दीपावली व लक्ष्मीचे आगमन
-----------------------------------------
पण काहीही म्हणा
ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं ,
जावा , नातवंडं एकत्र येतात
सर्वजण मिळून कामं करतात
तिथं खरंच प्रसन्न वाटतं , करमतं !
दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !
मित्र हो ,
हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं
म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !
ती येते , रहाते ,जेवते आणि जातांना म्हणते
खुशाल रहा असंच मिळून मिसळून रहात जा !
कुणी आणि का लावलं असेल
आपल्या मागे हे सगळं ?
शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ
या सणसमारंभाना ?
थोडा विचार केला , चिंतन केलं
तर आपल्याला कळेल..........
या सणाच्या निमित्ताने
आपलं घर भरून जातं,
आपुलकीला उधाण येतं
माणसं एकत्र येतात ,
भेटतात , बोलतात,
आणि पुन्हा आपापल्या गावी
पोट भरण्यासाठी निघून जातात ......!
बैठकीत झालेली माणसांची गर्दी
आणि दारा समोर झालेली पादत्राणांची ,
पाऊलांची दाटी हीच खरी लक्ष्मी .......!
चार दिवस सर्व कुटुंबाचं
एका छता खाली येणं
गुण्यागोविंदाने रहाणं
आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं ......
हीच खरी लक्ष्मी !
पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक
दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा
तुम्ही राहूद्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट
हीच खरी लक्ष्मी ....!
मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका
ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते,
सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते ,
एखाद्या वेळेस रागवत असतील पण मनात ठेवत नव्हते,
ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतु
एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे
त्यांना चांगलं कळत होतं.
योग्य वेळी योग्य वागणं आणि
घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला
तडे न जाऊ देणं ......
हीच खरी लक्ष्मी !
मला मला करण्यापेक्षा
तू घे , तू घे चा आग्रह करणे,
आधी काहीतरी खाऊन घ्या
आणि नंतर काम करा,
अशी जेष्ठांनी केलेली मायेची सूचना
घर , कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला
प्रत्येक सदस्याचा त्याग
हीच खरी महालक्ष्मी ....!
---------------------------------------------
आपल्या घरी लक्ष्मी सदैव नांदो,
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
विनायक देशमुख,
अहिल्यानगर
🙏🏻.🪔🔱🚩🕉️🌞🔔🪔
विकासवर्धिनी
विकासवर्धिनी, अहमदनगर
प्रशिक्षण, लोकशिक्षण, जनजागृतीसाठी कार्यरत सामाजिक संस्था
सप्रेम नमस्कार,
विकासवर्धिनी या (प्रशिक्षण, लोकशिक्षण व जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या) मासिकाच्या माध्यमातून केंद्रसरकार व राज्यसरकारच्या योजना, परदेशी अर्थसहाय्याची योजना , सी. एस. आर फंडातून अर्थसहाय्य मिळू शकणाऱ्या योजना व अन्य योजनांची माहिती दिली जाते. याशिवाय सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, स्पर्धापरीक्षांबाबतची माहिती प्रकाशित केली जाते. अनेक योजना या ग्रामपंचायती, स्व
17/10/2025
माजी मंत्री, विद्यमान आमदार व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष स्व.शिवाजीराव कर्डिले यांना श्रध्दांजली अर्पण करताना राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस .
14/10/2025
एक लोटा जल , सारे समस्याका हल !!
इस दीपावली शिव मंदिर में दीपदान करें @panditpradeepmishraofficial (Sehore Wale) - श्री शिव महापुराण कथा|| श्री शिवाय नमस्तुभ्यं ||हर हर महादेवआप सभी श्रद्धालुजनों का हार्दिक स्वा...
13/10/2025
शिर्डी येथे पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या शिवकथा पुराण कार्यक्रमात जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, श्रीमती शालिनीताई विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा, विनायकराव देशमुख, दिपक पटारे, भास्करराव खर्डे पा., राजेश पा. परजणे, कैलास पा. तांबे व विखे परिवाराचे अन्य सदस्य दिसत आहेत.
11/10/2025
दि.१२ आक्टोबर ते दि.१६ आक्टोबर २०२५ या कालावधीत पिंपरी निर्मळ, अस्तगाव शिव, ता.राहाता येथे होणाऱ्या "शिव महापुराण कथा" कार्यक्रमासाठी पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा (सीहोर वाले) यांचे आज श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना भाजप नेते श्री. विनायकराव देशमुख. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दिनकर उपस्थित होते.
11/10/2025
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांनी घेतला
शिव महापुराण कथा सोहळा तयारीचा आढावा
-----------------------------------------------------------------------
📍 अस्तगाव
जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिव महापुराण कथा सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अस्तगाव येथे उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाची पाहणी करून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
चार दिवस चालणाऱ्या या अध्यात्मिक महोत्सवाला अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून लाखो भक्त उपस्थित राहणार असून, श्रद्धा, भक्ती आणि शिवतत्वाने ओथंबलेले आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची संधी सर्वांना लाभणार आहे.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दिनकर, श्री. विनायकराव देशमुख, श्री.अभय शेळके तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#प्रदीप_मिश्राजी #शिवपुराण #ॐनमःशिवाय #शिवभक्त #अहिल्यानगर
09/10/2025
शासनाच्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमामुळे
तरुण रोजगारक्षम होतील : विनायक देशमुख
---------------------------------------------------------------
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्घाटन संपन्न
अहिल्यानगर : " नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला कर्तृत्ववान पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला अभ्यासू मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पा. यांच्या रुपाने जिल्ह्याला कर्तबगार पालकमंत्री लाभले आहेत. यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनाला गती मिळत असुन विकासाचा स्तर वेगाने उंचावला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अल्पमुदतीच्या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी रोजगारक्षम होणार असुन बेरोजगारी कमी होणार आहे. जिल्ह्यात या नव्या अभ्यासक्रमांसाठी ७००० जागा उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे," असे आवाहन कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.
अहिल्यानगर येथील स्व.माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नव्याने सुरू झालेल्या अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रमांचे उद्घाटन श्रीदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने केले. यानिमित्ताने नगरच्या संस्थेमध्येही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे हिरक महोत्सव समितीचे सदस्य राजाभाऊ मुळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अशासकीय सदस्य राजेश्वर श्रीराम, चंद्रकांत काळोखे व अमित काळे, विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी योगेश उबाळे व राजेंद्र भुजबळ, अर्थतज्ञ राजेंद्र देशपांडे, खादी ग्रामोद्योग अधिकारी दादासाहेब उंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार पंतम, कौशल्य अधिकारी शुभदा पाठक, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य खालिद जहागिरदार , आदींसह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाभाऊ मुळे म्हणाले, "औद्योगिक प्रशिक्षण सस्थांसारख्या महत्त्वाच्या संस्था आजपर्यंत दुर्लक्षित राहिल्या होत्या. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या उचित धोरणांमुळे या संस्थांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. या नव्याने सुरु झालेल्या अल्पकालीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी सक्षमपणे पायावर उभे राहणार आहेत. अहिल्यानगरच्या संस्थेचे प्राचार्य खालिद जहागिरदार यांच्या कामामुळे चांगले वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. सुनील शिंदे म्हणाले, "आता ०.५ या इंडस्ट्रीजच्या काळात कौशल्य ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. त्यामुळे युवकांनी व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक कौशल्य ज्ञान मिळण्यासाठी आता नवे अभ्यासक्रमही सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांच्या ग्रीन चॅनेल मार्फत वेगाने अल्पकाळात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आहेत. या नव्या कोर्ससाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध होत आहे, असे सांगितले
यावेळी राजेश्वर श्रीराम यांनीही आपले विचार व्यक्त केले. विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी सर्वश्री योगेश उबाळे व राजेंद्र भुजबळ यांच्या हस्ते नव्याने सुरू झालेल्या शॉर्टटर्म कोर्सच्या वर्कशॉपचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे प्राचार्य खालिद जहागिरदार यांनी नव्याने सुरू झालेल्या शॉर्टटर्म कार्सची सविस्तर माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय धोंगडे यांनी केले तर आभार प्रा. वीरेंद्र परदेशी यांनी मानले.
--------------------------------------------------------
Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.
Whenever you see the Stars icon, you can send me Stars!
26/12/2024
भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन,
भावपुर्ण श्रद्धांजली🙏💐💐
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
B9, Vikaswardhinee, Gurukul Building, Laltaki
Ahmednagar
414001
