31/05/2026
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती* ===========‼️‼️===========
आज दिनांक ३१/०५/२०२६ ला सकाळी १०=०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर येथे श्री.राजेंद्र रामभाऊ टेकाडे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार वाहुन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक थोर संत व समाजसुधारक आणि आदर्श राज्यकर्त्यांचा गौरवशाली वारसा लाभला आहे.त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, धर्म,न्याय, लोककल्याण आणि आदर्श प्रशासनाचा उत्तुंग वारसा निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, दूरदृष्टी आणि जनसेवेच्या बळावर अहिल्याबाईंनी राज्यकारभार यशस्वीपणे सांभाळला. प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी न्यायप्रिय आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. देशभरातील अनेक मंदिरांचे जिर्णोद्धार,घाट,धर्मशाळा आणि पाण्याच्या सोयी उभारून त्यांनी समाजसेवेचे महान कार्य केले. स्त्रीशक्ती, कर्तृत्व आणि संवेदनशील नेतृत्वाचे प्रेरणादायी प्रतीक असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
कार्यक्रमाला उपस्थित ,(प्रशासक) सौ.सुषमाताई प्रकाश वानखडे, प्रशासकीय सदस्य श्री.अमोलभाऊ राऊत, महिला बचत गट CRP सौ.प्रतिभाताई फाटे,सौ.माधुरीताई वैराळे,
ग्रा.पं. कर्मचारी मनिष सगणे, श्री.उमेश तिखिले,रोजगार सेवक गजानन बोबडे, ,तसेच गावातील सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते.
30/05/2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल
29/05/2026
❗ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती ❗ =====================================
आज दिनांक २८/०५/२०२६ ला सकाळी ११=०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर येथे श्री.ऋषिकेश सुभाषराव सगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार वाहुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ,देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि अखंड हिंदुत्वाचा विचार समाजात रुजवणारे महान क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त आणि दूरदृष्टीचे विचारवंत स्वातंत्रवीर सावरकर यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या त्याग, संघर्ष आणि राष्ट्रसेवेच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.
कार्यक्रमाला उपस्थित ग्रा.पं. कर्मचारी मनिष सगणे, रोजगार सेवक गजानन बोबडे, ,तसेच गावातील युवावर्ग ,सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते.
29/05/2026
💧हातपंप दुरुस्ती २०२६💧
____________________________
आज दिनांक २७/०५/२०२६ रोजी ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर अंतर्गत गावातील हातपंप दुरुस्तीचे निवेदन प्रशासक यांनी पंचायत समिती अचलपूर येथे दिनांक ०६/०५/२०२६ रोजी देण्यात आले होते.राज्यात दरवर्षी शासनामार्फत गावात पाणी टंचाई निर्माण होणेची शक्यता असते आगामी काळात संभाव्य अल नीनो मुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता प्रशासक, प्रशासकीय सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन,
शिवमंदिर वार्ड क्रं.०२ मधिल चौकातील हातपंप दुरुस्ती परिसरातील हातपंप दुरुस्ती करण्यात आली तसेच उपस्थित ग्राम पंचायत पदाधिकारी, सदस्य मंडळी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
29/05/2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: चंद्रपूर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा अमरावती जिल्हा दौरा; सावळापूर ग्रामपंचायतींची केली पाहणी!
====================================
सन २०२५/२६ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत केलेल्या कामांच्या जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेची उच्चस्तरीय समिती सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दिनांक २५ मे २०२६ या दिवसांच्या कालावधीत ही समिती अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन उत्कृष्ट ग्रामपंचायतींना भेटी देऊन अभियान कालावधीत केलेल्या कामकाजाचे मुल्यमापन करत आहे.
उच्चस्तरीय समितीमध्ये मूल्यमापन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी या समितीमध्ये समाविष्ट आहेत:
• मा.श्री.पुलकित सिंह (भा.प्र.से.)मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद चंद्रपूर
• मा.श्रीमती.मिना साळुंखे -उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) चंद्रपूर
• मा.श्रीमती.नमीता बांगर गट विकास अधिकारी ,चंद्रपूर
• मा.श्री.प्रणव बक्षी –विस्तार अधिकारी (पं)
• मा.श्री.राकेश उईके –जिल्हा शिक्षणधिकारी (चंद्रपूर)
• मा.श्री.विनोद खेडकर गट विकास अधिकारी अचलपूर,
मा.श्री.महादेव कास्देकर विस्तार अधिकारी (पं) अचलपूर
मा.श्री.विश्वरदास सांतगे विस्तार अधिकारी (पं) अचलपूर,
ग्रामपंचायतींचे मूल्यांकन
आज दिनांक २६ मे २०२६ रोजी या समितीने आपल्या नियोजित दौऱ्यानुसार ग्रामपंचायतींना सावळापूर प्रत्यक्ष भेट दिली पथकाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत निर्धारित *आठ प्रमुख* मुद्द्यांवर ग्रामपंचायतीची बारकाईने तपासणी केली.
*ग्रामपंचायत कार्यालयातील रजिस्टर, आर्थिक लेखे, समिती अहवाल, स्वच्छता नोंदी, कर वसुली रेकॉर्ड, डिजिटल फाईल्स यांची तपासणी करून पथकाने गावातील प्रत्यक्ष विकासकामांची पाहणी केली. नाविन्यपूर्ण उपक्रम, मोफत दळण केंद्र व अभ्यासाचा भोंगा,गावातील स्वच्छ रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, शाळा परिसर, वाचनालय, हरित उपक्रम, महिला सहभाग, आणि सामाजिक सलोखा पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.*
*तपासणीअंती उपस्थित अधिकाऱ्यांनी “सावळापूर ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरणपूरक नियोजन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभागातून आदर्श काम उभे केले असून ही ग्रामपंचायत पुढील स्तरावर निश्चितच उल्लेखनीय यश संपादन करेल,” अशा शब्दांत ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
उपस्थित राहून तपासणी पथकाला ग्रामविकास कामाची माहिती दिली सरपंच उपसरपंच प्रशासकीय समिती, ग्राम पंचायत अधिकारी,व सन्माननीय सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी,पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक व शिक्षक,अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, महसूल सेवक,आरोग्य विभाग कर्मचारी, उमेद बचत गट CRP महिला मंडळ,भजनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,युवक वर्ग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि समृद्ध बनवणे हा आहे.
25/05/2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल
23/05/2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातून सावळापूर ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
ही केवळ ग्रामपंचायतीची नव्हे, तर संपूर्ण गावाच्या एकजुटीची, विकासदृष्टीची आणि लोकसहभागाची मोठी पावती आहे.प्रशासक, प्रशासकीय सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पंचायत पदाधिकारी,सर्व कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे..!!💐💐
22/05/2026
‼️सर्वसाधारण ग्रामसभा २०२६‼️
=============================
ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर अंतर्गत आज दिनांक २०/०५/२०२६ ला सायंकाळी ०५=४५ वाजता सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.सौ.सुषमाताई प्रकाश वानखडे (प्रशासक) यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात करण्यात आली.
गावकऱ्यांनी सहकार्य असेल तर गावच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे, आज आयोजित ग्रामसभा सर्वांनी भाग घेऊन चर्चा होऊन सर्वानुमते सहमती दिली. ग्रा.पं.अधिकारी श्री.ऋषिकेश राहाटे यांनी ग्रामसभेमध्ये खालील सर्व सविस्तर माहिती देण्यात आली.
➡️VB-G RAMG योजने अंतर्गत गावच्या सर्व नागरिकांना जलसिंचन विहीर, फळबाग, गायगोठा, बांधावरील झाडे लावणे,गावांतर्गत झाडे लावणे वैयक्तिक लाभाच्या योजना माहिती देण्यात आली.
➡️ ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या मोफत दळण केंद्र व शुद्ध आर.ओ.पाणी पुरवठा करण्या बाबत चर्चा करण्यात आली.
➡️ माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
➡️ सन २०२६/२७ जन सुविधा योजना कृती आराखडा तयार करणेबाबत चर्चा करण्यात आली.
➡️ वार्षिक प्रशासन अहवालाचे वाचन करण्यात आले.
➡️ पावसाळ्यापूर्वी करावयाचे उपायोजना बाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी गावातील विकास कामासंदर्भात व विविध प्रश्नांनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेला उपस्थित प्रशासक व प्रशासकीय सदस्य व ग्राम पंचायत अधिकारी, पशुधन विकास अधिकारी खैरी,तंटामुक्ती अध्यक्ष,आशा वर्कर, महसूल सेवक,गावातील तरुण ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम पंचायत अधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
||एक गांव एकच ध्येय आदर्श सावळापूर||
20/05/2026
💥जाहीर सूचना जाहीर सुचना 💥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ग्रामपंचायत कार्यालय सावळापूर अंतर्गत मौजा-सावळापूर, खानापूर, टोंगलाबाद येथिल सर्व मतदार बंधू-भगिनींना यांना जाहीर मुनादी द्वारे कळविण्यात येते की,
बुधवार दिनांक २०/०५/२०२६ रोजी महीला सभा सायंकाळी ०५=०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच,
सर्वसाधारण ग्रामसभा बुधवार दिनांक २०/०५/२०२६ ला सायंकाळी ०५=४५ वाजता ग्राम पंचायत कार्यालय सावळापूर येथे आयोजित करण्यात आहे.सर्व मतदार बंधू-भगिनींनी सर्वसाधारण ग्रामसभेत आवर्जून उपस्थित राहावे, ही विनंती
सर्वसाधारण ग्रामसभेची नोटीस ग्राम पंचायत चे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रशासक /ग्रा.पं अधिकारी
ग्राम पंचाय कार्यालय सावळापूर