अंगणवाडी कर्मचारी संघटना CITU

अंगणवाडी कर्मचारी संघटना CITU

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अंगणवाडी कर्मचारी संघटना CITU, Public & Government Service, H no - 01 Siddhivinayak Lux residency, Anuradha Park Kannad TQ. Kannad Dist. Chh. Sambhajinagar, .

11/12/2025

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको वेतन हवे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको वेतन हवे या करिता आंदोलन करण्यात आले या आंदोलनास बहू संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते

06/12/2025

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विवध माघणी संदर्भात जि प छत्रपती संभाजी नगर येथे मोर्चा चे आयोजन अंगणवाडी कर्मचारी मोर्चा

05/12/2025

CITU चे 17 वे राज्य अधिवेशन मुंबई येथे होत असून ध्वजारोह करून अधिवेशनाची सुरुवात...
अधिवेशनाला राष्ट्रीय नेतृत्व उपस्थित असून
पुढील तीन दिवस अधिवेशन चालणार आहे..
कॉ. सुभाष जाधव नगर कॉ. मदन नाईक सभागृह, कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी,
कॉ, सुभाष थोरात कॉ. सलीम मुल्ला मंच
व कॉ. पंडित मुंडे प्रवेशद्वार...

14/11/2025

10 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यात 13,011 नवीन अंगणवाडी मदतनीस पदांची निर्मिती झाली होती. ही सर्व पदे नवीन जाहिरात देऊनच भरावीत स्पष्ट सूचना शासनाने प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या होत्या तसेच, 02 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 नुसार नवीन निर्माण पदे फक्त जाहिरातीद्वारेच भरण्याची अट स्पष्टपणे नमूद आहे.

मात्र या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करून काही प्रकल्प अधिकाऱ्यांनी 2023 मधील मदतनीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना थेट नवीन पदांवर नियुक्ती देऊन नियमबाह्य निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे, प्रतीक्षा यादी च्या अटी —राजीनामा,अन्य कारणास्तव पद रिक्त,नवीन अंगणवाडीची मंजुरी
— या तीनही गोष्टी प्रत्यक्षात घडल्या नसतानाही प्रतीक्षा यादीच्या नियमाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
या चुकीच्या नियुक्त्यांविरोधात 8 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर 28 ऑगस्ट 2024 रोजी CEO यांनी सुनावणी घेतली व विषयावर आयुक्तांचे मार्गदर्शन मागितले.
यानुसार 23 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या मार्गदर्शनातही नवीन निर्माण पदे जाहिरात देऊनच भरावीत, अशी स्पष्ट सूचना पुन्हा देण्यात आली आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की —“आयुक्तांचे स्पष्ट मार्गदर्शन मिळूनही जिल्हा परिषद प्रशासन चुकीच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यास विलंब करीत आहे, आणि यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर सरळ अन्याय होत आहे.”पात्र उमेदवारांनी या सर्व नियमबाह्य नियुक्त्या तातडीने रद्द करून न्याय्य, पारदर्शक व कायदेशीर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सुधीर सोनवणे जिल्हाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटु

13/11/2025

अंगणवाडी कर्मचारी मोर्चा छ. सांभाजीनगर

08/11/2025

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत मुख्य कार्यकारी श्री अंकित साहेब यांना निवेदन.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात आहार बिल, भाऊबीज, लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन केलेल्या कामाचा मोबदला, प्रोत्साहन भत्ता, अंगणवाडी इमारत भाडे इ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या समस्या सहानुभूतीपूर्वक ऐकत, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महिला व बालविकास विभागाला आवश्यक त्या सूचना श्री. अंकित साहेबांनी दिल्या.तसेच महिला व बाल विकास कार्यालयात विस्ताराधिकारी श्री. सुनील व्यास व वरिष्ठ सहाय्यक श्री. नितीन पवार उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटना (CITU) चे जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर सोनवणे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले.

08/11/2025

छ. सांभाजीनगर जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा व किचनसेट घोटाळा

Want your business to be the top-listed Government Service?

Culinary Team

Attire

Website