BJP Akola Mahanagar

Call Directions Website Contact the organization

BJP Akola Mahanagar भारतीय जनता पार्टी अकोला महानगर

शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश!महाराष्ट्र विधानसभा मुख्य प्रतोद तथा आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर ...
15/10/2026

शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश!

महाराष्ट्र विधानसभा मुख्य प्रतोद तथा आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप कार्यालय, आळशी संकुल, अकोला येथे श्री. देवानंदजी टाले व श्री. गणेशजी भदे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजयजी अग्रवाल,भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, संघटन सरचिटणीस ॲड. संजयजी गोटफोडे, सरचिटणीस ॲड. देवाशीषजी काकड, गटनेते पवनजी महल्ले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#भाजपअकोला #भाजपप्रवेश

10/10/2026
सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत ‘सेवा दीप यात्रा’चा उत्साहात समारोप! माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी य...
07/10/2026

सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत ‘सेवा दीप यात्रा’चा उत्साहात समारोप!

माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या सरकारप्रमुख म्हणून अखंड 25 वर्षाच्या सेवापर्वानिमीत्त निमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भाजप अकोला महानगराच्या वतीने शहरातील विविध मंडळांमध्ये ‘सेवा दीप यात्रा’ आयोजित करण्यात आली होती.

या यात्रेचा समारोप आज स्व. लक्ष्मणदादा जंगम कबड्डी मैदान, मोठी उमरी, अकोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सेवा दीपाच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा संकल्प यावेळी दृढ करण्यात आला.

यावेळी भाजप मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार चैनसुखजी संचेती, महापौर शारदाताई खेडकर, मनपा स्थायी समिती सभापती विजयजी अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, किशोर मांगटे पाटील, कृष्णा शर्मा, संघटन सरचिटणीस ॲड. संजयजी गोटफोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ‘सेवा हीच साधना’ या विचारातून प्रेरणा घेत, जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करूया!



BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Randhir Sawarkar Chainsukh Sancheti Anup Dhotre Jayant Masne

19/09/2026

भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजपा अकोला महानगर तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे आयोजन विधिमंडळाचे मुख्य प्रतोद आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री. अनुपजी धोत्रे, महानगर अध्यक्ष श्री. जयंतभाऊ मसने, मनपा सभापती श्री. विजयजी अग्रवाल व महापौर सौ. शारदाताई खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलाकौशल्यातून विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उपस्थित मान्यवरांनी प्रोत्साहन देत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.



Narendra Modi

विकसित भारताचे स्वप्न आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत, भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी या...
18/09/2026

विकसित भारताचे स्वप्न आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत, भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुशासनाच्या २५ वर्षांच्या प्रवासाच्या निमित्ताने भाजपा अकोला महानगर तर्फे ‘एक दिवा आशीर्वादाचा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

विकसित भारताच्या संकल्पासाठी एक दिवा…
राष्ट्राच्या प्रगतीसाठी एक संकल्प…
आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक आशीर्वाद! 🪔🇮🇳


Narendra Modi

काँग्रेसने कायम महिलांना दुय्यम स्थान दिले आहे; त्यामुळे काँग्रेसला आजही महिला दुसऱ्यांवर अवलंबून आहेत असे वाटते! परंतु ...
25/08/2026

काँग्रेसने कायम महिलांना दुय्यम स्थान दिले आहे; त्यामुळे काँग्रेसला आजही महिला दुसऱ्यांवर अवलंबून आहेत असे वाटते! परंतु महिला आज सक्षम आणि स्वावलंबी झाल्या आहेत!

माजी नगरसेविका सौ. चांदणी रवी शिंदे आणि श्री. रवी शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर व म...
18/08/2026

माजी नगरसेविका सौ. चांदणी रवी शिंदे आणि श्री. रवी शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर व माजी महापौर विजयजी अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी भाजप अकोला महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष पवनजी महल्ले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत रवी शिंदे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रियपणे योगदान देण्याचा संकल्प केला. त्यांच्या प्रवेशामुळे अकोला महानगरातील भाजप संघटनेला निश्चितच बळकटी मिळणार असून, आगामी काळात संघटन विस्ताराला अधिक गती मिळेल.

चांदणी रवी शिंदे व रवी शिंदे यांचे भारतीय जनता पक्षाच्या परिवारात मनःपूर्वक स्वागत!
पुढील संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या चिटणीसपदी श्री. अरुण जी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत...
17/08/2026

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या चिटणीसपदी श्री. अरुण जी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, महानगर संघटन सरचिटणीस संजय गोटफोडे, डॉ. अमित जी कावरे, मनीष बुंदेले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. अरुण जी गावंडे यांना नवीन जबाबदारीसाठी हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

15/08/2026

ध्वजारोहण सोहळा, भाजप कार्यालय,अकोला

स्थानिक भाजप कार्यालय,अकोला येथे खा. अनुपभाऊ धोत्रे यांच्या हस्ते व माझ्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

यावेळी माझ्यासह भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,माधवराव मानकर,संजयजी गोटफोडे, ॲड देवाशीष काकड सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

Anup Sanjay Dhotre
#स्वातंत्र्यदिन

15/08/2026

Address

आळशी संकुल, अकोला
Akola
444002

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Akola Mahanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Akola Mahanagar:

Shortcuts

Share