Adv.HariShastri

Adv.HariShastri

Share

विधानसभा समन्वयक - वांद्रे पूर्व
भारतीय कामगार सेना - चिटणीस
साहेब कामगार सेना - सरचिटणीस

Photos from Adv.HariShastri's post 06/04/2026

प्रभाग क्रमांक ९५ मधील खेरवाडी येथे नाले व गटार सफाईच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी उपविभाग प्रमुख उदय दळवी, शाखा संघटिका सुषमा गवस, तसेच शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या सहकार्यानेच विकास शक्य — आणि तोच आमचा खरा मार्ग!

Photos from Adv.HariShastri's post 04/04/2026

जय श्रीराम! 🚩 जय हनुमान!

हनुमान जयंती निमित्त प्रभागातील विविध मंडळांना सदिच्छा भेट देत प्रभात उत्सवात सहभागी होण्याचा योग आला.

भगवान श्री हनुमान यांच्या शक्ती, भक्ती आणि सेवाभावाचा आदर्श आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. या पवित्र निमित्ताने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.

प्रभागातील सर्व मंडळांचे मनःपूर्वक आभार, आपण असेच समाजकार्य आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेत राहा, ही अपेक्षा.

Photos from Adv.HariShastri's post 02/04/2026

दीपकवाडी परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण 🚧
नागरिकांच्या तक्रारीनुसार व माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच आमदार मा. वरुण सरदेसाई साहेब यांच्या विकासनिधीतून हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
जनतेच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या ताकदीवर, दीपकवाडीच नव्हे तर संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे.

26/03/2026

श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺

Photos from Adv.HariShastri's post 19/03/2026

प्रभाग क्र. ९५ मधील गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी होत सर्व नागरिकांसोबत हिंदू नववर्ष अत्यंत उत्साह, आनंद आणि अभिमानाने साजरे केले. आपल्या समृद्ध संस्कृतीचा, परंपरेचा आणि हिंदुत्वाच्या अस्मितेचा हा सोहळा खऱ्या अर्थाने एकतेचा आणि सामर्थ्याचा संदेश देणारा ठरला.

आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकासोबत अशीच बांधिलकी ठेवत विकास आणि प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहीन, हीच गुढीपाडव्याच्या शुभदिनी प्रतिज्ञा.

सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩✨

Photos from Adv.HariShastri's post 14/03/2026

शिवसेना नेते, आमदार व विभाग प्रमुख ॲड. अनिल परब साहेब तसेच शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, माझ्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. ९५ मधील दीपकवाडी चाळ परिसरातील रस्त्यांच्या पुनर्वसन व दुरुस्तीच्या कामाचा नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार आहोत.

– ॲड. हरी शास्त्री
नगरसेवक / विधानसभा समन्वयक

Photos from Adv.HariShastri's post 07/03/2026

शिवजयंती निमित्त प्रभाग क्रमांक ९५ मधील विविध मंडळे व शाखांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. तसेच आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या महापूजेचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवा व जनतेच्या विकासासाठी अखंड कार्य करण्याचा संकल्प यावेळी पुन्हा दृढ केला. 🚩

28/02/2026

जय महाराष्ट्र ..!! 🚩

शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माजी आमदार कै. श्रीकांतभाई सरमळकर साहेब यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करून व त्यांच्या ज्वलंत विचारांमधून प्रेरणा घेत.

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आमदार मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब साहेब व शिवसेना सचिव आमदार मा. वरुण जी सरदेसाई यांच्या सक्षम नेतृत्वात मला बाजार व उद्यान समिती सदस्य म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक आहे.

ही केवळ पदाची जबाबदारी नाही, तर प्रभाग क्र. ९५ मधील प्रत्येक कुटुंबाच्या विश्वासाचा सन्मान आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास, दिलेला पाठिंबा आणि प्रेम हेच माझी खरी ताकद आहे.

मी आपण सर्वांना विश्वास देतो की, बाळासाहेबांच्या विचारांना आणि पक्षाच्या तत्त्वांना निष्ठा ठेवत, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, विकासासाठी आणि आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी मी पूर्ण ताकदीने कार्य करेन.

आपले प्रेम, आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या — हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.

आपला सदैव ऋणी,
ॲड.हरी शास्त्री
नगरसेवक प्रभाग क्र ९५
विधानसभा समन्वयक

Photos from Adv.HariShastri's post 25/02/2026

शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना कार्यसम्राट आमदार वरुण जी सरदेसाई यांच्या सहकार्याने आणि माझ्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ९५ मध्ये सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

📍 सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आलेली ठिकाणे:
🔹 दूधवाला यादव चाळ
🔹 लोकमान्य भाडेकरू संघ
🔹 रॉबर्ट गोम्स चाळ
🔹 गुप्ता चाळ
🔹 शिव साई मंडळ
🔹 NTM गणपती मंडळ चाळ

🔐 या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार असून सुरक्षितता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होणार आहे.
🤝 कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
जय महाराष्ट्र! 🚩

Photos from Adv.HariShastri's post 20/02/2026

शिवसेना नेते आमदार विभाग प्रमुख ॲड. अनिल परब साहेब तसेच शिवसेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, माझ्या प्रयत्नाने आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने जय भवानी सोसायटी परिसरातील गल्ली रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दिलेला शब्द पूर्ण करत विकासकामांना गती देत आहोत.

– ॲड. हरी शास्त्री
नगरसेवक / विधानसभा समन्वयक

Photos from Adv.HariShastri's post 13/02/2026

राजकीय वाटचालीत आधारवडासारखी साथ देणारी आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी माझी पत्नी निकी सरमळकर शास्त्री तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
तुझी सेवा आणि समर्पण अशीच वाढत राहो, हीच प्रार्थना.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai