03/10/2026
Student federation of India stand for estiblishment of a progressive,democratic and egalitarian education system which will ensure Social Justice.
03/10/2026
SFI- DYFI
✨
03/01/2026
*एस. एफ.आय. व डी. वाय. एफ. आय. चा वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या रामटेक तालुका कमिटी चा वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
चित्रकला स्पर्धेचे आयोजन 1 मार्च 2026 रोजी दुपारी १२ वाजता कवडक येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संजीवनी व कवडक येथील आशा वर्कर कल्पना हटवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. कार्यक्रम डी. वाय. एफ. आय. चे जिल्हा सचिव अमित हटवार यांचा प्रमुख उपस्थित पार पडले. स्पर्धेत एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक पिंकी हिंगवे व खुशिका बागडे यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक अक्षरा सिरसाम व सरस शेंद्रे यांनी मिळवला तर तृतीय पारितोषिक मालविका दूधबर्वे व रिहांशिका धुर्वे यांनी पटकावला. तसेच प्रोत्साहन पारितोषिक क्रिस्टी दूधबर्वे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष हटवार, उमेश तुमडाम, सूरज दुंडे ,रोशन चंदनबटवे, सायली गाढवे यांनी परिश्रम घेतले.
CUET UG Date has been extended to 4th Feb 2026
To secure admission in Central University students have to qualify CUET undergraduate enterence test !
01/28/2026
District Conference Us !
रामटेक तालुक्यातील भोजापुर येथील नागरिक ग्रामपंचायतीने मंजूर केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म केंद्र ग्रंथालय व वाचनालय निश्चित जागेवरच बांधले जावे यासाठी शांततामय आंदोलन करत आहे. गावातील सरपंच समोर येणाऱ्या निवडणुका पाहून गावातील लोकांमध्ये फूट निर्माण करून या लायब्ररीच्या विरोध करत आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीने जागा निश्चितीच्या ठराव व नकाशा जोडून याला मंजुरी दिली होती. त्यावर सरपंच व सचिवाची सही पण होती. तरीसुद्धा आता ते लोक विरोध करत आहेत. आमदार आशिष जयस्वाल साहेब, जिल्हाधिकारी, सामाजिक न्याय अधिकारी, BDO, तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊ नये. यावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे गावातील अल्पसंख्याक समूहातील दलित समूहातील नागरिक आज शांततामुळे धरणे आंदोलनावर बसले.
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या जातीवादी सरपंच व त्यांच्या भूमिकेचा निषेध करते. आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करते. ही सामाजिक न्यायाची लढाई.
Students Federation of India (SFI) and Democratic Youth Federalism of India (DYFI) firmly stand with the deamands of people of Bhojapur, Ramtek against the caste based discrimination and communalism.
long live !
Jay bhim !
01/09/2026