11/05/2024
कर्मवीरांची प्रयोगशाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडबोरगाव
11/05/2024
09/13/2022
आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी शाळेला डायटच्या अधिव्याख्याता *डॉ. गीतांजली बोरुडे मॅडम* यांनी सकाळी ठीक 9- 45 वाजता शाळेला भेट दिली असता परिपाठ चालू होता. परिपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल सावळे यांनी शाळेमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम तसेच शाळेची यशोगाथा मॅडमला दाखविली यानंतर इयत्ता पहिलीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये मिसळून माथेले सर यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा केली तसेच हॅपिनेस करीकुलम अंतर्गत विद्यार्थ्यासोबत कथेचे नाट्यीकरण करून घेतले we learn English ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. अक्षर शब्द गटावर काही विद्यार्थी तसेच गणित विषयात ,भाषाविषयक काही विद्यार्थी याप्रमाणे पहिलीची प्रगती समाधानकारक आहे असा उल्लेख केला. त्यानंतर इयत्ता दुसरीच्या वर्गात संख्या शिडी, संख्या लेखन, संख्या वाचन तसेच भाषा विषयात वाचन घेतले. पहिली व दुसरीच्या वर्गात गट अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मदत घेतल्यास गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल असे मॅडमनी सांगितले. इयत्ता आठवीच्या वर्गात भागाकाराचे गणित देऊन मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व शिक्षकाची बैठक घेऊन सर्व शिक्षकांसोबत आपण राबवत असलेल्या उपक्रमाविषयी चर्चा केली एकंदरीत मॅडमनी समाधान व्यक्त केले.🙏🙏
01/03/2022
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडबोरगाव ता.मानवत जि.परभणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.*🌺🌺🌺🌺
https://youtube.com/watch?v=Y5nAOOEWDws&feature=share
11/17/2021
कोविड 19 लसीकरण ताडबोरगाव
09/05/2021
लायन्स क्लब परभणी यांच्या वतीने आमच्या शाळेतील आमचे सहकारी *श्री.नरेंन्द कांबळे सर* यांना यावर्षीचा आदर्श व उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन...🎉🎊🎉🎊🎉🎊
07/29/2021
NMMS गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती ताडबोरगाव 🙏🙏
07/07/2021
शिरीष लोहट केंद्र प्रमुख सावरगाव 🙏
ताडबोरगाव शाळेची विद्यार्थ्यांनी *फातेमा* लाँकडाऊन मुळे सध्या शेतात जाते पण विळा-खुरपे यासोबतच वही,पुस्तक-पेन सुद्धा सोबत नेते इत्तर महिला मुली आराम करतात त्यावेळी ही अभ्यास करते.. फातेमाची ही जिद्ध पाहीली की वाबळेवाडीच्या सानियाची आठवण होते... अभिनंदन फातेमा तुझा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, मार्गदर्शक शिक्षक श्री गोरे सर, मुख्याध्यापक श्री सावळे सर व टीम ताडबोरगावचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद!!!
शिरीष लोहट केंद्र प्रमुख सावरगाव 👌🌹👍🌹🙏
07/07/2021
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडबोरगाव एमटीएस परीक्षा प्राविण्य याबद्दल शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन 💐💐
06/18/2021
अभ्यास गटात अभ्यास करताना विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडबोरगाव 🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Atlanta, GA
