Vishwas Bhau Sardar

Vishwas Bhau Sardar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishwas Bhau Sardar, Mumbai.

26/01/2025

*२६ जानेवारी १९५०ला भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला. माणसामाणसात भेद करणाऱ्या, मानवतेला काळीमा असणाऱ्या सनातन संस्कृतीला कायद्याने हद्दपार करण्यात आले आणि सर्व भारतीयांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे तत्व लागू झाले.*

*हे संविधान आणि संविधानिक मूल्य अबाधित राखणे हाच वंचित बहुजन आघाडीचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.*

*प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.*

Photos from Vishwas Bhau Sardar's post 11/10/2024

बाळासाहेबांना पाहुनी भीम परतून आल्यासारखे वाटते...
वंचितांना न्याय हक्क मिळवून देणारा फक्त एकच नेता
आदरणीय #बाळासाहेब_तथा_प्रकाश_आंबेडकर...

Photos from Vishwas Bhau Sardar's post 01/10/2024

*वंचित बहुजन आघाडी*
*ईशान्य मुंबई जिल्हा*

आदरणीय *बाळासाहेब आंबेडकर* तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.*रेखाताई ठाकूर* मुंबई अध्यक्ष मा. *अब्दुल हसन खान साहेब* यांच्या मार्गदर्शन तसेच 19/09/24 तारखेला खंडाळा येथे झालेल्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनानुसार वंचित बहुजन आघाडी ईशान्य मुंबई जिल्हा च्या वतीने *विधानसभा निवडणूक ची पूर्वतयारी करिता* रविवार दिनांक 29/09/2024 रोजी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष
मा.*विश्वास सरदार* यांच्या अध्यक्षतेखाली भांडुप पश्चिम येथे बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मा *सागर गवई* मुंबई युवा आघाडी महासचिव मा.*कालिदास गायकवाड* मुंबई प्रदेश सचिव मा.*शारदाताई गायकवाड* ईशान्य मुंबई महिला आघाडी अध्यक्ष तसेच ईशान्य मुंबईतील *सर्व जिल्हा पदाधिकारी,महिला,युवा पदाधिकारी,तालुकाध्यक्ष,वार्ड अध्यक्ष* व *इतर पदाधिकारी* उपस्थित होते सदर बैठकीचे प्रस्तावना *हरित जाधव* ईशान्य मुंबई जिल्हा महासचिव सूत्रसंचालन *संजय कांबळे* ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले.
*शिवराम वाघमारे* ईशान्य मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष यांनी आर्थिक अहवाल मांडला. सर्व पदाधिकाऱ्यांनी खुल्या मनाने चर्चा केली व आपली मते मांडली.
मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार बैठकीतील काही क्षण....

आपला नम्र
*मा. विश्वास सरदार*
ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष

30/09/2024
27/09/2024

*“हिंदू कोड बिलाच्या संदर्भात मला सर्वांत मोठा मानसिक छळ सोसावा लागला आहे. पक्ष यंत्रणेची मदत मला नाकारण्यात आली. पंतप्रधानांनी मतदानाचे स्वातंत्र्य दिले, ही पक्षाच्या इतिहासातील एक असामान्य गोष्ट आहे. मला काही हरकत नव्हती. पण मला दोन गोष्टी अपेक्षित होत्या. पुरेसा वादविवाद झाल्यावर चीफ व्हीपला भाषणे आणि बंद करण्याच्या सूचनांवरील वेळेची मर्यादा म्हणून मला पक्षाच्या व्हीपची अपेक्षा होती. भाषणांवर वेळेची मर्यादा घालून विधेयक मंजूर झाले असते. जेव्हा मतदानाचे स्वातंत्र्य दिले गेले तेव्हा भाषणांना कालमर्यादेसाठी व्हीप द्यायला हरकत नव्हती. पण असा व्हीप कधीच जारी करण्यात आला नाही. संसदीय कामकाज मंत्री, जे हिंदू संहितेच्या संदर्भात पक्षाचे मुख्य व्हीप देखील आहेत, यांचे वर्तन अगदी विलक्षण होते. तो संहितेचा सर्वात प्राणघातक विरोधक आहे आणि बंद आंदोलन करून मला मदत करण्यासाठी कधीही उपस्थित राहिला नाही. दिवस आणि तास फिलीबस्टरिंग एकाच कलमावर चालले आहे. परंतु सरकारी वेळेचा सदुपयोग करणे आणि सरकारी कामकाजावर जोर देणे हे ज्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्य सभागृहात हिंदू संहिता विचाराधीन असताना पद्धतशीरपणे अनुपस्थित राहिले. पंतप्रधानांप्रती एवढा विश्वासू चीफ व्हीप आणि अविश्वासू व्हीपशी एवढा निष्ठावान पंतप्रधान असे प्रकरण मी पाहिलेले नाही. हे असंवैधानिक वर्तन असूनही, चीफ व्हीप हे खरोखरच पंतप्रधानांचे लाडके आहेत. निष्ठा नसतानाही त्यांना पक्ष संघटनेत पदोन्नती मिळाली. अशा परिस्थितीत पुढे जाणे अशक्य आहे.*

*विरोधी पक्ष भक्कम असल्याने हे विधेयक मागे घ्यावे लागल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष किती मजबूत होता? या विधेयकावर पक्षात अनेकवेळा चर्चा झाली आणि विरोधकांनी त्याला फाटा दिला. प्रत्येक वेळी विरोधकांचा पराभव झाला. गेल्या वेळी पक्षाच्या बैठकीत 120 पैकी केवळ 20 विधेयक मांडले गेले तेव्हा विरोधात असल्याचे आढळून आले. जेव्हा हे विधेयक पक्षात चर्चेसाठी घेण्यात आले तेव्हा सुमारे साडेतीन तासात ४४ कलमे मंजूर करण्यात आली. यावरून पक्षांतर्गत विधेयकाला किती विरोध होता हे दिसून येते. सभागृहातच विधेयकाच्या २, ३ आणि ५ या तीन कलमांवर मतविभागणी झाली आहे. प्रत्येक वेळी हिंदू संहितेचा आत्मा असलेल्या कलम ४ च्या बाजूने प्रचंड बहुमत मिळाले आहे.त्यामुळे वेळेच्या आधारे विधेयक रद्द करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय मी स्वीकारू शकलो नाही.”*

*: ॲड. प्रकाश आंबेडकर*

x.com

Photos from Vishwas Bhau Sardar's post 13/05/2024

वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची
काल दीनांक 12/5/2024 रोजी वंचित बहुजन आघाडी चे भांडुप ता. उपाध्यक्ष ॲड. रमेश आढाव मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई जिल्ह्याचे लाडके लोकप्रिय मुस्लिम उमेदवार दौलत कादर खान यांच्या प्रचारार्थ डोअर टु डोअर प्रचार व पद यात्रा यांच्या मार्फत प्रचार प्रसार करण्यात त्या प्रसंगी भांडुप ता.सचिव गणेश गायकवाड ,ईशान्य.मु जिल्हा. युवा उपाध्यक्ष अजय ,युवा नेते दीनेश साळवे, रवी ससाणे,अनिल मगरे, नागेश खरात,वीशाल पारखे,रुतिक शिंदे, प्रणीत बनसोडे ,अशोक लिहिणार, सुबोध, तसेच हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपला विश्वासू
अजय ससाणे
ईशान्य मुंबई युवा उपाध्यक्ष

#जय भीम ,जय शिवराय , जय लहुजी 💝

Photos from Vishwas Bhau Sardar's post 13/05/2024

लोकसभा निवडणूक 2024
दिनांक 12 मे 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दौलत भाई खान यांच्या प्रचारार्थ हनुमान नगर वार्ड क्रमांक 116 बेकरी रिक्षा स्टँड जवळ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे

Photos from Vishwas Bhau Sardar's post 06/03/2024

मी येतोय,तुम्ही येताय ना
लोकशाही गौरव महासभा
७ मार्च २०२४, गुरुवार,
ठिकाण बारकू गोविंद पाटील मनोरंजन मैदान मुलुंड पश्चिम मुंबई ८०.
भीक नको सत्तेची,सत्ता हवी हक्काची...

प्रमुख मार्गदर्शन :- आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
प्रमुख उपस्थिती :- माननीय रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

निमंत्रक
मा.विश्वास सरदार
ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष

05/03/2024

मी येतोय,तुम्ही येताय ना
लोकशाही गौरव महासभा
७ मार्च २०२४, गुरुवार,
ठिकाण बारकू गोविंद पाटील मनोरंजन मैदान मुलुंड पश्चिम मुंबई ८०.
भीक नको सत्तेची,सत्ता हवी हक्काची...

प्रमुख मार्गदर्शन :- आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
प्रमुख उपस्थिती :- माननीय रेखाताई ठाकूर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

निमंत्रक
मा.विश्वास सरदार
ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Website

Address

Mumbai