01/06/2026
भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्ण अध्याय आज संपला. आपल्या मधुर, नितळ आणि भावस्पर्शी स्वरांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपटसंगीताच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना असंख्य अजरामर सुरांची भेट दिली. त्यांच्या स्वरातील माधुर्य, साधेपणा आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यामुळे त्यांनी संगीतप्रेमींच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राने एक अमूल्य स्वररत्न गमावले आहे. त्यांची गाणी आणि संगीतसाधना येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
31/05/2026
दक्षिण मुंबई लोकसभा सहप्रमुखपदी मा. श्री. संतोष नलावडे यांची तसेच शिवडी व वरळी विधानसभा समन्वयकपदी मा. श्री. संजय (नाना) आंबोले आणि महिला समन्वयकपदी मा. सौ. अनुराधा इनामदार यांची झालेल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आपण नव्या जबाबदारीत समर्पित भावनेने कार्य कराल, असा विश्वास आहे.
आपल्या सर्वांच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
.ambole
.jadhav
31/05/2026
धर्मनिष्ठा, कर्तव्यपरायणता, शौर्य आणि जनकल्याण यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर!
न्याय, सुशासन आणि लोकहितासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान राजमातांनी भारतीय इतिहासात अजरामर ठसा उमटवला आहे. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
30/05/2026
प्रिय शैला,
आयुष्याच्या प्रवासात तू मिळालीस, हे नशिबाचं दान आहे,
माझ्या प्रत्येक सुख-दुःखात तूच माझं ‘स्थान’ आहे.
आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खूप खास असावा,
कारण तूच तर माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर ध्यास आहेस!
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, तू अशीच नेहमी आनंदी रहा!
29/05/2026
मा. आमदार संजयराव गायकवाड साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
बुलढाणा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे, शिवसेनेचे निष्ठावंत आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमकपणे आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे.
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
.gaikwad
27/05/2026
महामानवांच्या संघर्षमय प्रवासात सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या, त्याग, प्रेम आणि सामर्थ्याची प्रेरणा असलेल्या माता रमाई आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
27/05/2026
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
दूरदृष्टी, विकासाभिमुख नेतृत्व आणि देशाच्या प्रगतीसाठी असलेली आपली बांधिलकी प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
nitin
25/05/2026
शिवसेनेचे युवा, अभ्यासू आणि धडाडीचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के साहेब यांना दुसऱ्यांदा मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
लोकहितासाठी, जनसेवेसाठी आणि संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदानासाठी मिळालेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या कार्याला अशीच उत्तुंग भरारी लाभत राहो, ही सदिच्छा!
#अभिनंदन
.jadhav
23/05/2026
शिवसेना पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषद आमदार मा. भावनाताई गवळी-पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजकार्यात तसेच जनसेवेत निरंतर यश लाभो, ही सदिच्छा. आपल्या कार्याला अशीच उत्तुंग भरारी मिळत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! 💐
.jadhav