मी कमावलेलं पुण्य ही देवाने तुझ्या नशिबी लिहावं...न मागताच सर्व काही तुला मिळावं...
तुझा हात माझ्या हाती नेहमी असाच असावा...
माझ्या सुख दुःखात नेहमी तू सोबत असावी...
आणि जन्मो जन्मीची साथ आपली अशीच कायम असावी....
विवेकश्री.....🥰
तिला माझी आठवण यावी. अशीच एक ती.
मरण्या अगोदर थोडं मना सारखं करूया.
*थकलो आहे*
थकलो आहे खूप
पैशांच्या मागे धाऊन
थकलो आहे खूप
पैशांच्या मागे धाऊन
आयुष्य राहील जगायचं
म्हातारपण आल् धाऊन.
पैसा कमावला खूप
नाही आला कामी
पैसा कमावला खूप
नाही आला कामी
वय निघून गेलं
आजारपण आल नामी
पैशाने दूर केले सर्व सगे सोयरे
पैशाने दूर केले सर्व सगे सोयरे
काय करता त्या पैशाचं
कोणी येत नाही घरी विचारायला काय रे
पैसा आहे मोठा पण
माणुसकी जपली पाहिजे
पैसा आहे मोठा पण
माणुसकी जपली पाहिजे
काय भरोसा आयुष्याचा
कधी कोणाला चार लोक पाहिजे
पुढे....chetan
*चाहूल*
चाहूल लागताच तिची
मनामध्ये धस्स होत
हरवलेल्या पाखराप्रमाने
भिरभिरत झाल्यासारखं होत.
तिचा विचार आला की
मन गंभीर होत
भीती वाटते तिला गमावण्याची
म्हणून हृदय धडकत असतं
तिच्या साठीच जगू आणि तिच्यासाठी च मरू असा विचार सतत येतो
ती भेटली तर सांगेल तिला
मी ही तुझ्यासोबत येतो..
सोडून नाही करमत तिला
आठवण नेहमी येते
रडून झालं पडून झालं
विश्वास आहे की ती येते.
पुढे....
*ती*
का ती हवी हवीशी वाटते
सोबत नसतानाही असल्याची जाणीव होते
आता तर अस वाटते झोप ही तिच्यासाठीच येते
कारण स्वप्नातही तीच मला दिसते
का ती हवी हवीशी वाटते
ती सोबत नसेल तर
जीवन नकोस वाटते
दिवसभर डोळ्यासमोर तीच मला दिसते
सोडून गेली मला तरीही मन तिचीच वाट बघते
का ती हवी हवीशी वाटते
ती नाही समजू शकली मला काही हरकत नाही
चूक माझीही आहे मी माझा वर्तमान सांगितलं नाही
या जन्मात तर नाही
मात्र पुढच्या जन्मात तिची अपेक्षा करते
*चेतन*
*परिवार*
जगायचं आहे परिवारासाठी
दुनिया गेली उडत
जगायचं आहे परिवारासाठी
दुनिया गेली उडत
लक्ष्यात आल आजारपणी
तेव्हा आल माझ्या ध्यानी.
कोणी नाही कोणाचं चोहीकडे आहे बेइमानी..
प्रेम करा घराच्यांवर , काळजी घ्या त्यांची
तेच येतील कामी जेव्हा होसाल तुम्ही निकामी
आई असेल किंवा असतील वडील
त्यांना कधी ही दुखावू नका
त्यांनीच दिलाय जन्म
निर्दयी वागू नका
अस वागा त्यांच्याशी कौतुक त्यांनी केलं पाहिजे
त्यांना ही वाटू द्या बाळ माझं असच राहील पाहिजे.
बायको असेल किंवा असतील मुलं
त्यांच्या साठी जगा
काम करा असे की त्यांना नाही होणार काही त्रागा
लेकरांच्या भविष्यासाठी
आयुष्य खर्ची घाला
व्यर्थ व्यसन केल्यापेक्षा
शिक्षणाचा ध्यास मनी त्यांचा घाला
शिक्षण आहे तर आहे जीवन
शिक्षण च करणार काबीज मन
*चेतन*
*प्रेम करायला मला तिने शिकवलं*
प्रेम करायला मला तिने शिकवलं !
कळलच नाही मला कधी तिच्यावरच मला प्रेम झालं..!!
ती म्हणजे जणू माझा श्वासच
ती म्हणजे जगण्याची उम्मिद
आणि तीच माझी झालेली सवय.
नको होत मला दुसरं काही
ती असेल तर विसरून जाई काही
दिवस निघून जायचा तिच्या आठवणीत
संध्याकाळी आली की घ्यायचो तिला मिठीत
खूप काही सांगायचं होत तिला ही मला
आणि सांगायचं होत मला ही.
हिंमत नसे होत मैत्री ला प्रेमाचं नाव द्यायची !!
एवढे मोठे असूनही मस्ती आम्ही करायचो
एवढे मोठे असूनही मस्ती आम्ही करायचो
मस्ती करता करता , नजरेत दुसऱ्यांच्या आलो
नजर लागली मैत्रीला आणि प्रेम राहील मनात
नजर लागली मैत्रीला आणि प्रेम राहील मनात
व्यक्त होण्या आधीच दूर आम्ही झालो
व्यक्त होण्या आधीच दूर आम्ही झालो
आठवणीत रमायला आवडत आहे खूप
पाणावलेल्या डोळ्यांनी
फोटो पाहत असतो खूप !!
*कट्टर मित्र*
चेतन...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Akola
