादांना सर्व सांगितले त्यावर त्यांनी, 'त्यांना काहीही होणार नाही.' असे सांगून स्वतः जवळची #सप्तरंगीची मुळी व आरोग्य यंत्र माझ्यासाठी दिले.*
*👉 #त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींकडे हे लोक गेलेत. तिथेही #परमपूज्य गुरुमाऊलींना सर्व वृत्तांत कथन केल्यावर परमपूज्य गुरुमाऊली म्हणालेत, ही व्यक्ती पूर्ण बरी होईल. जीभ कापावी लागणार नाही, पुन्हा दवाखान्यात जाण्याची वेळ पण येणार नाही.' असे सांगितले. परमपूज्य #गुरुमाऊलींनी स्वतःजवळची रानभेंडीची मुळी औषध म्हणून दिली.*
*👉 #परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय श्री. #दादासाहेब यांनी दोघांनी दिलेली औषधी व सेवा माझ्या #घरातल्यांनी सुरु केल्यात. त्यानंतर बरोबर आठ दिवसांनी माझ्या #जीभेखालून काहीतरी घनपदार्थ स्वरुपात तोंडातून बाहेर पडला व रक्तस्त्राव होऊ लागला जो #थोड्यावेळाने आपोआप थांबला.*
*👉 #दुसऱ्या दिवशी पण तसेच घडले त्यानंतर मात्र मला जीभेची थोडीफार #हालचाल होते आहे असे जाणवले. पुढे काही दिवसात डॉक्टरांची अपॉइन्टमेंट होतीच, तेव्हा डॉक्टर म्हणाले 'थोडा फरक होऊ लागलाय पण अजून फरक पडणे अपेक्षित आहे.' पुन्हा काही सेवेकरी दिंडोरीला गेले आणि परमपूज्य गुरुमाऊलींना सर्व काही सांगितले. पुन्हा परमपूज्य #गुरुमाऊलींनी औषध म्हणून #वेखंड गोमुत्रात वाटून त्याचे चाटण घेण्यास सांगितले. हा उपचार सुरु करण्यापूर्वी मी केंद्रात गेलो व आजीवन सेवा करीन असे वचन स्वामींना देऊन आलो आणि नंतर #औषधोपचार सुरु केले. दुसऱ्याच दिवशी रात्री झोपताना स्वामींना मनोमन विनंती केली की,'महाराज, या आजारातून मला पूर्ण बरे करा.' नंतर मला झोप लागली. रात्री दोन-तीन तासांनी झोपेत असतानाच अचानक माझ्या तोंडातून जीभेखालून #रक्तस्त्राव सुरु झाला व बराच वेळ तसाच होत राहिला नंतर आपोआप रक्तस्त्राव थांबला. सकाळी जाग आली तेव्हा दिसले की, #गालाची सूजही कमी झाली आहे व जीभेची हालचालही बऱ्यापैकी होऊ लागली आहे. ही सर्व परमपूज्य गुरुमाऊलींचीच जादू.*
*👉 #करण रमण मढवी, दिवा-कोळीवाडा, मुंबई*
*‼️श्री स्वामी समर्थ #गुरुमाऊली‼️*
28/04/2026
आपल्या एका पोस्ट किंवा शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला स्वामींची सेवा करण्याचा आणि आयुष्य योग्य मार्गाने जगण्याचा मार्ग मिळू शकतो.
स्वामी कार्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया
8108019039
26/04/2026
श्री स्वामी समर्थ 🙏
आपल्या नागरी निवारा शाळेत हिंदू संमेलन कार्यक्रमात आपला स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित स्टॉल लागला क्षणी अजून चालू आहे ज्यांना वेळ भेटेल त्यांनी येऊन स्टॉल ल भेट द्या
आयुर्वेद
मुद्रण
दोन्ही आहेत
अधिक माहिती 8108019039
22/04/2026
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nishikant More, Asawari Ghodke, Akshata Mande, Suraj Dame, Sachin Gayakwad, Vaishali Potbhare, Ramkrishna Saha, Sam Sam
श्री स्वामी समर्थ 🙏
आपणा सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नागरी निवारा परिषद गोरेगाव पूर्व मध्ये
22/04/2026
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nishikant More, Asawari Ghodke, Akshata Mande, Suraj Dame, Sachin Gayakwad, Vaishali
Potbhare, Ramkrishna Saha, Sam Sam
श्री स्वामी समर्थ 🙏
सगळ्यांचे ग्रूप मध्ये स्वागत आहे.