19/05/2025
Kumar Saptarshi Dr. Neelam Gorhe Yuvak Kranti Dal
Social and Political Organization Short Description1.Destroy caste system
2.Respect women
3.
dont take support from those who donot believe ur thoughts
4.Militant non-voilence-protest agaist injustice.Long DescriptionYukrand's :Four Principles
1.Destroy caste system-because caste system pollutes your mind
2.Respect of women
3.Adinyadan ver...mani: means dont take support from those who donot believe in your thoughts
4.Militant non-voilence-protest agaist injustice
युक्रांदचे ध्येय/उद्दीष्
19/05/2025
Kumar Saptarshi Dr. Neelam Gorhe Yuvak Kranti Dal
सुजाण नागरिकांनी यावर नक्कीच प्रश्न विचारले पाहिजेत. कारण आपल्या खिशातील पैशातून सरकारची जाहिरात व्हावी, व्यक्तीची वा पक्षाची नाही.
01/11/2022
आज, १ नोव्हेंबर पासून युक्रांदचे कार्यकर्ते 'शेतकरी संवाद पद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. ही यात्रा पावणे वस्ती ता. कर्जत जि. अहमदनगर (ते जामखेड) येथून सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. नक्की सहभागी व्हा.
संपर्क -
Kiran Jagtap 8830522275
Appa Anarase 9096554419
#युक्रांद #पदयात्रा #संवादयात्रा #शेतकरी #तरुण
24/12/2021
आज युवक क्रांती दल (युक्रांद) आणि भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक व ग. दा. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालय तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, प्राचार्य डॉ. महेंद्र साळवे सर, युक्रांदचा कार्यकर्ता नितीन सोनवणे (सायकल यात्री), सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक व ग. दा. सप्तर्षी उच्च माध्यमिक विद्यालय तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासोबत कर्जत-जामखेड मधील युक्रांदच्या कार्यकर्त्यांची मुक्त विद्यापीठात विविध विषयांवर चर्चा झाली.
कर्जत उपविभागाचे DySP श्री. आण्णासाहेब जाधव सर यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
17/11/2021
05/10/2021
जामखेड तालुक्यातील पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा; युक्रांदची तहसीलदारांकडे मागणी
बालाघाटात पावसाने उडवली दाणादाण : जामखेड तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान ; शेतकरी पंचनाम्याच्या जामखेड तालुक्यात मागील १० ते १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. विशेषता: बालाघाट डोंगररांगेच्या भागात हा पाऊस मोठ.....
21/06/2021
न्यु कोपरे गावच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या कुटूंबांना न्याय मिळावा, या मागणीसाठी युक्रांदचा हल्लाबोल !!
22/04/2021
*डॉ. आरोळेंच्या निःस्पृह रुग्णसेवेला झेप फौंडेशनचा युक्रांदीय सलाम....✊🏽✊🏽✊🏽*
भाजीपाला आणि किराणा साहित्याची मदत सूपूर्द.
रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांनी सुरू केलेला जामखेड (अहमदनगर जिल्हा) येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प आज चर्चेत आहे. सध्या डॉ. आरोळे यांचा मुलगा डॉ. रवी आरोळे आणि मुलगी डॉ. शोभा आरोळे हे या आरोग्य प्रकल्पाचं काम बघतात. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आरोळे दाम्पत्य कोरोना चाचणीपासून ते रुग्णांवरील उपचारापर्यंत स्वतः लक्ष घालून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत 'आरोळे पॅटर्न' हा चर्चेचा विषय आहे. राज्यात रेमडिसिविर आणि इतर औषधांचा तुटवडा आहे. मात्र आरोळे दाम्पत्याने आहे त्या साधनांचा सुयोग्य वापर करून रुग्ण बरे केले आहेत. कुठल्याही रुग्णांच्यामागे रेमडीसीवीर औषध घेऊनच या असा तगादा लावला नाही. कोविड सेंटरमधून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
'युवक क्रांती दल' आणि 'झेप फाउंडेशन' यांच्यावतीने आज आरोळे रुग्णालयाला बटाटे, कांदे, कोबी, फ्लावर, चणाडाळ, तांदूळ, भेंडी, भोपळा, शेवगा, गवार असा आवश्यक भाजीपाला आणि धान्य देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, राशीन शहर अध्यक्ष विनोद सोनवणे, जामखेड मेडिकल असोसिएशनचे सचिन जाधव, प्रा. तुकाराम घोगरदरे, विनीत पंडित, विजय घोलप, अशोक नेमाने, अक्षय सोनवणे, विशाल रेडे, माऊली राळेभात, विवेक शिंदे उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी मिनीनाथ दंडवते आणि डॉ. शोभा आरोळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या कार्यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे.
24/03/2021
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे online परीक्षांमुळे होणारा गोंधळ कायम आहे. online परीक्षांमुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासंदर्भात विद्यापीठाने अजून गोंधळ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी बाजू युवक क्रांती दलाचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसमोर मांडली .
26/02/2021
23/01/2021
युवक क्रांती दल
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दुचाकी तिरंगा रॅली
रॅलीचा मार्ग - अलका टॉकीज चौक ( सुरुवात ) - F.C रोड - ज्ञानेश्वर पादुका चौक - बालगंधर्व चौक - मनपा - मंगला टॉकीज चौक ( शनिवार वाड्याकडे ) - शिवाजी रोड - स्वारगेट - शंकरशेठ रोड - पुणे स्टेशन ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समारोप )
वार - मंगळवार दि. 26 जानेवारी 2021
वेळ - सकाळी 10.30 वा
ठिकाण - अलका टॉकीज चौक ( सुरुवात )
संपर्क
जांबुवंत मनोहर
9028633720
सचिन पांडुळे
9096313022
आयोजक - सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, युवक क्रांती दल (युक्रांद)