01/06/2026
जुनी ओळख आणि विश्वासाची परंपरा जपून,
नव्या युगाची आधुनिक जोड देणाऱ्या
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Official Page of Kiran Lahamate
Member of Legislative Assembly,
NCP Maharashtra | Akole
01/06/2026
जुनी ओळख आणि विश्वासाची परंपरा जपून,
नव्या युगाची आधुनिक जोड देणाऱ्या
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/06/2026
बदगी येथील माळवे परिवारातील चिरंजीव यज्ञेशच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
01/06/2026
नुकत्याच लागलेल्या पोलीस भरती निकालात खिरविरे येथील योगिता रामनाथ बेणके ,रजनी रामनाथ बेणके ,काजल पंढरीनाथ बेणके ,सिद्धेश राजु काळे व सौ.स्वप्नाली विशाल बेणके हे तरुण पोलीस झाले.गावच्या वतीने त्यांची मिरवणुक काढून सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
#अभिनंदन
01/06/2026
धामणवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिक मास धोंडा उत्सवानिमित्त उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला.
आजही गावाकडे संपूर्ण गावच्या जावयांची एकत्रित मिरवणुक काढून एकत्रित धोंडा साजरा केला जातो.
01/06/2026
दादा आज तुमचा वाढदिवस
आज मी तुमचा राजकीय,सामाजिक वारसा सक्षमपणे पेलू शकलो कारण तुम्ही मला राजकारणाच समाजकारणाच बाळकडू लहानपनापासून पाजलं,
शिक्षणाला प्राधान्य दिलं,
माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं त्यामुळं मी उतुंग भरारी घेऊ शकलो...
आजही माझ्या आयुष्यातील जो बाप माणूस आहे तो तुम्ही आहात दादा...!
सुरुवातीच्या काळामध्ये दादा राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे आमच्या घरी नेहमीच लोकांची लगबग असायची. येणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी दादा कार्यतत्पर होते. नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार त्यांनी केला आणि त्या पद्धतीनेच आपली कार्यपद्धती ठेवली.
राजकारणाबरोबरच शैक्षणिक, आध्यत्मिक आणि सर्व क्षेत्रांमध्ये दादांनी आपल्या आपुलकीने लोकांना जोडून ठेवले आहे. एखाद्या माणसाने आपल्याला छोटीशी जरी मदत केली तरी त्या माणसाला आयुष्यभर लक्षात ठेवायची, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगायची, हा त्यांचा गुण घेण्यासारखा आहे.
दादांची माणसं जोडण्याची कला, प्रत्येक गोष्टी मधला फॉलोअप, प्रत्येक गोष्टीबाबत सकारात्मक विचार, अत्यंत धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती ही निश्चितच अनुकरणीय आहे. ह्या वयात सुद्धा त्यांचा उत्साह हा अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
दादांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना!
31/05/2026
लव्हाळी ओतूर येथील मुख्याध्यापक श्री.रमेश काशिनाथ मोहिते हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
31/05/2026
आज देवठाण येथील विविध कार्यकारी सोसायटी येथील सचिव श्री.शांताराम जोर्वेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब ,मधुकरराव नवले माझे मित्र जालिंदरजी वाकचौरे,सुधीर अण्णा शेळके समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
30/05/2026
आज छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक अकोले आगार येथील
मा.श्री लालू धोंगडे,आर.टी.देशमुख ,धोंडीराम खाडे ,कैलासराव जगदाळे,दशरथराव बोबडे हे पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
आज त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना पुढील निरोगी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
#अकोले
#सेवापूर्ती
30/05/2026
क्रांतिकारक राघोजी भांगरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुर येथील शिल्प निदेशक श्री एस.के.मंडलिक सर हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले आज त्याच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित राहून पुढील निरोगी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.