24/05/2026
भाजपा खासदार श्री. अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Anup Dhotre
भारतीय जनता पार्टी अकोला महानगर
24/05/2026
भाजपा खासदार श्री. अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Anup Dhotre
21/05/2026
02/05/2026
अकोल्यासाठी अभिमानाचा क्षण!
खासदार श्री. अनुपदादा संजय धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तिरुपती–अकोला–तिरुपती (17429/17430) या साप्ताहिक एक्सप्रेस सेवेला अखेर मंजुरी मिळाली.
या नव्या रेल्वे सेवेच्या शुभारंभ व हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम
📅 दि. 3 मे 2026
⏰ सकाळी 8:10 वा.
📍 अकोला रेल्वे स्टेशन
या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.
विनीत: भारतीय जनता पार्टी, अकोला
#अकोला_महानगर
BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Randhir Sawarkar Anup Dhotre
01/05/2026
28/04/2026
18/04/2026
अकोला मधील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित 'भारताची भीमज्योत' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
'दीक्षाभूमी ते चैत्यभूमी' हा प्रवास बाबासाहेबांनी दिलेल्या मानवतावादी विचारांचा, सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचा साक्षीदार आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा दीप आपल्या मनात तेवत ठेवत, समताधिष्ठित आणि विकसित भारत घडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प करुया.
यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार हरीशभाऊ पिंपळे, आमदार वसंतजी खंडेलवाल, आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि अनुसूचित मोर्चाच्या प्रदेश प्रभारी माधवीताई नाईक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजीतजी गायकवाड, महापौर शारदाताई खेडकर, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोषजी शिवरकर, अनुसूचित जाती मोर्चा अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष पंकजजी सावळे, अनुसूचित जाती मोर्चा अकोला शहराध्यक्ष पुरुषोत्तमजी पानझाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावणजी इंगळे, कृष्णाजी गोवर्धनजी शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan Anup Dhotre Randhir Sawarkar Vasant Khandelwal Harish Pimple Santosh Shivarkar Jayant Masne
15/04/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सुरू झालेल्या “माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग” या मोहिमे अंतर्गत गौरक्षण रोड प्रभाग क्रमांक १५ मध्ये स्वच्छता करण्यात आली.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजयजी अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, नगरसेवक हरीश अलिमचंदानी,नगरसेवक ॲड कल्पना संजय गोटफोडे, नगरसेवक अमोल मोहोकार , नगरसेवक धनंजय धबाले, रणजीत घेडकर, मनीष बुंदेले , अरविंद शुक्ला यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Randhir Sawarkar
14/04/2026
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच विधिमंडळातील मुख्य प्रतोद, आमदार माननीय रणधीर भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त लेडी हार्डिंग हॉस्पिटल येथे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसांत गरोदर स्त्रियांना रक्ताची अधिक आवश्यकता भासते, हे लक्षात घेऊन या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा मुख्य उद्देश होता.
याप्रसंगी माजी महापौर विजयजी अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, महापौर शारदाताई खेडकर, युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#अकोला_महानगर
BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Randhir Sawarkar
14/04/2026
आज भारतीय जनता पक्ष कार्यालय, आळशी संकुल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
#अकोला_महानगर