Social and Political Organization Short Description1.Destroy caste system
2.Respect women
3.
dont take support from those who donot believe ur thoughts
4.Militant non-voilence-protest agaist injustice.Long DescriptionYukrand's :Four Principles
1.Destroy caste system-because caste system pollutes your mind
2.Respect of women
3.Adinyadan ver...mani: means dont take support from those who donot believe in your thoughts
4.Militant non-voilence-protest agaist injustice
युक्रांदचे ध्येय/उद्दीष्
टे
* जातिमुक्त समाजरचना निर्माण करणे. जाती व्यवस्थेमुळे निरनिराळ्या शोषणाला बळी पडलेल्या जाती व गटाना न्याय मिळवून देणे. त्यासाठी विविध उपक्रम राबवणे.
* आर्थिक विषमता नष्ट करणे, अतिगरीब व अतिश्रीमंत यांच्यातील प्रचंड दरी कमी करणे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या सर्व माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्या मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध आधिकार आहे. त्यासाठी त्या पद्धतिची आर्थिक रचना असावी याकरिता आग्रही राहणे
* स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी सर्व नागरिकाना राज्यघटनेने दिलेले मुलभूत आधिकारांचे ज्ञान खर्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहचविणॆ व ते आधिकार त्यांना बजावता येतील यासाठी त्यांना सबल बनविणे.
* या मुद्द्यांवर आग्रह धरत सत्ता-संपत्ती व प्रतिष्ठेपासुन वंचित असलेल्या गटाना, नागरिकानां न्याय मिळवुन देणे व त्यातुन समतेवर आधारित शोषणमुक्त समाजरचना निर्माण करण्याचा युक्रांदचा निर्धार आहे. संपूर्ण क्रांती करुन एक नवसामर्थ्यशाली राष्ट्र म्हणुन भारत जगात अग्रेसर ठरावा हेच आमचे स्वप्न, यासाठी आमच्याजवळ जे जे आहे ते आम्ही पणाला लावणार हा आमचा निर्धार आहे.
संपुर्ण क्रांती
(सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन)
आर्थिक सामाजिक
राजकीय शैक्षणिक
सांस्कृतिक नैतिक
वैचारिक बौद्धिक
युक्रांदची वैशिष्ट्ये
| भारतीय राज्यघटना व लोकशाही व्यवस्थेस सर्वोच्च प्राधान्य
| महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत.
| चातुर्वर्ण्य व जातीय संस्थेला आमचा ठाम विरोध, मानवता हाच खरा एकमेव धर्म असे आम्ही मानतो. प्रत्येक धर्मातील मानवतावाद आम्हास प्रिय आहे.
| स्त्री-पुरुष समानतेला प्राधान्य देऊन ज्या देशात गावातील कुटूंबामध्ये स्त्रियांचा आदर केला जातो. तोच देश, गाव व कुटूंब प्रगती करते ह्ए सिद्ध झाले आहे.
| सार्वत्रिक क्षेत्र, शासकीय व निमशासकीय ठिकाणी भ्रष्ट कारभारास ठाम विरोध.
| लढाऊ अहिंसा व सामुदायिक संघर्ष, सत्याग्रह, आंदोलन, सत्याचे पाठीशी सामर्थ्य उभे करणे ही कार्यपद्धती
| अणुबॉंब व अण्वस्त्रे ही फक्त मानवी संहाराची अस्त्रे आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता किंवा सामर्थ्य वाढत नाही असे युक्रांद मानते.
| कोणतेही धार्मिक स्थळ (उदा. मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वार, मठ इ.) जाणिवपुर्वक उध्वस्त करणे म्हणजे राष्ट्राच्या विघटनास उत्तेजन देणे असे युक्रांद मानते.
| कोणत्याही राजकीय पक्षापासून अलिप्त व स्वतंत्र एक वैशिष्ट्यपूर्णॅ राजकीय संघटन
| संघटनेचा खर्च लोकवर्गणीतुन भाग्अवला जातो. ज्याना युक्रांदचे कार्य व विचार आवडतात त्यांच्याकडुन वर्गणी घेतली जाते.
युक्रांदीयाकरता आचारसंहिता /शील
8) स्वत: निष्क्रीय राहून संघटनेच्या सक्रिय व कृतिशील कार्यकर्त्यांच्या चुका दाखवु नयेत. त्याच्यावर चारित्र्य हननात्मक टीका करु नये.संघटनेत सर्वांशी मैत्रीपुर्ण संबंध असावेत.कार्यकर्त्यांशी नेहमी सुसंवाद असावा.
9)संघटनेच्या वेळोवेळी होणार्या आपल्या परिसरातील कृती कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला पाहीजे.
10)आपला पदाचा स्वार्थी, संकुचीत, वैयक्तीक हितसंबंधासाठी वापर करु नये.
11)सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत.
12)महाराष्ट्रभर संघटना वाढीसाठी आपआपल्या परीने प्रयत्नशील असलेच पाहीजे.
Ø युक्रांदच्या साप्ताहिक बैठका होणे आवश्यक. त्यामध्ये आपला परिसर, राज्य व देश यांच्या पातळीवरील विविध घडामोडी, विविध प्रश्नांवर चर्चा करुन कृतीकार्यक्रम आखावा
Øकेंद्र ज्या गावात/तालुक्यात/शहरात आहे.तेथील सर्वप्रकारची राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. माहिती गोळा करणे.
Øसध्याचे कार्यरत राजकीय पक्ष, इतर संघटना, प्रमुख कार्यकर्ते, पोलीस महसुल, विकास आधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, पदाधिकारी, आधिकारी, त्यांची कार्यालये, फोन, नांवे माहित असावीत.
Øआपण राहतो त्या परिसरातील प्रमुख प्रश्नांचा शोध घेऊन त्याबाबत सर्व अभ्यास करणे, जनजागृती करुन त्याबाबत बैठक, पत्रकार परिषद, सत्याग्रह, आंदोलन इ. करता येईल का? याचा प्रयत्न करावा.
Øराज्य युक्रांद कार्यालयाशी वेळोवेळी फोन, पत्राद्वारे संपर्कात असावे.वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.
Øआपल्या परिसरातील आकस्मिक दु:खद घटना, अन्यायग्रस्ताना भेटी द्याव्यात. शक्य ते मदतकार्य करण्याचा मनापासुन प्रयत्न करावा.आनंदाच्या घटना व कार्यक्रमास देखील उपस्थीत राहावे.
Øदर आठवड्याला तालुक्याच्या/शहराच्या प्रमुख सरकारी कार्यालयात नियमीत संपर्कात राहावे. व तेथील कामकाज समजुन घ्यावे. उदा. पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय, सहकारी संस्था, कार्यालये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालीका, महानगरपालीका इत्यादी.
Ø राष्ट्रीय सण साजरे करण्यात पुढाकार घ्यावा. त्यादिवशी व्याख्याने, परिसंवाद, निबंधस्पर्धा, युवक मेळावे, महिला मेळावे, शेतकरी मेळावे घेउन त्याना आवश्यक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. किंवा अन्य सामाजिक उपक्रम घ्यावेत.अशा उपक्रमाना सरकारी आधिकारी निमंत्रीत करावेत.
Øआपल्या परिसरातील महिला बचत गट, युवक मंडळाना नियमीत भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात.
Øसेंद्रिय व निसर्ग शेतीचा स्वत: अभ्यास करुन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेऊन शेतकर्यांमध्ये जनजागृती करावी.
Øग्रामसभेचे आधिकार समजुन घेऊन ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा.ग्रामसभा होत नसतील तर जि.प./पं. समितीच्या सहकार्याने ग्रामसभा घेण्यास सरपंच/ग्रामसेवकाना भाग पाडा.
Øआपल्या युक्रांद केंद्राचा नामफलक गावाच्या/शहराच्या प्रमुख ठिकाणी लावावा.
Øआपल्या परिसरातील समाजप्रेमी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या साह्याने आरोग्य शिबीरे घ्यावीत.
Øमाहितीच्या आधिकाराचा अभ्यास करुन स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था व अन्य शासकीय कार्यालयातून निरनिराळ्या विकासकामांची, योजनांची माहिती गोळा करावी.त्यात आर्थिक गैरव्यवहार आढळला तर पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पातळीवर चौकशीची व कायदेशीर कारवाईची मागणी करावी.
Øआपल्या परिसरात स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धेच्या विरोधी बालविवाह रोखणे, जाती धर्म सलोखा रहावा याकरिता सतत जाहीरपणे बोलत रहावे.गरज भासल्यास पत्रके छापुन वाटावीत.बैठका, सभांचे आयोजन करावे.
Øवेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात मतदारांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाच पाहीजे.आपला उमेदवार उभा नसल्यास अन्य चांगल्या व लोकशाही मानणार्या उमेदवाराच्या (स्थानिक परिस्थीतीचा अभ्यास करुन ) राज्य युक्रांदच्या सल्ल्याने प्रचार कार्यात सक्रिय असावे.
Ø”सत्याग्रही विचारधारा” मासिकात युक्रांदवृत्तकरीता आपल्या केंद्राने केलेल्या कृतीकार्यक्रमांची माहिती दरमहा पाठवावी. मासिकाचे वर्गणीदार करावेत.
Ø युक्रांदच्या कोणत्याही कार्यक्रम नियोजनासाठी व खर्चासाठी स्वाभिमानाने लोकवर्गणी करणॆ (आपले काम व विचार माहित असलेल्या तसेच समविचारी लोकांकडुन वर्गणी मिळत असते.हा जुना व सार्वत्रीक अनुभव आहे.)
Ø लोकांच्या सहभागातुन, लोकांच्या प्रश्नावर अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने संघर्ष व आंदोलन करावे.आवश्यकता पडल्यास शांततामय सत्याग्रह करुन तुरुंगात् जाण्याची तयारी ठेवावी.याबाबत युक्रांदच्या पदाधिकार्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
राज्यघटना प्रास्ताविक
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास; सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करुन; आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियनित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.